ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » रॉबर्ट वढेराच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

रॉबर्ट वढेराच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

►हरयाणातील जमीन घोटाळा प्रकरण,
नवी दिल्ली, ७ जानेवारी –

Robart Vadhra1

Robart Vadhra1

२००८ मध्ये हरयाणाच्या गुरुग्राम येथील जमिनीच्या व्यवहारात प्रचंड मोठा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या कंपनीविरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत वढेराच्या स्कायलाईट हॉस्पिलिटी प्रा. लि. कंपनीविरुद्ध फौजदारी एफआयआर दाखल केला. यामुळे वढेराच्या अडचणीत आणखीच वाढ होणार आहे.
ईडीच्या पथकाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वढेराच्या तीन सहकार्‍यांच्या घर व कार्यालयांची झडती घेतली होती. यात हाती लागलेल्या दस्तावेजांच्या आधारावर हा एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. हरयाणा पोलिसांनीही गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संरक्षण व्यवहारात वढेराच्या या तीन साथीदारांपैकी काहींनी मोठी दलाली घेतली असून, त्या पैशातून विदेशात संपत्ती खरेदी केली असल्याचा ईडीचा स्पष्ट आरोप आहे. स्कायलाईट कंपनीने २००८ मध्ये गुरुग्राम सेक्टर ८३ मधील ३.५ एकर जमीन ओंकारश्‍वर प्रॉपर्टीजकडून ७.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. त्या काळात राज्यात काँगे्रसचे सरकार होते आणि भूपिंदरसिंह हुडा हे मुख्यमंत्री होते आणि नगर नियोजन मंत्रालयाचा पदभारही त्यांच्याकडेच होता. यानंतर स्कायलाईटने हुडा सरकारच्या प्रभावाचा वापर करून वसाहत विकसित करण्याचा परवाना मिळविला आणि हीच जमीन डीएलएफला ५८ कोटी रुपयांमध्ये विकली होती. या व्यवहारात वढेराच्या कंपनीला सुमारे ५० कोटी रुपयांचा फायदा झाला होता, असे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.
ही जमीन ५८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्यानंतर हुडा सरकारने नियमांचे उल्लंघन करून डीएलएफला गुरुग्रामच्या वझिराबाद येथील ३५० एकर जमीन दिली होती. या जमिनीमुळे डीएलएफला पाच हजार कोटी रुपयांचा फायदा झाला होता. हे बेकायदेशीर सावकारीचे प्रकरण असून, यातील अमाप पैशा विदेशातील संपत्तीत गुंतवण्यात आला असल्याचे ईडीचे स्पष्ट मत आहे. या व्यवहारात दाखल दोन प्रकरणांमध्ये ईडीने वढेराची चौकशीही केली आहे.

Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (432 of 2234 articles)

Telecom Regulatory Authority Of India Trai
दिल्ली, ७ जानेवारी - फोर-जी आणि फाइव्ह-जी स्पेक्ट्रम लिलावासाठी निर्धारित करण्यात आलेली आधार किंमत कशी निर्धारित केली, हे स्पष्ट करण्याबाबत ...

×