ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » सर्व धर्मांच्या सवर्णांना आरक्षणाचा लाभ

सर्व धर्मांच्या सवर्णांना आरक्षणाचा लाभ

►खाजगी शिक्षण संस्थांमध्येही असेल आरक्षण
►घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर,
नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Sansad Bhavan Modi

Sansad Bhavan Modi

आरक्षणाच्या विद्यमान व्यवस्थेत येत नसलेल्या सर्व जाति-धर्माच्या लोकांना १० टक्के नव्या आरक्षणाचा लाभ होईल, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज मंगळवारी लोकसभेत १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडताना सांगितले.
मुस्लिम, ख्रिश्‍चनांसह सर्व धर्माच्या लोकांना याचा फायदा मिळेल. कारण या आरक्षणाचा आधार सामाजिक वा शैक्षणिक नाही तर आर्थिक आहे, याकडे गहलोत यांनी लक्ष वेधले. या आरक्षणामुळे ‘सबका साथ सबका विकास’चे मोदी सरकारचे स्वप्न प्रत्यक्षात येईल आणि देशात आनंदाचे वातावरण निर्माण होइल, असे गहलोत म्हणाले.
संतुलन राखणे हाच उद्देश : अरुण जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली. ५० टक्के कमाल आरक्षणाची मर्यादा ही जातीआधारित आरक्षणासाठी आहे. सामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मिळणार्‍या आरक्षणाची मर्यादा आम्ही निश्‍चित करत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. अनारक्षित वर्गासाठी तुम्ही जागा सोडल्या नाहीत तर जुना भेदभाव तर दूर होईल, पण नव्याने भेदभाव सुरू होईल. त्यामुळे यात संतुलन राखण्यासाठी आम्ही आरक्षणाची कमाल मर्यादा ५० टक्के निश्‍चित केली आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
गरिबांसाठी देशात प्रथमच आरक्षण दिले जात असताना कम्युनिस्ट त्याला विरोध करीत असल्याबद्दल जेटली यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. २०१४ मध्ये आपल्या घोषणापत्रात काँग्रेसने सर्वांना आरक्षण देण्याची घोषणा केली होती, अशी आठवण करून देत, तेव्हा या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा तर मोकळेपणाने द्या, लाजतलाजत देऊ नका, असा टोला जेटली यांनी हाणला. नरसिंहराव सरकारनेही आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्या गेल्यामुळे तो बारगळला, असे जेटली म्हणाले.
नवव्या परिच्छेदात समावेश करा : पासवान
आरक्षणाचा घटनेच्या नवव्या परिच्छेदात समावेश केला, तर न्यायालयाचा अडथळा कायमस्वरूपी दूर होईल, असे केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले. खाजगी क्षेत्रालाही ६० टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. दलित आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अन्य वर्गाला आरक्षण दिले जात असेल, त्यावर कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही, असे पासवान म्हणाले. भारतीय न्यायिक सेवेत अधिक पारदर्शिता असली पाहिजे, तसेच त्यात सर्व जातिधर्माच्या लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी पासवान यांनी केली. कालपर्यत आरक्षणाला विरोध करणारे आज पाठिंबा देत आहे, ही सरकारची फार मोठी उपलब्धी आहे, असे पासवान म्हणाले.
तंबीदुराई यांची भूमिका
अशा प्रकारे आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या वैधतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ शकते, याकडे लक्ष वेधत सामाजिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी उपाध्यक्ष तंबीदुराई यांनी केली. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या कल्याणासाठी केंद्रातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत, तरीही आर्थिक आधारावर आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागत आहे, याचा अर्थ या योजनांची अंमलबाजवणी फसली असावी, असा आरोप त्यांनी केला.
आरक्षण निश्‍चित करण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात यावा, अशी मागणी तेलंगणा राष्ट्र समितीचे जितेंद्र रेड्डी यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी या आरक्षणासोबतच महिला आरक्षणाची मागणी केली. या विधेयकाला आमचा विरोध नाही, मात्र ज्या घाईगर्दीत हे विधेयक आणले गेले, त्यामुळे संशय येतो, असे ते म्हणाले. बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडेही सरकार लक्ष देईल, असे ते म्हणाले.
वेळ चुकीची : आनंदराव अडसूळ
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी विधेयक आणण्याच्या वेळेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणले जात असले तरी आमचा त्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या मागणीचा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमीच समर्थन केले आहे, याकडे अडसूळ यांनी लक्ष वेधले.
आरक्षण आवश्यकच : भर्तुहरी मेहताब
गरिबाची कोणतीच जात नसते, तर त्याला नेहमीच पाठिंब्याची गरज असते, असे आमचे नेते बिजू पटनायक यांनी म्हटले होते, असे स्पष्ट करत आर्थिक आधारावर माणसाची ओळख कशी केली जाईल, अशी विचारणा बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब यांनी केली. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती, ती आता पूर्ण होत आहे, असे ते म्हणाले. समाजात गरीब लोकांची संख्या खूप जास्त आहे, त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची आवश्यकता आहे, असे मेहताब म्हणाले.
कोणाला आपली जात बदलता येत नाही, मात्र त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, त्यामुळे दर १० वर्षांनी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन काही निकषांच्या आधारे त्याला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत विचार करावा, या विधेयकात तशी तरतूद नाही, अशी सूचना मेहताब यांनी केली.
हे विधेयक व्यापक विचारमंथनासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावी, अशी मागणी माकपचे जितेंद्र चौधरी यांनी केली.
सुप्रिया सुळे यांची भूमिका
महाराष्ट्रात धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार चार वर्षांपासून फक्त सर्वेक्षण करीत आहे. महाराष्ट्रात धनगर आणि धनगड असा वाद आहे. एका अक्षराचा बदल करायचा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले. हे विधेयक गरिबांच्या कल्याणासाठी आणले असावे, अशी मला वाटते. हे विधेयक म्हणजे निवडणूक जुमला ठरणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे, मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक का आणले, असे त्या म्हणाल्या.
जातीय जणगणना व्हावी : धर्मेंद्र यादव
या विधेयकाचा फायदा सर्व जातीधर्माच्या लोकांना मिळण्यासाठी आधी जातीय आधारावर जनगणना केली पाहिजे, अशी मागणी करत सपाचे धर्मेंद्र यादव म्हणाले की, माझ्या माहितीनुसार असा अहवाल तयार आहे. या अहवालात जातिनिहाय लोकसंख्येची जी आकडेवारी आहे. त्यानुसार विविध जातींना आरक्षणाचा फायदा दिला पाहिजे. ओबीसी आयोगाचे सरकारने अद्याप गठन केले नाही, त्यामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय येतो, असे यादव यांनी सांगितले. मात्र या घटनादुरुस्ती विधेयकाला सपाचा पाठिंबा असल्याचे यादव यांनी सांगितले.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (38 of 1851 articles)

Amit Shah Bjp
दिल्ली, ८ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उच्चवर्णीयांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना १० टक्के आरक्षण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे समाजात सकारात्मक ...

×