ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सज्जनकुमारच शीख नरसंहाराचा सूत्रधार

सज्जनकुमारच शीख नरसंहाराचा सूत्रधार

•सीबीआयची सर्वोच्च न्यायालयाला माहिती,
नवी दिल्ली, ८ एप्रिल –

Supreme Court 2

Supreme Court 2

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली उसळलेल्या दंगलीमध्ये करण्यात आलेल्या शिखांच्या सामूहिक हत्यांचा सूत्रधार काँग्रेसचा माजी नेता सज्जनकुमारच असल्याची माहिती सीबीआयने आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला देत त्याने जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेला विरोध केला आहे.
शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या तो तुरुंगात असून, त्याने जामिनासाठीही न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्या. शरद बोबडे आणि न्या. एस. ए. नझीर यांच्या न्यायासनाने आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी केली.
शीखविरोधी दंगलीच्या आणखी एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध पतियाळा न्यायालयात खटला सुरू असून, त्याला जामीन दिला गेला, तर तो न्यायाचा उपहास असेल, असे सीबीआयच्यावतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट करीत त्याच्या याचिकेला विरोध केला.
शिखांची सामूहिक हत्या करण्याचा हा क्रूर गुन्हा आहे. त्यावेळी तो मोठा नेता होता आणि तोच याचा सूत्रधार आहे, असे मेहता यांनी न्यायालयास सांगितले.
या खटल्यातील महत्त्वपूर्ण साक्षीदाराने यापूर्वी दिलेल्या चार बयाणांमध्ये सज्जनकुमारचे नाव घेतले नव्हते. मात्र, नंतर या महिलेने त्याचे नाव घेतले आहे, असे बचावपक्षाच्या वकिलाने युक्तिवाद करताना न्यायालयास सांगितले. तो किती दिवसांपासून तुरुंगात आहे, असा प्रश्‍न न्यायालयाने बचावपक्षाला विचारला. तो तीन महिन्यांपासून तुरुंगात असून, खटला सुरू असताना त्याला अटकपूर्व जामीन मिळाला होता. मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्याने कधीच गैरवापर केला नाही, असे यावेळी बचावपक्षाने न्यायालयाला सांगितले.
यावेळी मेहता यांनी त्याला कोणत्या परिस्थितीत अटकपूर्व जामीन देण्यात आला, हे विशद केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक त्याच्या घरी गेले असताना, हिंसक जमाव त्याच्या घराभोवती जमा झाला होता, असेही सांगितले. १९८४ मध्ये सज्जनकुमार खासदार होता आणि त्याच्याच मतदारसंघात शीखविरोधी दंगल झाली, असेही सीबीआयच्या एका वकिलाने न्यायालयास सांगितले.
जेव्हा कुमार यांच्या वकिलाने या खटल्याच्या गुणवत्तेचा संदर्भ दिला, त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाच्या तथ्याकडे तुम्ही आमचे लक्ष का वेधत आहात, हे आम्हास कळत नाही, असे सांगितले. हा केवळ पोलिसांचा आरोप नसून, उच्च न्यायालयानेच तुम्हाला दोषी ठरवले असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

Posted by : | on : 9 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (81 of 2407 articles)

P Chidambaram 11
यांचे धाबे दणाणले, नवी दिल्ली, ८ एप्रिल - आयकर विभाग आपल्या घरावर छापा मारणार आहे, असा दावा धाबे दणाणलेल्या माजी ...

×