ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » संपुआ सरकारने दिली नव्हती परवानगी : जेटली

संपुआ सरकारने दिली नव्हती परवानगी : जेटली

नवी दिल्ली, २७ मार्च –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता आपल्या देशातील शास्त्रज्ञांमध्ये होती, मात्र संपुआ सरकारने त्यांना असे क्षेपणास्त्र बनवण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला, असे जेटली म्हणाले.
भाजपा मुख्यालयात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् आणि माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासोबत संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करताना जेटली म्हणाले की, जे लोक अपयशासाठी आपली पाठ थोपटतात, त्यांनी हे लक्षात घ्यावे की, त्यांच्याशी संबंधित अशा गोष्टींचे पुरावे जागोजागी आढळून येतात.
उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता आमच्यात आहे, तशी आमची इच्छाही आहे, पण सरकारने आम्हाला परवानगी दिली नाही, असे डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी २०१२ मध्ये म्हटले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला, त्याचे फळ आज आपल्यासमोर आहे,असे ते म्हणाले.
उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी स्वागत केले, मात्र याच श्रेय लाटण्याचा प्रयत्न मोदी यांनी करू नये, असे म्हटले होते. त्या पृष्ठभूमीवर त्यांनी या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत काँग्रेसवर हल्ला चढवला.
आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत असताना विरोधी पक्ष आताच ही चाचणी का केली? निवडणुकीनंतर का केली नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत आहे, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, सर्व प्रकारच्या लढाईची आम्हाला तयारी करायची आहे. आमची ही तयारी हीच आमची सुरक्षा आहे.
अंतराळ क्षेत्रात भारताने आज जी महत्त्वपूर्ण झेप घेतली, ती पूर्णपणे भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानाने आणि साधनाने परिपूर्ण झाली आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, या नव्या उपलब्धीमुळे फक्त आमची ताकदच वाढणार नाही, तर शांतता प्रस्थापित करण्याची आमची क्षमताही वाढणार आहे.
बदलत्या काळानुसार लढाईच्या पद्धतीतही बदल होत आहे, आधी ज्या पद्धतीने लढाया झाल्या, त्याच पद्धतीने भविष्यातही लढाया होतील, असे नाही, त्यामुळे आम्हाला सर्व प्रकारच्या क्षमता विकसित करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 28 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (137 of 2392 articles)

Yogi Adityanath 3
आदित्यनाथ यांचा सवाल, गांधीनगर, २७ मार्च - गुजरात पोलिसांसोबत चकमकीत ठार झालेल्या जैशच्या इशरत जहाँसोबत काय संबंध आहेत, हे राहुल ...

×