ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » राममंदिर ठरलेल्या प्रारूपात, ठरलेल्या ठिकाणीच

राममंदिर ठरलेल्या प्रारूपात, ठरलेल्या ठिकाणीच

•तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
•मध्यस्थ समितीचे स्वागतच
•रा. स्व. संघाची भूमिका,
ग्वाल्हेर, १० मार्च –

Bhaiyyaji Joshi

Bhaiyyaji Joshi

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर ठरलेल्या प्रारूपात आणि ठरलेल्या ठिकाणीच होईल. या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आधीपासूनच निश्‍चित आहे, असे स्पष्ट प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज रविवारी येथे केले.
रा. स्व. संघाच्या तीन दिवसीय अ. भा. प्रतिनिधी सभेचा आज समारोप झाला. या बैठकीत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांची माहिती भय्याजी जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली. राममंदिराबाबत आमच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही. ठरलेल्या प्रारूपात आणि ठरलेल्या ठिकाणीच ते होणार आहे, यात आम्हाला मुळीच शंका नाही, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले.
मंदिर होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जागेच्या मालकी हक्कावरील वाद मतैक्याने सोडविण्यासाठी तीन सदस्यीय मध्यस्थ समिती गठित केली. याचे आम्ही स्वागतच करतो. राममंदिराच्या मार्गातील सर्व अडथळे शक्य तितक्या लवकर दूर करण्यात यावे, हीच सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. मध्यस्थ समितीतील सदस्यांनी हिंदूंच्या भावना विचारात घेऊनच वाटचाल करावी, असे आम्हाला वाटते. केंद्रात सत्तेत असलेल्या लोकांचा राममंदिराला विरोध नाही आणि राममंदिराबाबत त्यांच्या वचनबद्धतेवर आम्हाला कुठली शंकाही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदूंची श्रद्धा, परंपरा जोपसण्याचा निर्धार
प्रतिनिधी सभेच्या आज शेवटच्या दिवशी शबरीमलै मंदिराच्या मुद्यावर महत्त्वाचा ठराव पारित करण्यात आला. हिंदू समाजाची श्रद्धा आणि परंपरा जोपासण्याचा निर्धार या ठरावातून व्यक्त करण्यात आला आहे. हिंदूंच्या भावनांचा हेतुपुरस्सर अपमान करून, त्या दुखवण्याचा व्यापक कट रचण्यात आला आहे. शबरीमलै प्रकरण हे याचेच ताजे उदाहरण आहे. हिंदुत्व ही वेगळी विचारधारा नसून, वैविधता आणि विविध संस्कृतीने नटलेल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, एक परंपरा आहे, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्य करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. सोबतच सामाजिक सलोख्यावर आणखी प्रभावी रीत्या काम करण्यात येणार आहे. संघकार्य आता एका नव्या वळणावर आले आहे, त्यामुळे कार्यविस्ताराच्या दृष्टीने नवीन झेप घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
याच अनुषंगाने रा. स्व. संघाने यावेळी नवीन विषयाला स्पर्श केला आहे. आज संपूर्ण जगापुढे पर्यावरण प्रदूषणाची गंभीर समस्या उभी झालेली आहे. संघ पर्यावरण संरक्षणासाठी देशभरात कार्य करणार आहे. यात जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि प्लॅस्टिक-थर्मोकोलमुक्त पर्यावरणासाठी समाजाला सोबत घेऊन प्रयत्न केले जाणार आहेत. तसे तर संघाचे स्वयंसेवक आपल्या व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत आधीपासूनच सहभागी आहेत. समाजात जागृतीही निर्माण होत आहे. पण, आता संघ संघटित होऊन आणि योजनाबद्ध रीत्या ही मोहीम पुढे राबविणार आहे, अशी माहिती भय्याजी जोशी यांनी दिली.
हवाई हल्ला कौतुकास्पद निर्णय
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कौतुकास्पद असाच होता. पुरुषार्थ आणि साहस असलेले देश दहशतवाद्यांना अशाच भाषेत प्रत्युत्तर देत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
शत्प्रतिशत् मतदानासाठी प्रयत्न करणार
आगामी लोकसभा निवडणुकांबाबत संघाची भूमिका काय असणार, असे विचारले असता, भय्याजी जोशी म्हणाले की, संघाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे, असे आम्हाला वाटते आणि त्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये समाजाचा विवेक जागा झाला आहे आणि हा जागृत समाज देशाच्या हितातच मतदान करणार आहे. देशहितात कोण काम करीत आहे, यावर विचार करण्याच्या स्थितीत आज आपला सामान्य समाज पोहोचला आहे.
जालियनवाला बाग प्रेरणादायी बलिदानाची शताब्दी
जालियनवाला बाग येथील नरसंहार ही कू्रर घटना होती. या हत्याकांडामुळे भारतीय केवळ संतप्तच झाले नाही, तर ते क्रांतिकारी आंदोलनासाठीही प्रेरित झाले. त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना हादरवून टाकले. त्यामुळे या बलिदानाची अमरगाथा देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्याचे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, असे आवाहन प्रतिनिधी सभेतून करण्यात आले.
गुरू नानकदेव यांचे ५५० वे प्रकाश पर्व
श्री गुरू नानकदेवजी महाराज यांनी सत्य-ज्ञान, भक्ती आणि कर्म हा मार्ग दाखवून, तसेच अध्यात्माच्या युगानुकूल आचरणातून समाजाच्या उत्थान व आत्मोद्धाराचा मार्ग मोकळा केला. यामुळे भ्रमित भारतीय समाजाला एकात्मता आणि नवचैतन्य प्राप्त झाले. गुरू नानकदेव यांचा संदेश आजही प्रासंगिक आणि प्रेरणादायी आहे, त्यांचे आपणही आपल्या जीवनात अनुकरण करायला हवे, असे मतही प्रतिनिधी सभेत व्यक्त करण्यात आले.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (64 of 2226 articles)

Pm Modi Aggresive1
पाकधार्जिण्या अतिरेक्यांना इशारा, गाझियाबाद, १० मार्च - आतापर्यंत खूप झाले. आम्ही आणखी सहन करणार नाही. यापुढे तुमच्या प्रत्येक नापाक कृत्यांना ...

×