ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत सावकारांना मागितली महत्त्वाची माहिती

रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत सावकारांना मागितली महत्त्वाची माहिती

बंगळुरू, २९ जानेवारी –

Rbi

Rbi

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व नोंदणीकृत सावकारांना (पी-टू-पी) कर्जदार, कर्जदाते, आर्थिक तपशील, सहभागींची एकूण सहभागींची संपत्ती आणि त्यांच्या एकूण व्यवसायाची तपशीलवार माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या क्षेत्राच्या सकारात्मक वाटचालीसाठी रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.
या महिन्याच्या सुरुवातील रिझर्व्ह बँकेने हे प्रश्‍न कंपन्यांना विचारले असून, दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. या क्षेत्राने नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने यावर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
ही माहिती भरून पाठवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक स्प्रेडशिट पाठवली आहे. यामध्ये निव्वळ मालकीच्या निधीची माहिती, नफा, नुकसान, परिचालन खर्च, बुडीत कर्जांची स्थिती आणि विदेशी कंपन्यांमधील गुंतवणुकीसारखी माहिती मागवण्यात आली आहे. दर तीन महिन्यांनी ही माहिती भरून पाठवावी, असे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
पारंपरिक गैर-बँकिंग संस्थांनीही ही माहिती पाठवण्याचे कठोर आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सावकारांकडून देण्यात येणार्‍या कर्जाची माहितीसाठी रिझर्व्ह बँकेने त्रैमासिक अहवालाची रचना केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या कृतीमुळे नियंत्रक संस्था यावर नजर ठेवून असल्याचेच स्पष्ट होत आहे, अशी माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली.
मागील काही महिन्यात गैर-बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या नोंदणीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर कठोरपणे नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे सावकारांना कर्ज देण्याची मर्यादा १० लाख रुपये आहे. या नियमाचे पालन केले जात आहे अथवा नाही हे तपासण्याचे कोणतेही साधन सध्या नियामक संस्थेकडे नाही. हीच मर्यादा कर्ज घेणार्‍यांसाठीही लागू आहे. गैर-बँकिंग कंपन्यांच्या स्वघोषणेवरच सध्या रिझर्व्ह बँकेला विसंबून बसावे लागत आहे.
घातलेल्या कर्जमर्यादेचे उल्लंघन तर केले जात नाही, याच्या तपासणीसाठी रिझर्व्ह बँक मागितलेल्या माहितीचा वापर करण्याची शक्यता आहे, तसेच या माहितीच्या आधारावर उल्लंघन रोखण्यासाठी नवे तंत्र विकसित केले जाऊ शकते, अशी माहिती एका गैर-बँकिंग कंपनीने दिली. रिझर्व्ह बँकेने कर्जदारांची माहिती मागितली आहे. यामध्ये प्रत्येक कर्जदाराला दिलेल्या कर्जाची माहिती द्यावी लागेल, असेही या कंपनीने सांगितले.

Posted by : | on : 30 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (113 of 2024 articles)

Mayawati Pti
यांच्या घोषणेवर मायावतींचा चिमटा, लखनौ, २९ जानेवारी - केंद्रात काँगे्रसचे सरकार आल्यास प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्न मिळेल, अशी ग्वाही देणारे ...

×