ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » विरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन

विरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन

►किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे दिल्लीत मोर्चा,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –

Kisan Rally Rahulgandhi

Kisan Rally Rahulgandhi

आपल्या १५ उद्योगपती मित्रांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी माफ करू शकतात, मग त्यांनी देशातील शेतकर्‍यांचेही कर्ज माफ केले पाहिजे, असे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी व्यक्त केले. विरोधी पक्षांच्या एकतेचा हवाला देत गांधी म्हणाले की, आमची सर्वांची विचारधारा वेगवेगळी असली तरी देशातील कर्जबाजारी शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी आम्हाला एकत्र यावेच लागेल. मोर्चात सहभागी सर्वपक्षीय नेत्यांनी मोदी सरकारला शेतकरीविरोधी ठरवत त्यावर जोरदार हल्ला चढवला.
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील दोनशेवर शेतकरी संघटनांचा समावेश असलेल्या अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे रामलीला मैदानातून काढण्यात आलेल्या किसान मुक्ती मार्चने आज संसदभवनावर धडक दिली. यावेळी संसदमार्ग पोलिस ठाण्यासमोर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होेते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारूक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, सपाचे खा. धर्मेद्र यादव, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, पत्रकार पी. साईनाथन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, किसान सभेचे हन्नान मोल्ला, किसान महासभेचे अतुलकुमार अनजान, शेतकरी नेते व्ही. एम. सिंह, काँग्रेसच्या शेतकरी शेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही, मात्र त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवला होता. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीही मार्चला पाठिंबा जाहीर केला होता.
कर्जबाजारी शेतकरी आणि बेरोजगार युवकांच्या प्रश्‍नावर आम्ही कायदा बदलण्याची, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बदलण्याची वेळ आली तरी आम्ही ते सारे बदलू, असेही ते म्हणाले.
संपुआच्या काळात शेतकर्‍यांसाठी खूप काही करण्यात आले, मात्र या सरकारने काहीच केले नाही. शेतकर्‍यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे, अशी मागणी करत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून आम्ही संघर्ष करू, असे शरद पवार म्हणाले.
पीकविमा योजना म्हणजे शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक आहे. शेतकर्‍यांवर भाजपाने टाकलेला हा दरोडा आहे, त्यामुळे सरकारने ही पीकविमा योजना बंद करावी, आणि तीन वर्षांत या योजनेसाठी शेतकर्‍यांकडून जी वसुली करण्यात आली, ती त्यांना परत करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. शेतकर्‍यांच्या विरोधात भूमिका घेतली तर पुढच्या वेळी दिल्लीत सरकार बनवता येणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.
शेतकर्‍यांनी दिली संसद भवनावर धडक
शेतकर्‍यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात यावा, डॉ. स्वामीनाथन् समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, वीज बिल माफ करण्यात यावे, तसेच शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आज रामलीला मैदानावरुन हजारोंच्या संख्येतील शेतकर्‍यांनी संसदभवनावर धडक दिली.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (464 of 2053 articles)

Bipin Rawat Pti
३० नोव्हेंबर - भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध हवे असतील, सर्व मुद्यांवर मोकळ्या वातावरणात चर्चा करायची असेल, तर सर्वप्रथम स्वत:ला इस्लामिक राष्ट्र ...

×