ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट

•छोट्या शेतकर्‍यांना, छोट्या व्यापार्‍यांना निवृत्तिवेतन, सर्वच शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार!,
•भाजपाच्या संकल्पपत्राचे लोकार्पण,
नवी दिल्ली, ८ एप्रिल –

Bjp Manifesto Release

Bjp Manifesto Release

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार करताना सहा हजार रुपये आर्थिक मदतीचा लाभ आता सरसकट सर्वच शेतकर्‍यांना मिळेल, अशी ग्वाही भाजपाने आज सोमवारी जाहीर केलेल्या आपल्या संकल्पपत्रातून दिली आहे. सर्व छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्तिवेतन देण्याची, तसेच किसान क्रेडिट कार्डवरील एक लाखापर्यंतचे कर्ज व्याजमुक्त करण्याची हमी भाजपाने दिली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्राचे भाजपाने आज लोकार्पण केले. भाजपा मुख्यालयात झालेल्या या लोकार्पण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री तसेच संकल्पपत्र समितीचे प्रमुख राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत आणि भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
अमित शाह, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचीही यावेळी भाषणे झाली. या सर्वांनी मोदी सरकारच्या पाच वर्षांतील उपलब्धींचा आढावा सादर केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या भाषणात संकल्पत्रातील संकल्पांची माहिती दिली. राष्ट्रवादावर भाजपाच्या संकल्पपत्रातून जोर देण्यात आला आहे.
आतापर्यंत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांनाच सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा फायदा मिळत होता, आता सर्व शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करतांना घटनेच्या चौकटीत आणि सौहार्दपर्ण वातावरणात सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरसंदर्भातील घटनेच्या ३७० व्या कलमाबाबत आपल्या मूळ भूमिकेचा पुनरुच्चार करताना ३५-ए कलम राज्यातील स्थलांतरित निवासी तसेच महिलांबाबत पक्षपातपूर्ण आहे, असा आरोप करताना ते रद्द करण्याची ग्वाही राजनाथसिंह यांनी दिली.
दहशतवादाबाबत आमची भूमिका झिरो टॉलरन्सची आहे. जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येत नाही, तोपर्यंत आमच्या भूमिकेत कोणताच बदल होणार नाही. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. समान नागरी कायद्याची आवश्यकता यावेळी प्रतिपादित करण्यात आली.
छोट्या व्यापार्‍यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची तसेच किरकोळ व्यापाराला गती देण्यासाठी राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरण तयार करण्याची ग्वाही संकल्पपत्रातून देण्यात आली आहे.
छोट्या व्यापार्‍यांना ६० वर्षानंतर निवृत्तीवेतन तसेच जीएसटीअंतर्गत नोंदणी केलेल्या छोट्या व्यापार्‍यांना १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा संकल्पही यात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देशात एकाच वेळी घेण्याचा निर्धार व्यक्त करताना यासाठी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करुन मतैक्य साधण्यात येईल, असे संकल्पपत्रात म्हटले आहे.
कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची हमी भाजपाने आपल्या संकल्पपत्रात दिली आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्धार संकल्पपत्रातून व्यक्त करण्यात आला.
मोदी सरकारच्या पाच वर्षांत जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा बहुमान आपल्या देशाने मिळवला आहे. आज जगात आपली अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकाची आहे, लवकरच जगातील पहिल्या पाच देशात आपल्या अर्थव्यवस्थेचा समावेश होईल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
२०३० पर्यंत आपल्या देशाला जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचा निर्धार संकल्पपत्रातून व्यक्त करत २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलर्स, तर २०३२ पर्यंत १० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प मोदी यांनी सोडला आहे.
श्रद्धेशी संबंधित मुद्यांना घटनात्मक संरक्षण
भाजपाने या वचनपत्रात शबरीमलैचा मुद्दाही मांडला आहे. जनतेच्या भावना आणि श्रद्धांशी संबंधित मुद्यांना आपले सरकार घटनात्मक संरक्षण देण्याचा प्रयत्न करेल. शबरीमलैशी संबंधित प्रत्येक मुद्दा, परंपरा आणि धार्मिक विधी सर्वंकष स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे यात नमूद आहे.
-किसान क्रेडिट कार्डवर एक लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज
-घटनेच्या चौकटीत, सौहार्दपूर्ण वातावरणात राममंदिर
-घटनेतील कलम ३५-ए पक्षपाती, रद्द करणारच
-दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स भूमिका
-समान नागरी कायद्याची नितांत आवश्यकता
-७५ वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठ स्थापन करणार
-व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा वाढवणार
-२०२२ पर्यंत सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण
-छोट्या दुकानदारांना पेन्शन
-सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना १ लाख कोटींची क्रेडिट हमी
-कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी २५ लाख कोटींची गुंतवणूक
-तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय
-नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू करणार
-प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्याचे लक्ष्य
-पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपये गुंतवणूक
-पाच किमी अंतरात बँकिंग सुविधा पुरवणार

Posted by : | on : 9 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (60 of 2392 articles)

Pm Modi Bhagwa
मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ८ एप्रिल - राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा, तर अंत्योदय दर्शन आणि सुशासन हा आमचा मंत्र ...

×