ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » २०१९ ची निवडणूक वैचारिक युद्ध : अमित शाह

२०१९ ची निवडणूक वैचारिक युद्ध : अमित शाह

►मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प
►भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ११ जानेवारी –

Amit Shah (1)

Amit Shah (1)

२०१९ ची लोकसभा निवडणूक हे वैचारिक युद्ध आहे, दोन विचारधारांमधील लढाई आहे, या लडाईचे परिणाम दीर्घकाळ जाणवणारे आहे, ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ करण्याचा संकल्प सोडावा, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज येेथे केले. मोदी यांच्या नेतृत्वात रालोआतील सर्व मित्रपक्ष एकजूट असून भाजपाला २०१४ पेक्षाही जास्त जागा मिळतील, असा विश्‍वासही शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना अमित शाह बोलत होते. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी सोडावा, असे आवाहन अमित शाह यांनी करताच व्यासपीठावरील नेत्यांनी आणि मंडपात हजारो कार्यकर्त्यांनी दोन्ही हात उंचावत ‘मोदी मोदी’ अशा घोषणांसह संकल्प सोडला.
२०१९ची निवडणूक पानिपतच्या युद्धासारखी आहे. १३१ विजयांनंतर मराठे पानिपतचे एक युद्ध हारले होते. त्यानंतर २०० वर्षे देशाला गुलामगिरीत राहावे लागले होते. २०१९ मधील परिस्थिती तशीच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागले. इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवताना शाह म्हणाले की, आघाडी करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न म्हणजे शुद्ध नाटक आहे. एकमेकांचे तोंडही न पाहणारे पक्ष आज सत्तेसाठी हात मिळवत आघाडीच्या गोष्टी करत आहे. आपण एकएकटे मोदी यांना पराभूत करू शकत नाही, हे समजून आल्यामुळे या सर्व पक्षांना आघाडीचा पर्याय निवडावा लागत आहे. उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा एकत्र आले तरी, भाजपा मागील निवडणुकीपेक्षा जास्त म्हणजे ७४ जागा जिंकेल, ७२ जिंकणार नाही, असा विश्‍वास शाह यांनी व्यक्त केला.
भाजपा देशातील गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना अंमलात आणत असताना तसेच सांस्कृतिक राष्ट्रवादाला पुढे नेते असताना विरोधी पक्षांना सत्तेसाठी एकत्र यावे लागत आहे, असे शाह म्हणाले.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढवताना शाह म्हणाले की, ज्यांच्यावर आयकराची ६०० कोटींची थकबाकी आणि आणि जे जमानतीवर फिरत आहेत, तेच पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या संरक्षणसाहित्य खरेदीच्या सर्व करारात दलाली दिली गेली, त्यातूनच मिशेलमामाला पकडण्यात आले, त्यामुळे काँग्रेसची घाबरगुंडी उडाली आहे. तरीही काँग्रेस राफेलवरून मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे, हा सारा हास्यास्पद प्रकार आहे.
राफेलचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तुमच्याजवळ जेवढी कागदपत्रे आणि पुरावे आहेत, ते तुम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर करा, असे मी राहुल गांधी यांना म्हटले, पण ते असे कोणतेच पुरावे देऊ शकले नाही, असे नमूद करत शाह म्हणाले की, राफेल मुद्यावर आम्ही संसदेत चर्चा करणार नाही, असे काँग्रेसला वाटत होते, मात्र आम्ही संसदेत राफेल मुद्यावरील काँग्रेसचा खोडटारडेपणा उघडकीस आणला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अडीच तासांच्या आपल्या तडाखेबंद भाषणात काँग्रेसचा खोटारडेपणा समोर आणला आहे.
गेल्या आठवड्यात मोदी सरकारने दोन ऐतिहासिक असे निर्णय घेतले, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा पहिला निर्णय होता, तर दुसरा निर्णय जीएसटीसंदर्भातील होता. गेल्या साडेचार वर्षांत ५० ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना आपली मान खाली घालावी लागेल, असे कोणतेच काम मोदी सरकारने केले नाही, आमचे सरकार निष्कलंक आहे, राहुल गांधींच्या आरोपाने कोणताही फरक पडणार नाही, असे शाह यांनी सांगितले.
रामजन्मभूमीवरच मंदिर
अयोध्येतील रामजन्मभूमीवरच भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यात यावे, यात कोणताही अडथळा येऊ अशी भाजपाची भूमिका आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, असा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे ते म्हणाले.
राममंदिर उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे, असे अमित शाह यांनी सांगताच रामलीला मैदानावरच्या भव्य अशा मंडपात उपस्थित हजारो कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य सळसळले आणि त्यांनी ‘जयश्रीराम’च्या घोषणा देत मंडप दणाणून सोडला.
वाजपेयी, अडवाणी यांचा उल्लेख
भाजपाचा देशव्यापी विस्तार करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी जेवढी मेहनत घेतली तेवढी दुसर्‍या कोणी घेतली असेल, असे मला वाटत नाही, या शब्दात अमित शाह यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा कार्याचा गौरव केला. जनसंघाच्या काळापासूनच वाजपेयी दीपस्तंभाप्रमाणे काम करत होते, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (21 of 1851 articles)

Isro Logo
प्रमुखांची घोषणा, बंगळुरू, ११ जानेवारी - चंद्राच्या पृष्ठभागाचा आणखी अभ्यास करण्याच्या मोहिमेतील चांद्रयान-२ हे अंतराळयान येत्या एप्रिल महिन्यात अंतराळात झेपावणार ...

×