ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » सी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान

सी. पी. जोशींनंतर राज बब्बर, सिद्धू यांचेही वादग्रस्त विधान

►कॉंग्रेसच्या अडचणीत भर,
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –

Indian National Congress

Indian National Congress

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फटकारल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांनी माफी मागितली असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त आणि अवमानजनक विधाने करण्याची कॉंग्रेस नेत्यांची मालिका अद्याप थांबली नाही. सी. पी. जोशी यांच्यानंतर उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आणि पंजाब सरकारमधील कॉंग्रेसी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनीही पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अश्‍लाघ्य विधान केले आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कॉंग्रेससमोरील अडचणीत आणखी भर पडत आहे.
पंतप्रधान मोदी, तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या जातीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे, असे वादग्रस्त विधान सी. पी. जोशी यांनी केले होते. राजस्थानातील नाथद्वार येथून जोशी विधानसभेची निवडणूक लढवत आहे. तेथेच त्यांनी हे विधान केले होते. जोशी यांच्या विधानावर भाजपाने जोरदार हल्ला चढवला होता.
भाजपाच्या हल्ल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोशी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले होते. जोशी यांचे विधान कॉंग्रेस पक्षाच्या सिद्धांताच्या विरोधात तसेच कार्यकर्त्यांच्या भावनेशी विपरित असल्याचे सांगत याबद्दल त्यांनी माफी मागावी, असे निर्देशही गांधी यांनी दिले होते. भाजपाने आपले विधान विपर्यस्त स्वरूपात सादर केले, असा आरोप करत भाजपाच्या या कृतीचा जोशी यांनी निषेध केला होता. मात्र, त्यासोबत कॉंग्रेस पक्षाच्या सिद्धांतांचा तसेच कार्यकर्त्यांच्या भावनेचा आपण आदर करत असल्यामुळे आपल्या विधानामुळे समाजातील कोणत्या वर्गाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आपण खेद व्यक्त करतो, असे जोशी यांनी म्हटले होते.
जोशी यांच्या विधानावरून निर्माण झालेले वादळ शांत होत नाही तोच, उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी डॉलर आणि रुपयांतील घसरणीच्या तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या वयाशी करत नव्या वादाला तोंड फोडले. पंतप्रधान व्हायच्या आधी नरेंद्र मोदी यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या झालेल्या घसरणीचा संबंध तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या वयाशी जोडला होता, याचा संदर्भ देत राज बब्बर यांनी मध्यप्रदेशातील एका निवडणूक प्रचारसभेत म्हटले की, त्यावेळी मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या नावाचा उल्लेख सन्मानपूर्वक केला नव्हता, मात्र आमच्यातील संस्कार आणि परंपरा तशी नाही. आज रुपया घसरत घसरत मोदी यांच्या आईच्या वयापर्यंत येऊन पोहोचला आहे. राज बब्बर यांच्या या विधानावर आक्षेप घेत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे. हे कमी होते की काय म्हणून पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल असेच वादग्रस्त विधान करत कॉंग्रेसच्या अडचणीत भर घातली आहे. मोदी लहर आता मोदी जहर झाली आहे. मोदींवर जनतेचा जो विश्‍वास होता तो चक्काचूर झाला आहे. २०१४ मध्ये असलेली मोदी लहर आता सर्वसामान्य जनतेसाठी कहर आणि जहर झाली आहे. मोदी मोठ्या उद्योगपतींच्या हातातील कठपुतळी बनले आहे, असे तारे सिद्धू यांनी भोपाळच्या निवडणूक प्रचारसभेत तोडले आहेत. याचाही भाजपाने निषेध केला आहे.

Posted by : | on : 24 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (505 of 2053 articles)

Shugar Factory
मागे टाकणार • यंदा ५.२ टक्के वाढ अपेक्षित, नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर - भारत साखर उत्पादनात लवकरच ब्राझीलला मागे टाकेल, ...

×