ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींच्या टिपण्णीनंतर काँग्रेस-भाजपात ‘व्हिडीओवॉर’

राहुल गांधींच्या टिपण्णीनंतर काँग्रेस-भाजपात ‘व्हिडीओवॉर’

नवी दिल्ली, ५ जानेवारी –

Bjp X Congress

Bjp X Congress

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत बाजारू असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये आता ‘व्हिडीओवॉर’ रंगले आहे. लोकसभेत काँग्रेस-भाजपामध्ये राफेलवरून सुरु असलेले वाक्युद्ध, आता संसदेबाहेरही सुरू आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी एक जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांची प्रकट मुलाखत घेतली होती.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राफेल व्यवहाराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. त्यावेळी मोदींचे नाव न घेताना बोलताना, ‘त्यांच्यामध्ये तुम्हा पत्रकारांसमोर येऊन बसण्याची हिंमत नाही. पण मी आलो आहे. तुम्ही मला कोणतेही प्रश्‍न विचारू शकता. तुम्ही पंतप्रधानांची मुलाखत पाहिलीत का? म्हणजे प्लाएबल पत्रकार. त्या प्रश्‍नही विचारत होत्या आणि उत्तरेही देत होत्या,’ असे राहुल गांधी म्हणाले.
प्लाएबल हा शब्द नेहमीच्या वापरातील नसल्यामुळे अनेकांना गूगलचा आधार घ्यावा लागला. त्याचा शब्दश: अर्थ सहज कोणाच्याही प्रभावाखाली येणारा असा येतो. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर राहुल गांधी यांनी उच्चारलेला प्लाएबल हा शब्द ट्रेेण्डिंगमध्ये आला.
‘द एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ अर्थात भारतातील वरिष्ठ संपादकांच्या मंडळाने याविषयी काळजी व्यक्त केली आहे. पत्रकार किंवा प्रसारमाध्यमांना लक्ष्य करणे हा बदनामीचा सोपा मार्ग असल्याचे मत माध्यम क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
‘आणिबाणी लादणार्‍या हुकूमशाहाच्या नातवाने आपली खरी गुणसूत्रे (डीएनए) दाखवली. एका संपादकावर हल्ला चढवून घाबरवले,’ अशा आशयाचे ट्विट केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखती एकत्र करून त्यांचा व्हिडीओ काँग्रेसने पोस्ट केला. प्लाएबल हा आक्षेपार्ह शब्द नाही, ही भारतीय पत्रकारितेची सद्य:स्थिती आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
भाजपाच्या अमित मालवीय यांनी काही वेळातच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांच्या मुलाखतींचा भाग असलेला एक व्हिडीओ शेअर केला. ही टीका ज्यांच्यावर करण्यात आली, त्या एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनीही मौन सोडले आहे. ‘तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायची आहे, जरूर करा,’ असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा प्रेस क्लब ऑफ इंडियाकडूनही समाचार घेण्यात आला. ‘आधी केंद्रीय मंत्र्याने वापरलेला प्रेस्टिट्यूट हा शब्द आणि त्यानंतर एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने मीडियाला प्लाएबल म्हणणे, हे अनुचित आहे,’ असे पीसीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (440 of 2234 articles)

Piyush Goyal
सेवेत पारदर्शकता आणण्याचे पीयूष गोयल यांचे आदेश, नवी दिल्ली, ५ जानेवारी - ‘कृपया टिप्स देऊ नका... तुम्हाला जेवणाचे बिल मिळाले ...

×