ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राम मंदिरासाठी अयोध्येत आज विहिंपची हुंकार सभा

राम मंदिरासाठी अयोध्येत आज विहिंपची हुंकार सभा

►दोन लाख रामभक्त उपस्थित राहणार,
नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर –

Ram Mandir Movement

Ram Mandir Movement

विश्‍व हिंदू परिषदेने उद्या रविवार २५ नोव्हेंबरला अयोध्येत हुंकार सभेचे तर शिवसेनेने जाहीर सभेचे आयोजन केले. दोन हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत गोळा होत असल्यामुळे १९९२ नंतर प्रथमच अयोध्येतील वातावरण तापले आहे. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. संपूर्ण अयोध्येला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.
राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेने उद्या अयोध्या, नागपूर आणि बंगळुरू येथे हुंकार सभेचे आयोजन केले आहे. त्यातही अयोध्येतील विहिंपच्या हुंकार सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या हुंकार सभेत विहिंपचे संयुक्त महासचिव चम्पत राय यांच्यासह अनेक साधुसंतांची भाषणे होणार आहेत. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिर बांधले जावे आणि अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेच्या आत मशिदीला परवानगी देऊ नये, अशा विहिंपच्या मागण्या आहेत.
‘सौगंध राम की खाते है, हम मंदिर भव्य बनायेंगे’ हा विहिंपचा नारा आहे. उत्तरप्रदेशच्या अनेक भागातून हजारो रामभक्तांनी मिळेल त्या वाहनांनी अयोध्येकडे कूच केले आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी उद्या अयोध्येत होणारी धर्मसभा ही शेवटची धर्मसभा आहे, यानंतर कोणतीही धर्मसभा होणार नाही, थेट मंदिराचे कामच सुरू केले जाईल, असा इशारा विहिंपने दिला आहे.
विहिंपच्या हुंकार सभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज असल्यामुळे तसेच शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह आणि हजारो शिवसैनिकांसह अयोध्येत पोहोचल्यामुळे प्रशासनावरचा ताण वाढला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अनंत गीते व शिवसेनेचे २२ खासदार आणि ६५ आमदारही आहेत. ठाणे आणि मुंबई परिसरातून पाच रेल्वेगाड्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहे. शिवसेनेने अयोध्या परिसरात ‘पहले मंदिर फिर सरकार’ असे पोस्टर्स मोठ्या संख्येत लावले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येत १४४ कलम लागू करण्यात आले असून, अयोध्येला ८ झोन आणि १६ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आले आहे. पीएसीच्या ४६, निमलष्करी दलाच्या ७ तर रॅपिड ऍक्शन फोर्सच्या ५ कंपन्या अयोध्येत तैनात करण्यात आल्या आहे. लखनौ क्षेत्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष पांडेय आणि झांशी क्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक एस. एस. बघेल यांच्या नेतृत्वात तीन वरिष्ठ पोलिस अधीक्षक, १० अतिरिक्त पोलिस अधीक्षक, २१ पोलिस उपअधीक्षक, १६० पोलिस निरीक्षक यांच्यासह हजारोंच्या संख्येत पोलिस अयोध्येत तळ ठोकून आहेत. संपूर्ण परिसरावर ड्रोननेही नजर ठेवली जात आहे.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (470 of 2024 articles)

Dr Mohan Bhagwat22
२४ नोव्हेंबर - अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारण्याची कृती योजना साधू-संतांनी तयार केली आहे आणि या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्यासोबत ...

×