ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » वाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही

वाढणार नाही कर्जाचे ओझे; व्याजदरात बदल नाही

►तेलाच्या किमतीमुळे महागाईची शक्यता
►आरबीआयचे पतधोरण जाहीर
मुंबई, ५ ऑक्टोबर –

Urjit Patel Rbi Governer

Urjit Patel Rbi Governer

वाढत्या महागाईमुळे भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख कर्जांवरील व्याजदरात किमान ०.२५ टक्के वाढ करेल, अशी अर्थतज्ज्ञांची अपेक्षा असताना आरबीआयने आज शुक्रवारी व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने देशात महागाईचा भडका उडू शकतो, अशी भीती आरबीआयने व्यक्त केली. परंतु, महागाईचा दर ४ टक्क्यांच्यावर जाणार नाही, याची काळजी रिझर्व्ह बँक घेणार आहे.
कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम केवळ महागाईवरच नव्हे, तर देशाच्या आर्थिक विकासावरही होण्याची शक्यता आहे. एकूणच स्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे, असे चौथ्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने आरबीआय व्याजदरात किमान ०.२५ टक्के वाढ करेल, असा जाणकारांचा अंदाज होता, तर रुपयाचे विक्रमी अवमूल्यन होत असल्याने व्याजदरात ०.५० टक्क्यांची वाढ होईल, असे अर्थतज्ज्ञांचे मत होते. तथापि, हे दोन्ही अंदाज आरबीआयने खोटे ठरवत व्याजदर पूर्वीच्याच स्तरावर कायम ठेवला.
आरबीआय इतर बँकांना ज्या व्याजदरावर अर्थपुरवठा करते तो रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवण्यात आला, तर बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी आरबीआयकडे जमा करतात आणि त्यावर आरबीआय ज्या दराने व्याज देते, तो रिव्हर्स रेपो दरही ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील आर्थिक विकासाचा दर ७.४ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे, तर, २०१९-२० या वर्षांत तो ७.६ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
रेपो दरात बदल न करता भविष्यात कठोर आर्थिक निर्णय घेतले जातील, असे संकेत ऊर्जित पटेल यांनी दिले. याचा अर्थ येत्या काळात दर वाढतील किंवा कायम राहतील, पण कमी होण्याची शक्यता नाही. महागाईचा दर कुठल्याही स्थितीत ४ टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याची ग्वाही पटेल यांनी दिली.
ठळक मुद्दे
रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, रिव्हर्स रेपो दरातही बदल नाही, ऑक्टोबर ते मार्च या काळात महागाईचा दर चारपर्यंत जाणार, चालू आर्थिक वर्षात जीडीपी ७.४ टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा, तेलाच्या वाढत्या किमती चिंताजनक विषय, पुढील पतधोरण आढावा ३ ते ५ डिसेंबर

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (331 of 1905 articles)

Rajnath Singh 11
यांचा दावा, नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर - जम्मू-काश्मीरमधील तणावासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे स्पष्ट करीत, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथील ९० ...

×