ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » वैमानिकासाठी सौदेबाजी नाही

वैमानिकासाठी सौदेबाजी नाही

नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी –

Sansad Top

Sansad Top

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना समोर करून पाकिस्तान सौदेबाजी करू शकत नाही आणि भारत त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानसोबत चर्चा किंवा सौदेबाजी कदापि करणार नाही, अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ सूत्रांनी आज गुरुवारी दिली.
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची भारतीय दूतावासाच्या अधिकार्‍यांसोबत भेट घडवण्याची परवानगी भारताने पाकिस्तानकडे मागितलेली नाही. त्यांना विनाअट तत्काळ सोडले जावे यावर केंद्र सरकार भर देत आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खोटारडेपणा पाकिस्तानकडून केला जात असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
पाकिस्तानी वायुदल भारतीय लष्करी तळांवर आक्रमण करीत असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या राजदूतांना दिली आहे. भारतीय वायुदलाने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केल्यावर बुधवारी पाकिस्तानी वायुदलाने काश्मिरात हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी होत असल्याचे सांगितले होते. याबाबत प्रश्‍न विचारला असता, त्यांचा नेमका उद्देश काय होता, याबाबत भारताला माहिती नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान वैमानिकाच्या सुटकेचा मुद्दा वापरण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पाकिस्तानची ही चाल भारत यशस्वी होऊ देणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
भारताने तणाव कमी केल्यास पाकिस्तान सरकार वैमानिकाची सुटका करण्याचा विचार करेल, असे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमुद कुरेशी यांनी सांगितले होते.
अभिनंदन यांना कोणतेही नुकसान न करता, विनाअट तत्काळ सुटका करण्यात यावी. ते सौदेबाजीचे माध्यम नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानसोबत सौदेबाजी करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे सूत्रांनी सांगितले. पुलवामा येथे जैशने १४ जानेवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांवर तत्काळ कारवाई करावी, त्या कारवाईची पडताळणी केली जाईल, यावर भारताने जोर दिला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला असता, अगोदर जैश-ए-मोहम्मदवर ठोस कारवाई करा, असे भारताने त्यांना खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली. युद्धज्वर पसरवण्याचा आणि उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक केला जात आहे.
हवाई चकमकीमध्ये भारताची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली, असे इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, एक तर त्यांना चुकीची माहिती देण्यात आली असावी किंवा ते खोटे बोलले, असेही सूत्रांनी सांगितले. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला असताना पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले. पाकिस्तानने सर्वप्रथम दहशतवादाविरोधात ठोस आणि विशिष्ट पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे इम्रान खान यांनी ठेवलेल्या चर्चेच्या प्रस्तावाबाबत उत्तर देताना सूत्रांनी सांगितले.
मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यांबाबत पाकिस्तानला कारवाईयोग्य माहिती दिल्यानंतरही त्याचा परिणाम न झाल्याने भारताने पुलवामा हल्ल्याबाबत कारवाईयोग्य गोपनीय माहिती भारताने पाकिस्तानला दिलेली नाही. याऐवजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानची २० लढाऊ विमाने भारतीय हवाई हद्दीच्या दिशेने झेपावली होती. मात्र, त्यापैकी काहीच विमानांना नियंत्रण रेषा ओलांडता आली त्यांनी भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लेझर गायडेड बॉम्बचा वापर केला. परंतु, त्यांचा नेम चुकला, असे सांगताना, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय लष्करी तळांवर हल्ला केलेला नसल्याचा इम्रान खान यांनी केलेला दावा फेटाळला.

Posted by : | on : 1 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (126 of 2216 articles)

Meeting Pm Modi
दिल्ली, २८ फेब्रुवारी - पाकिस्तानसोबतचा वाढलेला तणाव आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय वैमानिकाला सोडण्याची घोषणा केल्यावर आज गुरुवारी ...

×