ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » सरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी

सरकार-आरबीआय वादात काँग्रेस पडणार तोंडघशी

नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर –

Rahul Gandhi

Rahul Gandhi

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत निर्माण झालेल्या वादात काँगे्रसने टीकेची झोड उठवली असतानाच, मोदी सरकारच्या हातात अमोघ अस्त्र लागले आहे. हे अस्त्र म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे असून, ते काँगे्रसला तोंडघशी पाडण्यासाठी सरकारसाठी रामबाण ठरणार आहे.
जवाहरलाल नेहरू यांचे हे पत्र १९५७ सालचे आहे. नेहरू आणि रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सर बेनेगल रामा राव यांच्यातही मतभेद झाले होते. हे मतभेद इतके टोकाचे होते की, नेहरूच्या पत्रानंतर बेनेगल यांना राजीनामाच द्यावा लागला होता. असाच काहीसा वाद सध्या केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यात सुरू आहे. या वादाला मुद्दा बनवून काँगे्रसने मोदी सरकारवर रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपुष्टात आणत असल्याचा आरोप केला आहे; पण आता नेहरूंचे हे पत्र काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी कारणीभूत करणार आहे.
मुलकी खात्यातील अधिकारी असलेले रामा राव हे रिझर्व्ह बँकेचे चौथे गव्हर्नर होते. साडेसात वर्षे ते पदावर होते, मात्र सरकारशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या वादाची सुरुवात राव आणि तत्कालीन अर्थमंत्री टी टी कृष्णमाचारी यांच्यातील मतभेदाने झाली होती. कृष्णमाचारी यांनी रिझर्व्ह बँक हा अर्थ खात्याचाच भाग असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात केला होता. तेव्हा त्यांनी संसदेत अशीही शंका उपस्थित केली होती की, स्वतंत्ररीत्या विचार करण्याची रिझर्व्ह बँकेची क्षमता असावी काय? मात्र, राव यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी कृष्णमाचारी यांचे वागणे उद्धटपणाचे असल्याची टीका केली होती. हे प्रकरण पंतप्रधान नेहरूंकडे गेले व त्यांनीही अर्थमंत्र्यांची बाजू घेतली होती. नेहरूंनी राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, रिझर्व्ह बँकेने सरकारला मार्गदर्शन केले पाहिजे, तसेच सरकारसोबत एकत्र पुढे जायला हवे. या पदावर काम करणे अशक्य असल्याचे वाटत असेल तर तुम्ही राजीनामा देऊ शकता, असे या पत्रात म्हटले होते. यानंतर राव यांनी राजीनामा दिला होता.
नेहरूंची भूमिका
नेहरूंच्या मते, रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र धोरणावर चालणे तर्कसंगत ठरणार नाही. रिझर्व्ह बँक स्वायत्त संस्था आहे; मात्र, बँकेने केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालनही केले पाहिजे, असे नेहरूंचे स्पष्ट मत होते. नेहरू यांनी राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही भेटला तेव्हा मी म्हणालो होतो की, धोरण ठरविण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रिझर्व्ह बँकेचे धोरण असूच शकत नाही. यावेळी तुम्ही होकारही दिला होता. असे असतानाही मला तुमचा वेगळा मार्ग दिसत आहे.
काँगे्रसच्या हातून मुद्दा गेला
नेहरू यांच्या या पत्रामुळे काँगे्रस अडचणीत तर येणार आहेच, शिवाय निवडणुकीतील एक मोठा मुद्दाही या पक्षाच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकारमध्ये तणावाची ही पहिलीच वेळ नाही, १९३७ मध्येही वाद निर्माण झाले होते. सर जॉन ऑब्सबॉर्न यांनी व्याज आणि विनिमय दरांवरून मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला होता.
सरकार सर्वोच्च आहे! : माजी गव्हर्नरांचे मत
मुंबई – स्वायत्ततेच्या प्रश्‍नावरून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान वाढत्या तणावाच्या पृष्ठभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी सरकार सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. ‘इंडिया अहेड : २०२५ अ‍ॅण्ड बियॉण्ड’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या पृष्ठभूमीवर दिलेल्या मुलाखतीत थकीत कर्जे, दिवाळखोरी कायदा, महागाई, परकी चलनसाठा इत्यादी विविध विषयांवर भाष्य केले.
दिवाळखोरी कायद्यात केलेले आमूलाग्र बदल, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांसंबंधात सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत देशाला त्याचे फायदे लवकरच पाहायला मिळतील, असा आशावाद जालान यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, थकीत कर्जाच्या मुद्यावर सार्वजनिक बँका अडचणीत येणार नाहीत याची काळजी सरकारने घेतली पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. जनतेच्या हिताच्या मुद्यावर महागाई की देशाची आर्थिक वृद्धी सारख्या विषयांवर आरबीआय आणि सरकार यांच्यामध्ये न सुटणारे वाद निर्माण झाल्यास, गव्हर्नरांनी राजीनामा देणे केव्हाही चांगले असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. बिमल जालान हे १९९७ ते २००३ या कालावधीत आरबीआयचे गव्हर्नर होते. पूर्व आशियाई आर्थिक संकटकाळात जालान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ‘इंडिया अहेड : २०२५ अ‍ॅण्ड बियॉण्ड’ या पुस्तकात जालान यांनी आरबीआय गव्हर्नर आणि इतर कर्मचार्‍यांची निवड, परकी चलनसाठा, महागाई दर, आर्थिक वृद्धी यांबद्दल सरकार आणि आरबीआयचे भूमिका यांसारख्या विविध विषयांवर ऊहापोह केला आहे.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (185 of 1905 articles)

Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath
दिल्ली, ५ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथमध्ये साजरी करणार असून, ते मंगळवारी आपला दौरा प्रारंभ करतील. केदारनाथपासून ...

×