ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच जमा होणार चार हजार रुपये

शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच जमा होणार चार हजार रुपये

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी –

Piyush Goyal

Piyush Goyal

दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांना वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही योजना १ डिसेंबर २०१८ पासून लागू होणार आहे. या योजनेनुसार लोकसभा निवडणुकीच्या आधीच म्हणजे लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यांवर पहिल्या दोन टप्प्यांत चार हजार रुपये जमा होणार आहेत. हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना अर्थसाह्याची ही तरतूद केली आहे. त्यानुसार
या योजनेचा लाभ मिळविणारे सर्वाधिक अल्पभूधारक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश व ओडिशामध्ये असून, या राज्यांत जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन ९८ ते १०० टक्के पूर्ण झाले आहे.
या योजनेची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी केल्याने, ३१ मार्चपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर मदतीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होईल. याची तयारीही पूर्ण झाली आहे, तसेच १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या नव्या वर्षातील मदतीचा पुढचा दोन हजारांचा हप्ताही एप्रिलमध्ये जमा होईल. अवघ्या दोन महिन्यांत चार हजार रुपये मिळणे ही शेतकर्‍यांसाठी आनंदाची बाब ठरेल. शिवाय ही रक्कम लोकसभेचे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याआधीच जमा होईल. देशात एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ९.९८ कोटी आहे, तर २.५७ कोटी शेतकर्‍यांकडे एक ते दोन हेक्टर जमीन आहे. त्याहून अधिक जमीन असलेल्या शेतकर्‍यांची संख्या १.९५ कोटी आहे.
फेब्रुवारी संपण्याआधीच या राज्यांतील जमिनीच्या नोंदींचे संगणकीकरण पूर्ण झाले असेल. काही दिवसांत आंध्र प्रदेश पश्‍चिम बंगाल, गुजरात व राजस्थानातही हे काम पूर्ण होईल. याबाबतीत गोवा व जम्मू-काश्मीर ही राज्ये पिछाडीवर आहेत. तिथे आतापर्यंत अनुक्रमे ५३ व ९ टक्केच संगणकीकरण झाले आहे. जमीन नोंदींचे पूर्णपणे डिजिटायझेशन झालेल्या राज्यांना या योजनेचे सर्वाधिक लाभ होईल.
अर्थमंत्रालयातील अत्यंत उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, १२ कोटी अल्पभूधारकांना लाभ मिळावा, या दृष्टीने ही योजना आखली आहे. एप्रिलआधीच दोन हजारांचे दोन्ही हप्ते या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले जातील. यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि पुढील वर्षासाठी ७५ हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत. १२ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना या योजनेतून मदत मिळेल. योजनेतील लाभार्थ्यांची संख्या पाहता, मोदी सरकार ६७ टक्के शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू शकेल. लोकसभेच्या सुमारे ३४२ मतदारसंघांत ही योजना पोहोचेल.

Posted by : | on : 4 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (73 of 2024 articles)

Arun Jaitley 1
जेटली यांचे प्रतिपादन, न्यूयॉर्क, ३ फेब्रुवारी - रोजगार निर्मितीशिवाय अर्थव्यवस्थेची प्रगती होत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून ...

×