ads
ads
मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

•वाराणसीत जय्यत तयारी सुरू •आज रोड शोद्वारे करणार शक्तिप्रदर्शन,…

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

•२७ सभांनी राज्यातही कमळजागर, नागपूर, २४ एप्रिल – भारतीय…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका,
नवी दिल्ली, ८ डिसेंबर –

Robart Vadhra1

Robart Vadhra1

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या कार्यालय व निवासस्थानी शुक्रवारी टाकलेल्या छाप्यांदरम्यान त्यांची विदेशातही संपत्ती असल्याचे पुरावे अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) आढळल्याची माहिती सूत्राने दिली. दरम्यान, आज शनिवारीही त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने छापे मारले व काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. बिकानेर भूखंड घोटाळा आणि पळपुटा शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी या दोन प्रकरणात दाखल एफआयआरच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
भारतासह लंडन येथे त्यांची संपत्ती असल्याची माहिती सूत्राने दिली. संरक्षण सौद्यात दलाली मिळाल्याच्या आणि विदेशात बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने रॉबर्ट वढेरा आणि काँग्रेसशी संबंध असलेल्या तिघांकडे छापेमारी केली होती. संपुआ सरकारच्या काळातील संरक्षण व्यवहारात घेण्यात आलेल्या दलालीशी संबंधित प्रकरणात वढेरा यांचे असोसिएट्स संलग्न असल्याचे ईडीला आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
ईडीने दुपारी १२ वाजल्यापासून दिल्ली एनसीआर आणि बंगळुरूत विविध ठिकाणी ही छापेमारी केली. दिल्लीतील सुखदेव विहार व्यतिरिक्त नोएडा आणि गाझियाबाद येथेही छापे घालण्यात आले होते.
मात्र, अंमलबजावणी विभागाचे अधिकारी सकाळी ८ ते ९ वाजल्यापासूनच आपल्या अशिलाच्या परिसरात होते, अशी माहिती वढेरा यांच्या वकिलाने दिली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ईडीने तीन जणांची चौकशीही केली, असे सूत्राने सांगितले. वढेरा यांच्याशी संबंधित प्रतिष्ठानांच्या दोन कर्मचार्‍यांसह एकाकडेही ईडीने छापे घातले. संरक्षण सौद्यातील दलालीची प्राप्त झालेली ही रक्कम या व्यक्तींनी विदेशात वळवून बेकायदेशीरपणे विदेशात मालमत्ता उभारल्याचा दावा ईडीतील सूत्राने केला.
एक ते दोन वर्षे जुन्या असलेल्या भूखंड घोटाळ्यात आणि भारतातून फरार झालेल्या वादग्रस्त शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारीशी संबंध असलेल्या या प्रकरणात उपलब्ध ताज्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई केली जाऊ शकते, असे सूत्राने सांगितले. मात्र, सध्या ईडीची कारवाई सुरू असल्याने छापे घातलेल्या व्यक्तींची नावे सांगण्यास किंवा कुणाविरुद्ध कारवाई करणार याची माहिती देण्यास सूत्राने नकार दिला.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड सौद्यातील मध्यस्थ मिशेल ख्रिश्‍चियनला सीबीआयने दुबई येथून भारतात आणल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई सुरू केली आहे.
सहकारी जगदीश शर्माला अटक
रॉबर्ट वढेरा यांचा निकटचा सहकारी जगदीश शर्माला अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज शनिवारी अटक केली. तो काँग्रेसचा कार्यकर्ताही आहे.
संपुआ सरकारच्या काळात झालेल्या काही संरक्षण सामग्री खरेदी व्यवहारांमध्ये वढेरा यांच्याशी संलग्न असलेल्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची दलाली मिळाल्याचे ईडीच्या तपासात उघड झाल्यानंतर, ईडीच्या विविध पथकांनी शुक्रवारी दिल्ली आणि बंगळुरू येथील या कंपन्यांच्या कार्यालयांची झडती घेतली होती. या कारवाईत वढेरा यांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरांवरही छापे टाकले होते. संरक्षण व्यवहारात मिळालेला दलालीचा पैसा या कंपन्यांनी विदेशात गुंतवला असल्याचा ईडीचा आरोप आहे.
या धाडीनंतर ईडीने आज शनिवारी वढेरा यांचे निटकवर्तीय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जगदीश शर्माला अटक केली. शर्मा चौकशीत सहकार्य करीत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्राने सांगितले.
दरम्यान, मोदी सरकार वढेरा यांना गोवण्याचा प्रयत्न करीत असून, माझ्या घरावर याच सूडापोटी शुक्रवारी छापा टाकण्यात आला होता. माझ्या घरात काहीच न सापडल्याने आता मला ताब्यात घेतले जात आहे, असे शर्मा म्हणाला.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (794 of 2424 articles)

Finance Ministry
घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर - फ्लॅटची विक्री करताना बिल्डरने जर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी केले असेल, तर त्या ...

×