ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » वारंवार सांगूनही ऐकले नाही म्हणून ठोकले

वारंवार सांगूनही ऐकले नाही म्हणून ठोकले

•परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची भूमिका,
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी –

Forign Secretary Vijay Gokhale

Forign Secretary Vijay Gokhale

भारतीय वायुसेनेच्या मिराज विमानांनी पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हवाई सर्जिकल स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे कमांडर, आत्मघाती अतिरेकी तसेच त्यांना प्रशिक्षण देणारे मोठ्या संख्येत मारल्या गेल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज सांगितले.
भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या दुसर्‍या यशस्वी तसेच अतिशय धाडसी अशा सर्जिकल स्ट्राईकनंतर परराष्ट्र मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत एका निवेदन वाचून दाखवत गोखले म्हणाले की, जैश-ए-मोहम्मद भारतात आणखी आत्मघाती हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थाकडून मिळाल्यानंतर, अशी कारवाई करणे आवश्यक झाले होते, त्यामुळे पाकिस्तानातील जैशच्या बालाकोट येथील सर्वांत मोठ्या तळावर ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात मोठ्या संख्येत जैशचे कमांडर, अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे मारले गेले.
भारताला भेडसावणारे संभाव्य आत्मघाती हल्ले रोखण्यासाठी अशी एकतर्फी कारवाई करणे भारतासाठी आवश्यक झाले होते. बालाकोटच्या घनदाट जंगलातील पर्वतावर असलेल्या जैशच्या प्रशिक्षण तळावर ही कारवाई करण्यात आली, हा भाग नागरी वस्तीपासून खूप दूर होता.
जैशचा सूत्रधार मसूद अझहरचा जवळचा नातलग असलेल्या मौलाना युसुफ अझहर उर्फ उस्ताद गौरीकडे या प्रशिक्षण तळाची जबाबदारी होती. तोही या हल्ल्यात मारल्या गेला. या तळावर आत्मघाती अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात होते, असे त्यांनी सांगितले.पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेच्या जिवाला धोका पोहोचू नये, म्हणून हल्ल्यासाठी या ठिकाणाची निवड करण्यात आली. भारताला उद्भवणार्‍या दहशतवादी धोक्याचा सामना करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी भारत पूर्णपणे दृढसंकल्प आहे.
जैश-ए-मोहम्मद गेल्या २० वर्षांपासून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत आहे. आत्मघाती अतिरेक्यांना प्रशिक्षण तसेच शस्त्रास्त्र पुरवणार्‍या जैशविरुद्ध कारवाई करावी, अशी विनंती आम्ही सातत्याने पाकिस्तानला केली होती, मात्र पाकिस्तानने आपल्या जमिनीवर असलेली जैशची प्रशिक्षण शिबिरे नष्ट करण्यासाठी कोणतीच ठोस अशी कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने ही कारवाई करावी लागली, असे त्यांनी स्पष्ट केले.
२००४ च्या संयुक्त निवेदनानुसार आपल्या भूमीचा उपयोग भारतविरोधी कारवायांसाठी होऊ न देण्याच्या निर्धाराची पाकिस्तान अंमलबजावणी करेल, तसेच आपल्या जमिनीवरील जैशच्या प्रशिक्षण शिबिरांवर कठोर कारवाई करेल, असा विश्‍वास गोखले यांनी व्यक्त केला. या हवाई हल्ल्याबाबतचा अन्य कोणताही तपशील सांगण्यास नकार देत गोखले यांनी याबाबत आम्ही आणखी माहिती गोळा करत असल्याचे स्पष्ट केले.

Posted by : | on : 26 Feb 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (138 of 2216 articles)

Surgical Strike 2 2019b
दिल्ली, २६ फेब्रुवारी - पुलवामा येथील भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत असतानाच, भारताने आज मंगळवारी ...

×