ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » शरदराव, तुम्हीपण फुटीरतावाद्यांसोबतच!

शरदराव, तुम्हीपण फुटीरतावाद्यांसोबतच!

•पंतप्रधानांच्या कानपिचक्या
•पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँगे्रसच जबाबदार,
औसा (लातूर), ९ एप्रिल –

Pm Modi Bhagwa

Pm Modi Bhagwa

राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार फुटीरतावादी लोकांसोबत उभे आहेत. शरदराव तुम्हाला हे शोभते का? राजकारण वेगळी गोष्ट ,मात्र शरद पवार तिकडे शोभत नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना कानपिचक्या दिल्या. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँगे्रसची चुकीची धोरणेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुलां यांना वेगळा पंतप्रधान हवा आहे. काँगे्रसचे त्यांना समर्थन आहे आणि आता त्यांच्यासोबत शरद पवारही उभे झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी लातूर जिल्ह्यातील औसा येथे आयोजित भव्य जाहीर सभेत सांगितले. महायुतीच्या या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी प्रथमच एका मंचावर आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर, सुधाकर शृंगारे उपस्थित होते.
काँग्रेस आणि पाकिस्तानचे विचार एकसारखेच आहेत. काँग्रेसला अक्कल असती तर देशाची फाळणी होऊ दिली नसती. जे पाकिस्तान म्हणतो तेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसते. ज्या लोकांना आपल्याच सैनिकांवर विश्‍वास नाही, त्यांना शिक्षा द्यायलाच हवी, असे मोदी यांनी सांगितले.
बाळासाहेबांचा मताधिकार काढला
काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नागरिकत्व हिरावून, त्यांचा मताधिकार काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखविणार्‍या काँग्रेसने आरशात स्वत:चे तोंड बघावे, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्‍वासन दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना असलेला अधिकार काढून टाकावा, ही पाकिस्तानचीही इच्छा आहे. देशाच्या विरोधात बोलणार्‍यांविरोधात असणारे देशद्रोहाचं कलमही काँग्रेसला मान्य नाही. पाकिस्तानला पूरक भूमिका घेण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
समर्थ, संपन्न भारतासाठी भगव्याला विजयी करा : उद्धव ठाकरे
मोदी सरकार पाकिस्तानला नुसते ठोकणार, असे बोलत नाही तर ठोकते. मोदीजी, यापुढे पाकिस्तानला कुरापत काढण्याइतकेही शिल्लक ठेवू नका, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते लातूर औसा येथील
महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे म्हणजे करायचेच. समर्थ, संपन्न भारतासाठी भगव्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपन्यांचे कार्यालय असले पाहिजे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.
रझाकारांच्या वेळेस जसे वल्लभभाई मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले, सैन्य घुसवण्याच्या निर्णयावर कायम राहिले तसेच मोदीजी तुम्ही मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहा, असे उद्धव म्हणाले. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार चांगले काम करीत असल्याचे सांगितले. भाजपाच्या जाहीरनाम्यातील मुद्यांचेही त्यांनी कौतुक केले. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे थापा असल्याचेही उद्धव म्हणाले.
पहिले मत शहीदांच्या शौर्याला
प्रथमच मतदार करणार्‍यांना नरेंद्र मोदी यांनी आवाहन करीत म्हटले की, प्रथमच मतदान करणार्‍यांना मी प्रार्थना करतो की, खूप समजून-उमजून मत द्यायचे आहे. तुम्ही तुमचे मत, देशासाठी शहीद होणार्‍या वीर जवानांना समर्पित करू शकता. तुमचे मत गरिबांना स्वत:चे घर, इस्पितळात मोफत उपचार मिळावा, यासाठी समर्पित करू शकता.

Posted by : | on : 10 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (70 of 2407 articles)

Bjp Flag
वृत्तवाहिन्या, संस्थांचे सर्वेक्षण, नवी दिल्ली, ९ एप्रिल - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होत असून, निवडणूकपूर्व जनमत ...

×