ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » सहा अतिरेकी ठार

सहा अतिरेकी ठार

►शुजात बुखारींच्या हत्येत सामील असलेलाही मेला
►हिजबुल, लष्कर-ए-तोयबाचे कंबरडे मोडले,
श्रीनगर, २३ नोव्हेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना जबर धक्का देत आज शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाने, ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत सामील अतिरेकी आणि तीन कमांडरसह हिजबुल आणि लष्कर-ए-तय्यबाच्या सहा अतिरेक्यांचा दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा येथे खातमा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काही अतिरेकी येथे दडून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने वाघामा सुक्तीपुरा येथे गुरुवारी रात्रीपासूनच शोधमोहीम राबवली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. सुरक्षा दल अतिरेक्यांचा शोध घेत असताना एका घरातून जवानांवर जोरदार गोळीबार झाला. यावेळी सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अंधाराचा फायदा घेऊन पळ काढण्याच्या तयारीत असलेले सहा अतिरेकी मारले गेले, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
गुप्तचर विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीवर सुरक्षा दलाने वेगाने कारवाई केली, असे काश्मीर रेंजचे पोलिस महानिरीक्षक स्वयंप्रकाश पाणी यांनी चकमकीनंतर सांगितले.
कारवाईत ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख पोलिसांनी पटवली आहे. यामध्ये बिजबेहर्‍यातला अर्वानी येथील आझाद अहमद मलिक, ताकिया मकबूल शाह येथील आतिफ नजर, पुलवामातील मुचपुनाचा फिरदोस अहमद, अवंतीपुरातील कवनीचा शाहिद बाशिर या अतिरेक्यांचा समावेश आहे. हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर-ए-तय्यबाच्या अतिरेक्यांचे हे एक संयुक्त पथक होते. ठार झालेल्या अतिरेक्यांमधील उनाईस शफी आणि बासित इश्तियाक हे पोलिस रेकॉर्डप्रमाणे हिजबुलचे अतिरेकी होते. उनाईस शफी हा हिजबुलचा अनंतनाग जिल्ह्यातील कमांडर होता. उर्वरित अतिरेकी तय्यबाचे होते, अशी माहिती पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने दिली.
आझाद अहमद मलिक उर्फ आझाद दादा लष्कर-ए-तय्यबाचा अनंतनाग जिल्ह्याचा कमांडर होता. एप्रिल महिन्यात कुलगाम येथील खुदवानी येथे झालेल्या चकमकीदरम्यान तो एका अतिरेक्यासह पसार होण्यात तो यशस्वी ठरला होता.
आझाद हा, शुजात बुखारी हत्या प्रकरणातील फरार अतिरेकी नाविद जट याचा विश्‍वासू सहकारी होता. बुखारी यांच्या हत्या प्रकरणात उपलब्ध पुराव्यानुसार आझाद आणि इतर तिघांविरोधात नोटिसही बजावण्यात आली होती, अशी माहितीही पोलिस प्रवक्त्याने दिली. चकमक स्थळावरून चार एके-४७ रायफली, एक इन्सास रायफलसह दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

Posted by : | on : 24 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (849 of 2399 articles)

Electioncommissionofindia
घेण्याचा हरयाणा आयोगाचा निर्णय, चंदीगड, २३ नोव्हेंबर - पुढील डिसेंबरमध्ये हरयाणातील पाच जिल्ह्यामध्ये पालिका निवडणूक होत असून, यात नोटाला (वरील ...

×