ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » राष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज

राष्ट्रीयीकृत बँका वाटू शकतील अधिक कर्ज

रिझर्व्ह बँक शिथिल करणार निकष,
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –

Rbi

Rbi

भांडवल संरक्षण प्रतिरोध (सीसीबी) निकष लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक वर्षाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने, यंदाच्या आर्थिक वर्षात बँकांना गरज असलेल्या ३५००० कोटी रुपयांच्या भांडवलात घट होऊन त्या अधिक कर्जवाटप करू शकतील, अशी माहिती सरकारी अधिकार्‍यांनी दिली आहे.
बँकांना आवश्यक असलेल्या ३५००० कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज कमी झाल्यास ते त्यांच्याकडील अतिरिक्त ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटू शकतील, असेही अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, बहुतांश बँकांकडे भांडवलाची समस्या निर्माण झाल्याने त्यांचे कर्जवाटपाचे प्रमाण फारसे नसेल, अशी शक्यता एका वरिष्ठ बँक अधिकार्‍याने व्यक्त केली आहे.
ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवींचा बँका कर्जवाटपासाठी वापर करतात. सध्या अस्तित्वात असलेल्या भांडवल उपयुक्ततेच्या निकषानुसार, बँका या ठेवींच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलापेक्षा १० पट कर्ज देऊ शकतात, असे या अधिकार्‍याने सांगितले. साधारणपणे बँकांची भांडवल उभारणी, रोखे आणि नुकसान शोषून घेणार्‍या बॉण्ड्‌सच्या माध्यमातून केली जाते. या बॉण्ड्‌समध्ये अतिरिक्त टियर-१ आणि टियर-२ असा प्रकारही असतो. त्याचे स्वरूप रोख्यांप्रमाणे असते. त्यामुळे जर नियंत्रकांच्या निकषाप्रमाणे बँकांचे भांडवल कमी असल्यास त्यांच्याकडे कर्जवाटपासाठी निधी असला तरी त्यांना कर्जवाटप करणे शक्य नसते.
सोमवारी झालेल्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे भांडवलाची गरज असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बँका भांडवलासाठी केंद्र सरकारवर अवलंबून होत्या.
रिझर्व्ह बँकेच्या भांडवल उपयुक्ततेच्या निकषानुसार, बँकांनी भांडवल ते जोखीम मालमत्तेचा अनुपात (सीआरएआर) किमान ९ टक्के ठेवणे आवश्यक आहे. या उलट २.५ टक्क्यांचा भांडवल संरक्षण प्रतिरोध निकष मार्च २०१९ पासून अनिवार्य करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. २०१८-१९ या कालावधीत भांडवल संरक्षण प्रतिरोध ०.६२५ टक्का ठेवण्यात आले होते त्याला आता स्थगिती देण्यात आली आहे.
आतापर्यंत नियंत्रकांच्या निकषामध्ये अडकलेले भांडवल आता बाजारात खेळण्यास मुक्त झाले आहे. यामुळे आता बाजारात पतपुरवठा वाढेल. मात्र, निकष शिथिल केल्याने भारतीय बँकांचे मानांकन ऋणात्मक होण्याचा इशारा मूडीजने दिला आहे. लघु व्यावसायिकांना सहकार्य करा आणि भांडवल संरक्षण प्रतिरोध निकष पूर्ण करण्यासाठी बँकांना काही अवधी द्यावा, असे सोमवारी नऊ तास झालेल्या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने बँकेला सांगितले. वाईट काळासाठी बँकांनी चांगल्या काळात काही पैसा साठवून ठेवावा हा सीआरएआर निकषामागचा हेतू आहे. मात्र, सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगात आहे, पतवाढ ११.३ टक्क्यांवर आहे. परंतु अशा स्थितीत काही राष्ट्रीयीकृत बँकांना भांडवलाची नितांत गरज निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे त्यांची गरज पूर्ण होईल.

Posted by : | on : 22 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (131 of 1905 articles)

Iqbal Ansari Babri Masjid
पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले, तरी केंद्र सरकारने यावर संसदेत कायदा ...

×