ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय, विदर्भ » विदर्भात ६२ टक्के मतदान

विदर्भात ६२ टक्के मतदान

Mohan Bagwat Voting

Cm Dev Fadanvis Voting

Baiyyaji Joshi Voting

Nitin Gadkari Voting

•११६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
•लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान,
नागपूर/मुंबई, ११ एप्रिल –

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी आज गुरुवारी सुमारे ६२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. अतिशय कडेकोट सुरक्षेसह सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. भाजपा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरात ५५ टक्के मतदानाची नोंद झाली. शहरी भागपेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी जास्त असून, गडचिरोलीसारख्या दुर्गम व आव्हानात्मक भागात चांगले मतदान झाल्याचे दिसून आले. एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी घडवून आणलेला स्फोट तसेच एटापल्ली तालुक्यात बेस कॅम्पवर परतणार्‍या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्याने, निवडणुकीला गालबोट लागले.
पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागपूर मतदारसंघात ५५.१३ टक्के, वर्धा मतदारसंघात सुमारे ६५ टक्के, चंद्रपूर येथे ६५.९७ टक्के, रामटेक येथे ५८ ते ६० टक्के, भंडारा-गोंदिया ६९ ते ७१ टक्के, तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात ६१ टक्के मतदान झाले आहेत. गोंदिया आणि गडचिरोली येथील काही भागांमध्ये मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतची होती. यवतमाळ-वाशीममध्ये अंदाजे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
सात मतदारसंघात ११६ उमेदवार
विदर्भातील मतदान झालेल्या सात मतदारसंघांमध्ये एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपुरात, तर सर्वांत कमी पाच उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदारसंघांमध्ये आहेत. भंडारा-गोंदिया व वर्धा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १४, तर चंद्रपुरात १३, यवतमाळला २४ आणि रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार आहेत.
नक्षल्यांनी घडविला स्फोट
गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारनंतर वाढले. साधारण ६१ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी मतदान केंद्राच्याजवळ नक्षल्यांनी एक स्फोेट घडवून आणला. तसेच एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी मतदान केंद्रावरून बेस कॅम्पवर परत येत असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केला. तर नक्षल्यांच्या हल्ल्याची भीती लक्षात घेऊन कोरची तालुक्यातील काही मतदान केंद्राचे ठिकाण बदलविण्यात आले. जखमी शिपायांना तातडीने हेलिकॉफ्टरने नागपूरला हलविण्यात आले.
नागपूर ५८, रामटेकमध्ये ६१ टक्के
राज्यातील नव्हे तर देशातील प्रतिष्ठेची लढत असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात आज दिवसभरात सरासरी ५८ टक्के, तर रामटेक मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
नागपूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. नागपूर मतदारसंघात एकूण ३० उमेदवार रिंगणात होते. त्या तुलनेत रामटेक मतदारसंघात निम्मे म्हणजे १६ उमेदवार होते. केवळ ‘नोटा’ या पर्यायासाठी दोन ईव्हीएम ठेवाव्या लागल्या. रामटेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार कृपाल तुमाने व काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांनी नागपूर शहरातील मतदान केंद्रावर मतदान केले.
अनेक ठिकाणी ईव्हीएमब्च्या तक्रारी
दरम्यान, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांमधून ईव्हीएमबाबतच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जम्मूतील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमचे बटनच दबत नसल्याची तक्रार काही मतदारांनी केली. आंध्र आणि तेलंगणातूनही ईव्हीएममध्ये बिघाड असल्याच्य तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या आहेत.
विदर्भात रात्री ९ नंतरही मतदान सुरू
रात्री नऊ वाजल्यानंतरही काही मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे रांगेतील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी मतदानाची वेळ वाढविण्यात आली होती, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रपरिषदेत दिली.
विविध यंत्रणांच्या मदतीने आतापर्यंत १०४ कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. यात ३५ कोटींची रोकड, ४४ कोटींचे दागिने तर पाच कोटींच्या अंमली पदार्थांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.
मान्यवरांनी केले मतदान
पहिल्या टप्यात विदर्भात महत्त्वाच्या व्यक्तींनी मतदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी नागपुरात, तर कामठीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रपुरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, गोंदियात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तर यवतमाळात पालकमंत्री मदन येरावार, संजय राठोड यांनी मतदान केले.
अन्य राज्यांतील टक्केवारी
महाराष्ट्रातील सात जागांशिवाय, देशातील १९ राज्यांमधील ८४ जागांसाठीही आज मतदान घेण्यात आले. यात उत्तराखंडमधील पाच जागांसाठी ५७ टक्के, आंध्रप्रदेशातील २५ जागांसाठी ७३ टक्के, तेलंगणातील १७ जागांसाठी ६० टक्के, ओडिशातील ४ जागांसाठी ६८ टक्के, छत्तीसगडमधील एका जागेसाठी ५६ टक्के, उत्तरप्रदेशच्या ८ जागांसाठी ६६ टक्के, बिहारातील ४ जागांसाठी ५३ टक्के, बंगालच्या कुचबेहार आणि अलिपूरद्वार या दोन जागांसाठी ८१ ते ८२ टक्के, त्रिपुरातील एका जागेसाठी ८१ टक्के, सिक्कीमच्या एका जागेसाठी ६८ टक्के, जम्मू-काश्मिरातील दोन जागांसाठी ६८ टक्के, लक्षद्वीपच्या एका जागेसाठी ५० टक्के, मेघालयातील दोन जागांसाठी ५६ टक्के, आसामातील पाच जागांसाठी ६८ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी आयोगातर्फे देण्यात आली असून, ही टक्केवारी वाढण्याची शक्यताही आयोगाने वर्तवली आहे.

Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय, विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय, विदर्भ (58 of 2422 articles)

Smriti Irani11
इराणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अमेठी, ११ एप्रिल - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज गुरुवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला ...

×