ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » हायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र

हायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र

वृत्तसंस्था
मुंबई, ६ सप्टेंबर –

Electric Car

Electric Car

वाढते प्रदूषण आणि इंधन आयातीवरील खर्चाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार प्रदूषणाला हातभार न लावणार्‍या व वेगवान वाहनांवर सध्या भर देत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन टोयोटा आणि सुझुकी या कंपन्या एकत्र आल्या असून, भारतीय बाजारपेठेत हायब्रीड व इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी या कंपन्यांनी केली आहे.
त्यांच्या या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे चार मॉडेल्स सज्ज आहेत. दोन्ही कंपन्या ही वाहने २०२०-२१ पर्यंत बाजारात आणण्याची शक्यता आहे. सुझुकीचे भारतातील युनिट, वॅगन-आरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची सध्या चाचणी घेत असल्याची माहिती या क्षेत्राची माहिती असलेल्या तज्ज्ञांनी दिली. मारुती सुझुकी ही इलेक्ट्रिक वॅगन-आर टोयोटासोबत बाजारात आणली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त या दोन्ही कंपन्या बलेनो, व्हिटारा ब्रेझ्झा आणि कोलोला या वाहनांची हायब्रीड आवृत्ती बाजारात आणणार आहेत.
या हायब्रीड कार १२ व्होल्ट आणि ७२ व्होल्ट क्षमतेच्या असतील. यामुळे इंधन क्षमतेत ५ ते ४५ टक्क्यांची भर पडेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
उद्या शुक्रवारपासून दिल्ली येथे होणार्‍या दोन दिवसीय ‘ग्लोबल मोबिलिटी समीट’मध्ये इलेक्ट्रिक वॅगन-आरचे मॉडेल प्रदर्शित केले जाणार आहे. कंपनीच्या गुडगाव येथील कारखान्यात ‘प्रोटोटाईप लाईन’ स्थापन करण्यात आली असून, येथे तयार करण्यात आलेल्या ५० कारची चाचणी मुंबई आणि बंगळुरू येथे घेण्यात आली आहे.
बलेनो आणि ब्रेझ्झामध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक व १२ व्होल्टची यंत्रणा, तर कोरोलामध्ये ७२ व्होल्टची अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाणार आहे. वॅगन-आर ईव्हीला ७२ व्होल्ट यंत्रणेची शक्ती लाभली असून, यामध्ये १० ते २५ किलोवॅट-अवर्स क्षमतेची बॅटरी वापरली गेल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. सरकारने निर्धारित केलेल्या निकषांपेक्षा अधिक क्षमतेची ही इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने असल्याचे एका तज्ज्ञाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
भविष्यात वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाची व उत्पादनाची माहिती देता येणार नाही, असे मारुती सुझुकीने या वाहनांबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले. टोयोटा-किर्लोस्करच्या प्रवक्त्याने देखील भविष्यातील योजनांबाबत माहिती देण्यास नकार दिला.
बॅटरीच्या किमती कमी होत असताना, तसेच इलेक्ट्रिक वाहनांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत असल्याने, बाजारात नवीन वाहने आणण्यासाठी दोन्ही कंपन्यांसाठी ही योग्य वेळ असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दशकभराच्या वाटाघाटीनंतर सुझुकी आणि टोयोटा कंपन्यांचेे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर एकमत झाले होते. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान टोयोटा पुरवेल, तर सुझुकी उत्पादन करून याचा पुरवठा टोयोटोला देखील करेल, असे या सौद्यात ठरवण्यात आले.
>इलेक्ट्रिक वॅगन-आरची मारुतीकडून चाचणी
>बलेनो आणि ब्रेझ्झासाठी लिथियम आयन बॅटरी व १२ व्होल्ट यंत्रणा
>हायब्रीड कारसाठी १२ आणि ७२ व्होल्ट क्षमतेची यंत्रणा
>हायब्रीड कारमुळे ५ ते ४५ टक्के इंधन बचत
>मारुती करणार काटकसर तर टोयोटा आणणार भविष्यातील तंत्रज्ञान
>सुझुकीच्या गुजरात प्रकल्पातून हायब्रीड कारचे उत्पादन
>सुझुकीच्या गुडगाव प्रकल्पातून दोन्ही कंपन्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (505 of 1905 articles)


न्यायालयाचा निर्वाळा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - समाजातील एका विशिष्ट घटकांपर्यंत मर्यादित असणार्‍या, मात्र इतर घटकांसाठी औत्सुक्याचा तर काही ...

×