ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » सीमेवर दोन पाकी सैनिकांना टिपले

सीमेवर दोन पाकी सैनिकांना टिपले

►घुसखोरी करून हल्ला करण्याची होती योजना,
श्रीनगर, ३१ डिसेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून लष्करी जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या दोन सैनिकांना भारतीय जवानांनी रविवारी सायंकाळी सीमेवरच टिपले.
नौगाम सेक्टरमध्ये तैनात असलेल्या लष्करी जवानांवर अचानक हल्ला करायचा आणि परत फिरायचे, अशी पाकिस्तानची घातक योजना होती. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास पाकिस्तानचे काही सैनिक सीमा पार करण्याच्या प्रयत्नात होते. सीमेवरील संशयास्पद हालचाली टिपल्यानंतर सतर्क झालेल्या भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. यात दोन सैनिक ठार झाले, तर इतर सैनिकांनी पळ काढला, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. सीमेच्या नौगाम सेक्टरमधील भागात घनदाट जंगल आहे. याच जंगलाचा फायदा घेऊन पाकिस्तान सैनिकांनी या नापाक कुरापती केल्या होत्या. त्यांच्या घुसखोरीचा मार्ग सुकर करण्यासाठी सीमेपलीकडून पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारामागील नेमके कारण स्पष्ट होताच, भारतीय जवानांनी एकीकडे पाकिस्तानी सैनिकांचा गोळीबार परतावून लावताना, त्यांच्या दोन सैनिकांनाही ठार मारले. यानंतरही संपूर्ण रात्रभर दोन्ही बाजूंच्या गोळीबाराने सीमा धगधगत होती, असे प्रवक्ता म्हणाला. ठार झालेल्या या पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला. हा साठा पाहू जाता, सीमेवरील लष्करी तळावर मोठा आत्मघाती हल्ला करण्याचीच त्यांची योजना असल्याचे दिसून आले असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराचे कवच घेऊन काही पाकी सैनिक किंवा अतिरेक्यांनी सीमा पार केली असल्याची शक्यता लक्षात घेऊन, जवानांनी संपूर्ण परिसरात व्यापक शोधमोहीम राबवली आहे.
सैनिक की अतिरेकी?
जवानांच्या गोळीबारात ठार झालेल्या दोघांनीही पाकी सैनिकांसारखा पोशाख घातला होता, तसेच त्यांच्याजवळून ताब्यात घेण्यात आलेले शस्त्रही त्यांच्या सैनिकांसारखीच होती, तथापि ठार झालेले हे दोघेही खरेच पाकी सैनिकच आहेत की अतिरेकी, याचा तपास केला जात असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
वर्षभरात ३११ अतिरेकी मारले
काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद ठेचून काढण्यासाठी भारतीय लष्कराने अतिशय कठोरपणे राबविलेल्या ऑपरेशन ऑलआऊटच्या काळात या वर्षभरात ३११ अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. काही अतिरेक्यांना आणि त्यांना आर्थिक व शस्त्रांची मदत करणार्‍या शुभचिंतकांना अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती लष्कराचे लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट यांनी दिली. विविध सुरक्षा दलांमधील समन्वय आणि लष्कराला कारवाईसाठी दिलेल्या मुक्त अधिकारांमुळे ही मोठी कामगिरी करणे शक्य झाले. गेल्या काही वर्षांच्या काळातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली असल्याचे ते म्हणाले.
या कारवाईत लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या संघटनांच्या अनेक वरिष्ठ कमांडर्सनाही ठार मारण्यात आले आहे. लष्कराची ही मोहीम पाकधार्जिण्या संघटनांना मोठा दणका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (85 of 1851 articles)

Rajnath Singh 1
राजनाथसिहांचे उत्तर, नवी दिल्ली, ३१ डिसेंबर - राफेल मुद्यावर सातत्याने खोटे बोलणार्‍या काँग्रेसने आज सोमवारी लोकसभेमध्ये परत हा मुद्दा उकरून ...

×