ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » व्हीडिओ रेकॉर्डिंगसाठी अभिनंदन यांना थांबवून ठेवले

व्हीडिओ रेकॉर्डिंगसाठी अभिनंदन यांना थांबवून ठेवले

नवी दिल्ली, २ मार्च –

Abhinandan Returns

Abhinandan Returns

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना तीन दिवसांनंतर भारताच्या सुपूर्द करण्यात आले. मात्र, त्यांना सोडण्याची वेळ पाकिस्तानने दोन वेळा पुढे ढकलली. अभिनंदन यांच्या निवेदनाचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी त्यांना वाघा बॉर्डरवर थांबवून ठेवण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनेव्हा करारानुसार, भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळीच अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यात येणार होते. मात्र, वाघा बॉर्डरवर आणूनही त्यांना सोडण्याची वेळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. अभिनंदन यांचा व्हीडिओ रेकॉर्ड करायचा असल्याने पाकिस्तानने ही दिरंगाई केली. हा व्हीडिओ पाकिस्तान त्यांची बाजू जगापुढे मांडण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे.
घृणास्पद राजकारण : संहिता पुढ्यात ठेवून केले बाध्य
लढाऊ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना दिवसभराच्या विलंबानंतर भारताच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, यावेळी पाकिस्तानने घाणेरडे राजकारण केले. त्यांना सोडण्याआधी पाकिस्तानचे गुणगान करायला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भाग पाडले. भारतीय प्रसारमाध्यमे कशा अफवा पसरवतात, त्यावरही त्यांना बोलायला बाध्य केले. पाकिस्तानने १.२४ मिनिटांचा हा व्हीडिओ सुटकेआधी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिला असून, यामध्ये तब्बल १७ कट्स दिलेले आहेत. या व्हीडिओमध्ये तीन दिवसांमधील घटनाक्रम सांगण्यास त्यांना भाग पाडले आहे.
पाकिस्तानी हवाई हद्दीमध्ये मी लक्ष्य शोधण्याचा प्रयत्नात आलो असता, पाकिस्तानच्या विमानांनी माझे विमान पाडले. पॅराशूटच्या साहाय्याने मी खाली आलो. माझ्याकडे पिस्तुल होते. खूप लोक सभोवताल जमले होते. ते जोशात होते. दोन पाकिस्तानी जवान आले. त्यांनी मला वाचविले. पाकिस्तान आर्मीचे कॅप्टनही होते. त्यांनी मला काही होऊ दिले नाही. त्यानंतर युनिटपर्यंत मला नेण्यात आले. तेथे माझ्यावर प्रथमोपचार करण्यात आले, असे वर्तमान यांच्याकडून वदवून घेण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कर एक व्यावसायिक संस्था असून, शांततेची प्रतीक आहे. त्यांच्यासोबत मी चांगला वेळ घालविला. भारतीय माध्यमे छोट्या-छोट्या गोष्टी तिखट मसाला लावून सांगतात आणि लोकांना भडकावितात, असेही त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, लोकांमध्ये जोश जास्त होता, हे सांगताना विंग कमांडर वर्तमान अडखळले आणि दुसरीकडे पाहून बोलले, हे या व्हीडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. याचा अर्थ त्यांच्यासमोर निवेदनाची संहिता ठेवण्यात आली होती व त्यांच्याकडून पाकिस्तानचे गुणगाण आणि भारतीय माध्यमांविरोधात वदवून घेण्यात आल्याचे अगदी स्पष्ट होते.
ही माझी शिकार… अन् उडवल्या पाकी ‘एफ-१६’च्या ठिकर्‍या!
भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी दाखवलेल्या शौर्याची ही कहाणी…. मिग-२१ विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी पुढ्यात पाकिस्तानी एफ-१६ विमान दिसताच ही ‘माझी शिकार आहे,’ असा संदेश सहकार्‍यांना दिला आणि पुढच्या ८६ सेंकदात या विमानाच्या ठिकर्‍या उडवल्या, अशी माहिती आता पुढे आली आहे.
पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ-१६ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करताच, भारताच्या हवाई दलाची विमाने आकाशात झेपावली. नौशेरा विभागात भारत आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये चकमक सुरू झाली. कुरघोडी आणि हुलकावण्यांची ‘डॉग फाईट’ सुरू झाली. अभिनंदन वर्तमान यांचे मिग-२१ विमान १५ हजार फुट उंचीवर होते. तर, एफ-१६ विमान ८ हजार फुट उंचीवर! एकमेकांना चुकविण्याचा खेळ २६ हजार फुट उंचीपर्यंत पोहोचला. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-१६ विमानावर आर-७३ क्षेपणास्त्र डागले. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एफ-१६ विमानाच्या वैमानिकाने मिग-२१ विमानावर पलटवार केला.
या चकमकीत दोन्ही विमाने कोसळली. प्रसंगावधान राखून अभिनंदन वर्तमान विमानातून बाहेर पडले. मात्र, हवेच्या झोतामुळे त्यांचे पॅराशूट गुलाम काश्मीरमध्ये पोहचले. ते पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले.
दरम्यान, ते तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांना भारताच्या स्वाधीन केले.
अभिनंदन परतण्यामागे मोदी : स्मृती इराणी
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या मायदेशी परतण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विजय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शनिवारी येथे केले. भाजपा नेते सुधांशू मित्तल यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील ‘आरएसएस : बिल्डिंग इंडिया थ्रू सेवा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय प्रवासी केंद्रात हा प्रकाशन सोहळा झाला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप अभिमान असेल की आपल्या स्वयंसेवकाच्या पराक्रमामुळे भारताचा सुपुत्र इतक्या लवकर मायदेशी परतला आहे. हे वक्तव्य करताना त्यांचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपात येण्यापूर्वी संघाचे प्रचारक होते, हे येथे उल्लेखनीय. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्तमान यांची सुटका केली. रात्री अभिनंदन यांनी मायभूमीत प्रवेश केला.

Posted by : | on : 3 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (116 of 2216 articles)

Abhinandan Returns
सरकारची कूटनीतीचे यश, नवी दिल्ली, १ मार्च - पाकिस्तानी वायुदलाने काश्मीरमधील भारतीय तळाला लक्ष्य करण्यासाठी धाडलेल्या लढाऊ एफ-१६ विमान पाडताना ...

×