ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » अंदाज निवडणुकांचे- एक आयटेम

अंदाज निवडणुकांचे- एक आयटेम

कुठल्या भाषेतला शब्द कुठल्या भाषेत कुठल्या अर्थाने रुजेल, हे काही सांगता येत नाही. असे केवळ मराठीत अन् भारतातच होते की आणखी कुठल्या जागतिक भाषेत अन् देशांत होते, हे काही सांगता यायचे नाही. मात्र अलिकडेच ‘नेव्हर मॅरी अ वुमन विथ बिग फीट’ हे जागतिक म्हणी आणि वाक्प्रचारांचे पुस्तक वाचनात आले. त्यातील अनेक शब्द वेगळ्याच अर्थाने विविध भाषांत रूढ झाल्याचे दिसले. आता, ‘एकदम खत्तम माणूस आहे’ असे कुणीसे म्हणाले. आता माणूस ‘खत्तम’ कसा असेल? अन् खतमच असेल तर तो माणूस कसा राहील? म्हणणारा हे कौतुकाने म्हणत होता, त्यावरून खतम हे विशेषण त्याने कौतुकाने वापले होते. मग कळले की खतम म्हणजे एकदम अफलातून… तसाच आयटेम हा शब्द मराठी मुलुखात एकदम वेगळ्या अर्थाने वापरतात. ‘तो तमका आयटेम आहे.’ असे एखाद्या पुरुषाबद्दल म्हणत असतील तर त्याचा अर्थ तो माणूस तर्‍हेवाईक आहे किंवा ‘येडा बनून पेडा खानार’ आहे, असा त्याचा अर्थ निघत असतो. आता हेच कुण्या स्त्री बद्दल म्हणाले कुणी, तर तिच्या चारित्र्याशीच त्याचा संबंध असतो. ‘आयटेम आहे ती…’ याचा अर्थ वेगळा अन् ‘ती तमक्याची आयटेम आहे’ याचा तर आणखीच वेगळा. आता निवडणुकांचे अंदाज एक आयटेम, याचा अर्थ अंदाज अन् तेही निवडणुकांचे वर्तविणे हा आवडता छंद असतो अन् त्यात साराच येड्यांचाच बाजार असतो. एकतर ही मंडळी आयटेमच असतात किंवा मग खुशमस्करे तरी असतात. निवडणुका अन् त्यातही त्यांचे निकालपूर्व अंदाज हा खरोखरीच एक आयटेमच आहे. एकतर तो लोकांचा आवडता छंद आहे. आपल्या देशात लोकांना इतर काहीही कळत नसले तरीही अगदी ज्याला त्याच्या कुटुंबातलेही संबंध कळत नसले तरीही त्याला राजकारण मात्र हमखासच कळते. बरेचदा तर वयात येण्याच्या आधीच मुलांना राजकारण कळू लागलेले असते. राजकारण पारंगत असलेले स्वनामधन्य असे गल्ली किंवा चौक पंडित खूप आहेत. बड्या पदांवर असलेल्या राजकारणी नेत्यांपेक्षाही चौक किंवा गल्ली पंडिताना राजकारणातले जास्तच कळत असतं. त्यामुळे कुणाचे कसे चुकत असते, हे ही मंडळी चौक गप्पांत सांगत सुटलेली असतात. आता मोदींनी हे असे नको बोलायला हवे होते किंवा तमक्या मतदारसंघात अमक्याला तिकिट द्यायला हवे होते, राज्यांत तिकिट वाटपात अमक्या जातीला जास्त प्राधान्य द्यायला हवे होते, हे आपले राजकारण पंडित तंबाखू चोळत सहज सांगून जात असतात. उद्धव ठाकरेनं पोहरादेवीत इतक्या लवकर नगारा वाजवायला नको होता, असे ठाम मत देऊन मोकळे होत असतात. आता आडात होते, म्हणूनच ‘पोहर्‍या’त आले ना, हे मात्र यांना कळत नाही. त्यातही मग निवडणुकांचे अंदाज व्यक्त करणे हा तर शेकडो राजकीय पंडितांचा आवडता छंद असतो. यांना म्हणजे कुठल्याची निवडणुकीचे अंदाज घरबसल्या कसेकाय लावता येतात, हा संशोधनाचा विषय आहे. पवरा एकजण खूपच दाव्याने म्हणाला, राजस्थान तर भाजपाच्या हातून गेलेच आहे. गेल्याच वेळी मोदींमुळे राणीची सत्ता आली, छत्तीसगढ मध्ये यंदा भाजपाला कठीण आहे अन् मध्य प्रदेशात तर मी तिकिट वाटपाचा अंदाज घेऊन सांगूनच टाकले होते की यंदा काँग्रेसला चान्स आहे… बरे हे असे अगदी गंभीर चेहर्‍यानं अन् तज्ज्ञ, अभ्यासकाच्या भूमिकेत सांगणारे हे महाशय या चार राज्यात कधीही गेलेले नाहीत. इतकेच काय बरेच दिवस झाले ते जिल्ह्याच्या बाहेरही पडलेले नाहीत. नकाशावर मिझोराम कुठे आहे, दाखवा म्हटले तर यांची पंचाईत होईल, मात्र तरीही हे राज्यांच्या निवडणुकीचे अंदाज सहज लावून जात असतात. ‘‘असे का होईल? काय कारण?’’ असे विचारल्यावर, ‘‘सत्तेचा माज आला ना…’’ पण म्हणजे हेही कशावरून म्हणता, याचे उत्तर म्हणजे हे यांच्या वार्डाचा भाजपाचा नगरसेवक यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतो, हे असते. यांच्या गावातल्या एका नगरसेवकाच्या वर्तनावरून हे राष्ट्रीय मत बनवित असतात. एकजण चुटकी वाजवून म्हणाला, ‘‘यंदा छत्तीसगढमध्ये तर काँग्रेस नक्की आहे ना…’’ म्हटलं कसंकाय?, तर म्हणाला, जाऊन पाहिल्याशिवाय आपण हवेतले तीर नाही मारत… आता या चौक पंडिताने अवघ्या छत्तीसगढचा प्रवास केला अन् जनतेच्या भावना जाणून घेतल्या, असा अर्थ नाही. कुठूनतरी येत असताना त्यांची बस फेल झाली अन् ते गाव छत्तीसगढ मधले होते. बस दुरुस्त होईपर्यंत हे महाशय अडचण म्हणून तिथेच एका झाडाच्या सावलीत बसले अन् पाणी पिण्यासाठी कुठल्यातरी घरांत जाऊन आले, इतकाच काय तो यांचा छत्तीसगढशी संवाद. त्यावरून यांनी यंदा काँग्रेसला नक्कीच चान्स आहे, हे सांगूनच टाकले. म्हणजे उद्या केरळातून खारे किंवा मतलई वारे आमच्याच घरावरून गेले म्हणून केरळात होणार्‍या पंचायत निवडणुकांचे अंदाजही विदर्भातल्या बुद्रूक किंवा खुर्द मध्ये राहणारे हे पंडित सांगू शकतात. निवडणुकीचे हे अंदाज अगदी वैयक्तिक उमेदवारांपासून तर पार्टीपर्यंत आणि एका मतदारसंघापासून तर सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांपर्यंत असतात. त्यात मग असे गल्ली राजकीय पंडितांपासून थेट बड्या संस्थांपर्यंत सारेच हिरीरीने आणि हौसेने उतरत असतात. एक्झिट पोल पासून बाकीही काही अभ्यास त्यामागे लावले जातात. हे सारेच कसे ‘अंदाजपंचे दाहोदरसे’, असेच असतात. त्यावर मग बेटिंग चालते. बेटिंगचे सेटिंग चालते अन् मग त्यावरून नवे अंदाज वर्तविल्या जातात. म्हणजे तमक्या पक्षावर रुपयाला हा भाव सट्टा बाजारात आहे, म्हणजे तमक्या पक्षाचे काही खरे नाही, असा अंदाज वर्तविला जातो. म्हणजे अंदजांवर बेटिंग अन् बेटिंगवरून पुन्हा अंदाज, असे सुरू राहते. वास्तव मात्र काही वेगळेच असते. २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजपाचे स्वबळावरचे सरकार इतक्या मोठ्या बहुमताने येईल, असे कुणीच सांगत नव्हते. ‘हर किसी का अपना एक अंदाज होता है और अंदाजोंका भी अपना अपना अंदाज होता है’, असे मागे एक कवी म्हणाले होते. ‘अमक्या जातीचे इतके मतदार, त्यात आपल्या जातीचे इतके, रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी जातवार विभागणी ही अशी अन् मग यात आपण कसे निघतो, आपलीच सीट कशी निघते’, हेच सांगण्याची अहमहमिका असते. भाऊ, दादांचे पाठीराखे हे सांगत असतात अन् त्यावर भाऊ किमान निकाल लागेपर्यंत तरी खुषच असतात. काय आहे की एक कोटीची लॉटरी दहा रुपयात मिळते अन् निकाल लागेपर्यंत आपल्यालाच एक कोटी मिळणार, याचे अंदाज बांधता येतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्रापासून तर समाजशास्त्रापर्यंत अन् राजकारणापासून रसायनशास्त्रापर्यंत कशाचेही तर्क देताच येतात. एकजण तर त्याच्या निवडणूक लढणार्‍या भाऊंना म्हणाला होता, ‘‘तुम्ही फारम भरल्या दिवसापासून माहा डावा डोळा फडफडून रायला ना… याचा अर्थ आपली सीट पक्की हाय!’’ आता सांगा! याला निवडणूक अंदाजांचे आयटेम नाही म्हणायचे तर काय?

https://tarunbharat.org/?p=69256
Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (265 of 912 articles)


तोरसेकर | नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि भाजपाला एकहाती बहुमत मिळाले, त्याला आता साडेचार वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. ...

×