ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » हाफिझ सईद दहशतवादीच

हाफिझ सईद दहशतवादीच

•काळ्या यादीतून नाव वगळणे नाकारले
•संयुक्त राष्ट्रात भारताचा मोठा विजय,
नवी दिल्ली, ७ मार्च –

Uno

Uno

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ रोजीच्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद हा दहशतवादीच आहे, असा स्पष्ट निर्वाळा देताना, प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्याची हाफिझची विनंती संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावली. भारताने हाफिझविरोधात संयुक्त राष्ट्राला आधीच ठोस पुरावे दिले असल्याने, भारताचा हा मोठा विजयच मानला जात आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरविरोधातही ठोस पुरावे संयुक्त राष्ट्राकडे सोपविले आहेत. त्यालाही आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या यादीत टाकण्यासाठी फ्रान्स लवकरच प्रस्ताव आणणार आहे, त्यातच या जागतिक मंडळाने हाफिझवरील बंदी उठविण्यास नकार देऊन, अतिरेक्यांचे पोषण करणार्‍या पाकिस्तानला झटका दिला आहे.
मुंबईवरील सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ रोजी हाफिझला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकले होते. हाफिझने २०१७ मध्ये मिर्झाच्या वतीने, आपल्याला काळ्या यादीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज दाखल होता.
या अर्जावरील सुनावणीच्या काळात भारत, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह अनेक देशांनी सडकून विरोध केला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर, हाफिझ हा दहशतवादीच आहे आणि त्याच्याविरोधात उपलब्ध असलेले सर्व पुरावे विचारात घेता, त्याला काळ्या यादीतून बाहेर काढण्याची विनंती करणारा अर्ज आम्ही फेटाळून लावत आहोत, असे संयुक्त राष्ट्राच्या लवादाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
जमात-उद-दावाच्या मुख्यालयावर ताबा
इस्लामाबाद : जैश आणि इतर काही अतिरेकी संघटनांसह दहशतवादी कारवायांशी संलग्न असलेल्या मदरशांवर कारवाई करतानाच, पाकिस्तान सरकारने हाफिझ सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या दोन संघटनांच्या इस्लामाबादेतील मुख्यालयावर आज गुरुवारी ताबा घेतला.
१८२ मदरशांवर कारवाई
पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावात आलेल्या पाकिस्तान सरकारने १८२ मदरसे ताब्यात घेतले असून, बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या १२१ जणांना अटक करण्यात आली आहे.
या मदरशांचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा सरकारला संशय आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिली. भारत व इतर बड्या देशांकडून आलेल्या दबावामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली नाही, असा युक्तिवादही गृहमंत्रालयाने केला आहे.

Posted by : | on : 8 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (84 of 2216 articles)

Sansad Top
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, नवी दिल्ली, ७ मार्च - देशातील विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या आरक्षणासाठी २०० पॉईंटचे रोस्टर पुन्हा लागू करण्यासाठी ...

×