ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा

►एक जवान शहीद, चार जखमी,
श्रीनगर, २० नोव्हेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात आज मंगळवारी झडलेल्या एका भीषण चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबुल मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांना यमसदनी धाडले. त्यांच्याजवळून शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला. यात एक जवान शहीद झाला असून, अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.
शोपियॉंच्या नादिगाम भागात काही अतिरेकी आले असून, मोठ्या हल्ल्याच्या तयारीसाठी त्यांची बैठक सुरू आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी या परिसराला वेढा दिला आणि अतिरेक्यांना शरण येण्याचे आदेश दिले. तथापि, लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यात एक जवान शहीद आणि अन्य दोघे जखमी झाले. प्रत्युत्तरात जवानांनीही लगेच गोळीबार केला. यात चार अतिरेकी ठार झाले, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
शहीद जवानाचे नाव एच. सी. विजय असे असून, जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ज्या चार अतिरेक्यांचा खातमा करण्यात आला, त्यांची ओळख पटविण्यात आली असून, अबिद नाझिर, बशरत नागरू, मेहराजुद्दिन नाजर आणि मलिकजादा इमान-उल्-हक अशी त्यांची नावे आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीच्या काळात काश्मीर खोर्‍याच्या बहुतांश भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अतिरेक्यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठार झालेल्या अतिरेक्यांजवळून काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला असल्याचे प्रवक्ता म्हणाला.
पाकच्या गोळीबारात दोन जवान जखमी
पाकिस्तानी सैनिकांनी आज सकाळच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. भारतीय जवानांनीही त्यास ठोस प्रत्युत्तर दिले. जखमी जवानांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. फिगवार आणि माल्ती भागाला पाकी सैनिकांनी लक्ष्य बनविले होते. याशिवाय, राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्येही पाकने गोळीबार केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 21 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (514 of 2053 articles)

Digvijaya Singh
पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर - एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या भीषण हिंसाचार प्रकरणानंतर नक्षल समर्थकाच्या घरातून ...

×