ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » विमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार

विमानाची किंमत जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार

►राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय,
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

फ्रान्सकडून ३६ राफेल युद्धविमाने खरेदी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. सुमारे पाच तास ही सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान सर्व संबंधित पक्षकारांनी आपले म्हणणे मांडले. याचिकाकर्ते आणि सरकारसह वायुसेनेच्या अधिकार्‍यांची बाजूही न्यायालयाने ऐकली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या न्यायासनाने हा निर्णय राखून ठेवला. राफेलची किंमत सार्वजनिक करण्यास मात्र न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. राफेलची किंमत सार्वजनिक करावी, अशी मागणी करणार्‍या याचिकाकर्त्यांनी केली होती.
सरकारी आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांमध्ये यावेळी युक्तिवादाच्या फैरी झडल्या. सरकारतर्फे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. वायुसेनेला राफेल विमानांची तत्काळ गरज होती. कारगिल युद्धावेळी आपण आपले अनेक सैनिक गमावले. त्यावेळी आपल्याकडे राफेल युद्धविमाने असती, तर कमी नुकसान झाले असते, असे त्यांनी न्यायालयास सांगितले
दसाँ कंपनीने सरकारला ऑफसेट भागीदारांची माहिती दिलेली नाही. त्यांना दसाँने निवडले आहे. सरकारची यात कोणतीही भूमिका नाही, असे वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले. फ्रान्सने या ३६ विमानांची कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. केवळ पंतप्रधानांनी लेटर ऑफ कम्फर्ट दिले आहे, असेही केंद्र सरकारच्या त्यांनी न्यायालयाला सांगितले.
याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने एअर व्हाइस मार्शल चलपति यांचीही साक्ष घेतली. संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनाही प्रश्‍न विचारण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद केला.
किंमत ४० टक्के जास्त ः प्रशांत भूषण
याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले. राफेल करारात नियमांचे उल्लंघन करण्यात आले. मोदी सरकारने केलेल्या करारातील किमती आधीपेक्षा ४० टक्क्यांनी जास्त आहे. राफेल करारातील विमानांची किंमत सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करता येत नाही. हा सरकारचा दावाही खोटा असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.
राफेल करारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मनोहरलाल शर्मा व विनीत धांडा यांनी याचिका केली होती. यानंतर आपचे खासदार संजय सिंह, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, प्रशांत भूषण यांनीही पूरक याचिका सादर केल्या. बुधवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी सरकारची बाजू मांडणार्‍या महान्यायवाद्यांनी पंतप्रधान आणि फ्रान्सने एप्रिल २०१५ मध्येच राफेल कराराची घोषणा कशी केली? यात ३६ लढाऊ विमाने घेण्याची घोषणा त्यांनी कशी केली? प्रत्यक्षात राफेल कराराला संरक्षण विषयक संसदीय समितीने सप्टेंबर २०१६ मध्ये हा करार करण्यास मंजुरी दिली होती, यावर उत्तर देण्याची मागणी केली.
खासदार संजय सिंह यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, २५ मार्च २०१५ पर्यंत राफेल करारात १२६ लढाऊ विमाने घेण्यात येणार होती. यातील १०८ विमाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडतर्फे तयार केली जाणार होती. पण, दोन आठवड्यात निर्णय बदलला. १० एप्रिल २०१५ रोजी भारत आणि फ्रान्सने संयुक्त पत्रकार परिषदेत राफेल कराराची घोषणा केली आणि यात ३६ विमाने भारताला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने संरक्षण अधिग्रहण मंडळाने १२६ विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मग, नवीन करारात फक्त ३६ विमाने घेण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, नवीन करारातही पेक्षा जास्त विमानांची खरेदी करणे अपेक्षित होते, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 15 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (541 of 2060 articles)

Currency1 500rs New Note Bundle
दिल्ली, १४ नोव्हेंबर - खासगी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांसाठी खुशखबर आहे. आता ग्रॅच्युइटी लागू होण्यासाठी एखाद्या कंपनीत पाच वर्षे थांबण्याची ...

×