ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमात महिलांची भरारी!

व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमात महिलांची भरारी!

मुंबई, १५ डिसेंबर –

Women Business Managment

Women Business Managment

व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याकडे आता महिलांचा कल वाढत आहे. अधिकाधिक महिला व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तब्बल ५५ टक्के महिला व्यावसायिकांनी पदवी व्यवस्थापन प्रवेश चाचणी (जीएमएटी) दिल्याची माहिती पदवी व्यवस्थापन प्रवेश परिषदेने दिली. अलीकडच्या काही वर्षांत महिला प्रवेशाचे प्रमाण एका निश्‍चित प्रमाणात वाढत असल्याचेही परिषदेने स्पष्ट केले.
महिलांचा कारकिर्दीबाबतचा आत्मविश्‍वास अधिक दृढ होत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रामधील स्त्री-पुरुषांमधील समानतेच्या धोरणामुळेही त्यांना प्रोत्साहन मिळत असून, तंत्रज्ञान ते उत्पादन क्षेत्रामध्ये व्यावसायिक महिलांची मागणी वाढली आहे. ज्या महिला कामाला प्राधान्य देतात त्यांची कारकीर्द फुलवण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव न करणार्‍या कित्येक कंपन्या आहेत. या कंपन्या महिलांना प्राधान्य देतात, अशी माहिती इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे (आयएसबी) सहयोगी अधिष्ठाते चंदन चौधरी यांनी दिली. केवळ महिलांनाच प्राधान्य देणार्‍या कंपन्या कॅम्पस सिलेक्शनसाठी येतात, असेही त्यांनी सांगितले.
आयएसबीमध्ये प्रवेश घेणार्‍या महिलांचे प्रमाण यंदा ३४ टक्क्यांनी वाढले. या संस्थेमध्ये यंदा एकून ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. २०१६ मध्ये या संस्थेमध्ये एकूण ८१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामध्ये महिलांचे प्रमाण २९ टक्के होते. आयएसबीमधील विद्यार्थ्यांचा सरासरी अनुभव पाच वर्षांचा आहे.
२५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसह एकूण महिलांची जीएमएटीमधील उपस्थितीचे प्रमाण वाढल्याचेही आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. २०१८ मध्ये एकूण ३२,६१३ विद्यार्थ्यांनी पदवी व्यवस्थापन प्रवेश चाचणी दिली यामध्ये महिलांचे प्रमाण ३२ टक्के होते. याच्या तुलनेत २०१४ मध्ये २७ टक्के महिलांनी चाचणी दिली होती. त्यापैकी निम्म्या महिला २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. आपल्या कारकिर्दीला आकार देण्याबाबत भारतीय महिला व्यवसायिक जास्तीत जास्त सकारात्मक पुढाकार घेत आहेत, असे अवतार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सौंदर्य राजेश यांनी सांगितले.

Posted by : | on : 16 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (181 of 1851 articles)

Court Rafel
करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व याचिका फेटाळल्या • ►राहुल गांधी तोंडघशी; काँगे्रस पक्षाला जबरदस्त चपराकच, नवी दिल्ली, १४ ...

×