ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » शेअर बाजार गडगडला

शेअर बाजार गडगडला

►निर्देशांकात ५७२ अंकांची घसरण
►अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची शक्यता
►२.२८ लाख कोटींचे नुकसान,
मुंबई, ६ डिसेंबर –

Sharemarket Stock Exchange

Sharemarket Stock Exchange

शेअर बाजार गुरुवारी ५७२ अंकांनी गडगडला असून निफ्टीतही घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिका-चीनमधील व्यापारी संबंधाबद्दल अनिश्‍चिततेचे वातावरण, रुपयाचे अवमूल्यन आणि पुढील आठवड्यात लागणारे निवडणुकांचे निकाल याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. निफ्टी १८१.७५ अंकांनी घसरून १०,६०१.१५ वर बंद झाला, तर निर्देशांक ५७२.२८ अंकांनी घसरून ३५,३१२.१३ वर बंद झाला. बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात सर्वाधिक घसरण झाली आहे.
युवाय या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीच्या ग्लोबल फायनान्शियल ऑफिसरला आर्थिक बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अटक झाली आहे. परिणामी चीन व हाँगकाँगमधल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सना चांगलाच फटका बसला. त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटल्याचे दिसून आले आणि भारतीय गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला.
शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. जागतिक पातळीवरील घसरणीचे वारे, कमकुवत रुपया आणि देशांतर्गत तसेच, परकीय गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे शेअर बाजाराला फटका बसला. धातू, तेल व नैसर्गिक वायू, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज सर्वाधिक घसरण झाली. सलग तिसर्‍या सत्रात आज दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली आहे.
व्यापारयुद्धाचे सावट कायम
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर घसरणीचे सावट कायम आहे. यामुळे गुंतवणूकदार जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत, अशी माहिती विश्‍लेषकांनी दिली. याचबरोबर रशिया आणि ओपेककडून खनिज तेल उत्पादनात कपात होणे अपेक्षित असल्याने तेलाचा भाव वधारण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर रुपयात घसरण झाली. याचा फटका आज शेअर बाजाराला बसला.
सर्वाधिक घसरण
मारुती, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बँक, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, ओएनजीसी, एचयूएल, कोटक बँक, इंड्सइंड बँक आणि ऍक्सिस बँकेच्या समभागात ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
घसरगुंडीची कारणे
>अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची शक्यता
>जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थिती
>डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण
>देशांतर्गत, परकीय गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचा सपाटा

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (248 of 1865 articles)

Christian Michel Agustawestland
वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स घोटाळा, नवी दिल्ली, ५ डिसेंबर - ३६०० कोटींच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात २२५ कोटी रुपयांची दलाली स्वीकारल्याप्रकरणी ...

×