ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » लोकसभेत गडकरींच्या विकास कामांची प्रशंसा

लोकसभेत गडकरींच्या विकास कामांची प्रशंसा

•सर्व पक्षांचा सहभाग,
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी –

Nitin Gadkari 2

Nitin Gadkari 2

भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जलसंपादन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची लोकसभेत आज गुरुवारी काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संपुआच्या अध्यक्ष सोेनिया गांधी यांच्यासह सर्व पक्षीय सदस्यांनी पक्षीय बंधने तोडत बाके वाजवून प्रशंसा केली. सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याची विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अन्य पक्षांच्या नेत्यांनीही कौतुक करण्याचा हा दुर्मिळ आणि अभूतपूर्व असे भाग्य नितीन गडकरी यांना मिळाले. मंत्री म्हणून गडकरी यांनी केलेल्या कामगिरीची सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशंसा केली.
लोकसभेत आज प्रश्‍नोत्तराच्या तासात गडकरी यांच्या खात्याशी संबंधित प्रश्‍न होते. भारतमाला प्रकल्प, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि चारधाम प्रकल्पांबाबतच्या प्रश्‍नांना उत्तर देताना, गडकरी यांनी याबाबत झालेल्या प्रगतीची माहिती दिली. हे सर्व प्रकल्प भारताच्या विकासाच्या दृष्टीने पथदर्शक ठरणार असून, देशाच्या विकासाला यामुळे गती मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या उत्तरावर प्रश्‍न विचारणार्‍या भाजपा, शिवसेना आणि काँगे्रस पक्षाच्या खासदारांनी समाधान व्यक्त केले.
माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा खासदार आला तरी, मी त्याच्या मतदारसंघातील कामाला प्राधान्य देतो, तो खासदार कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहात नाही, त्यामुळे सर्व पक्षांचे खासदार आपल्या मतदारसंघात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करतात, हे मी माझे भाग्य समजतो, असे गडकरी म्हणाले.
चारीधाम प्रकल्पांच्या संदर्भातील प्रश्‍नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, गंगा शुद्धिकरणाबाबतही माझ्या मंत्रालयाने मोठे काम केले आहे. प्रयागराज कुंभमेळ्यातील गंगा प्रथम निर्मल आणि अविरल दिसत आहे.
गंगा स्वच्छतेच्या बाबतीत झालेल्या कामांची आपण पाहणी करावी, असे आवाहनही गडकरी यांनी सभापती सुमित्रा महाजन यांना केले. गंगा शुद्धिकरणाबाबत अतिशय चांगले काम झाले आहे, असे प्रशस्तिपत्र देत, आमचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहे, असे सुमित्रा महाजन उत्स्फूर्तपणे म्हणाल्या.
गडकरी यांचे उत्तर संपताच भाजपाचे गणेश सिंह यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना उद्देशून म्हटले की, गडकरी यांनी देशाच्या विकासासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यांच्या या योगदानाबद्दल सभागृहाने एकमताने धन्यवाद प्रस्ताव पारित करायला हवा. यावर भाजपा सदस्यांनी बाके वाजवून गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. गडकरी उत्तर देत असताना, सोनिया गांधी आपल्या जागेवरून गडकरी यांचे उत्तर ऐकत होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर कौतुकाचे भाव जाणवत होते. भाजपा सदस्यांनी गडकरींच्या स्वागत-सन्मानार्थ बाके वाजवायला सुरुवात करताच, सोनिया गांधी यांनीही अतिशय उत्स्फूर्तपणे बाके वाजवून, गडकरी यांच्या कामाची काहीही न बोलता प्रशंसा केली. सोनिया गांधींनी बाके वाजवायला सुरुवात करताच, काँगे्रस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य काँगे्रस सदस्यांनीही बाके वाजवून गडकरी यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, याआधी काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरी यांची हिंमत व धाडसाची प्रशंसा केली होती. आज सोनिया गांधी यांनीही गडकरी यांच्या कामाची प्रशंसा केली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गडकरी यांच्या कामाचे देशातील जनता नेहमी कौतुक करीत असते, आज सोनिया गांधी यांनीही गडकरी यांच्या कामाची प्रशंसा करीत, विकासपुरुष म्हणून गडकरींच्या प्रतिमेला एकप्रकारे अभिवादनच केले आहे. गडकरी यांच्या सन्मानार्थ सभागृहात बराचे वेळ बाके वाजवली जात होती.

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (236 of 2216 articles)

Shaktikanta Das
पाव टक्क्याची कपात •कृषी कर्जाची मर्यादा वाढली, मुंबई, ७ फेब्रुवारी - भारतीय रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी आपल्या द्विमासिक पतधोरणाचा आढावा ...

×