ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » अमेरिकन निवडणुकीत हिंदुत्व?

अमेरिकन निवडणुकीत हिंदुत्व?

भाऊ तोरसेकर |

अयोध्येतील राममंदिरासाठी काही हिंदू संघटनांनी अध्यादेश काढण्याची मागणी आग्रहपूर्वक मांडल्यावर लगेच आता निवडणुकांसाठीच भाजपा हिंदुत्वाचा अजेंडा नव्याने पुढे आणत असल्याचा आरोप झाला आहे. खरेतर त्यात नवे काहीच नाही. मागील तीन दशकांपासून हा आरोप सातत्याने होत राहिला आहे आणि आताही होतो आहे. १९८९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मंदिराचा विषय ऐरणीवर आला होता. त्याला खरेतर राहुलचे पिताश्री राजीव गांधी जबाबदार होते. त्यांच्या पाठीशी दोन्ही सभागृहात भक्कम बहुमत होते आणि सुप्रीम कोर्टानेच शहाबानूचा विषय निकाली काढलेला होता. पण मुठभर मुस्लिम धर्मांध नेते व मौलवींनी तो वादाचा विषय केला आणि मुस्लिमांची मते गमावण्याचे भय काँग्रेसला घातले. त्याला राजीव गांधींनी दाद दिली नसती, तर आज खूप वेगळे राजकारण व समीकरण दिसले असते. राहुल गांधींना गळ्यात जानवे घालून मंदिरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या नसत्या, की काँग्रेसला भाजपावर हिंदुत्वाचे आरोपही करावे लागले नसते. पण राजीव गांधी मौलवींच्या धमक्यांना शरण गेले व त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकालच रद्द करणारा कायदा केला. त्यातून सामान्य हिंदूंच्या मनात शंका निर्माण केली. हा देश मुस्लिमांचे लांगुलचालन करतो आणि हिंदूंना आपल्या धार्मिक भावनांची जपणूकही करू देत नाही; अशी धारणा त्यातून निर्माण झाली. मग उलट दबाव काँग्रेसवर आला. हिंदूंच्या भावनांना हिंदू संघटनांनी उत्तेजित केले आणि त्या शांत करण्यासाठी राजीव गांधी यांनी अयोध्येतील दीर्घकाळ वादग्रस्त असलेल्या मंदिराचे दरवाजे खुले केले. तिथे पूजाअर्चा करण्याची मोकळीक दिली. परिणामी हिंदू खुश होण्यापेक्षा मुस्लिम खवळले आणि बाबरी मशिदीच्या आवारातील त्या मंदिराचा विषय मोठा गंभीर होऊन गेला. तीच रामजन्मभूमी असल्याची धारणा असल्याने तिथेच भव्य मंदिर उभारण्याच्या विषयाला चालना मिळून गेली. ही प्रेरणा वा हिंदुत्व फक्त भारतीय निवडणुकांपुरते असते का? की अमेरिकेतही हिंदुत्वाचे राजकारण चालू शकते?
आपल्याकडील हिंदुत्वाचा विषय सध्या बाजूला ठेवू या. कारण लोकसभेचे पडघम वाजायला अजून अवधी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीलाही अजून दोन वर्षे बाकी आहेत. पण नुकत्याच तिथल्या मध्यावधी, म्हणजे संसदीय निवडणुका पार पडल्या असून त्यात रिपब्लिकन पक्षाला काहीसा फटका बसला आहे. त्या संसदेतील प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाच्या हातून निसटली असून लौकरच अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक हालचाली सुरू होतील. त्यापैकी रिपब्लिकन पक्षाला नवा उमेदवार शोधण्याची गरज नाही. कारण ट्रम्प पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि तिथल्या पद्धतीनुसार त्यांना दुसर्‍या खेपेला उभे राहताना पक्षाची संमती घ्यावी लागणार नाही. म्हणूनच त्यांचा दोन वर्षानंतरचा आव्हानवीर कोण असेल, त्याची चर्चा आतापासून सुरू झालेली आहे. अमेरिकन सिनेट म्हणजे वरिष्ठ सभागृहाचा प्रत्येक सदस्य सिनेटर म्हणून ओळखला जातो आणि तो अध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मानला जातो. तशी अनेक नावे समोर येऊ लागली असून ती अर्थातच डेमोक्रॅट पक्षाची आहेत. कारण आव्हानवीर त्याच पक्षाला द्यायचा आहे. असे इच्छूक आधीपासून पक्षातील प्रतिनिधींनाच आपल्या बाजूला वळवण्याची खेळी सुरू करतात आणि त्यातून दुर्बळ वाटणारे एकेक माघार घेत, तीनचार खरेखुरे स्पर्धक शिल्लक उरतात. त्यांची तुफान झुंज होऊन पक्षाचा अंतिम उमेदवार निश्‍चित होतो. दहा वर्षांपूर्वी म्हणूनच अशी झुंज हिलरी क्लिटंन व बराक ओबामा यांच्यात जुंपलेली होती. त्यात ओबामा यांनी बाजी मारली आणि हिलरींना माघार घ्यावी लागली होती. त्यांनी पुन्हा आठ वर्षांनी आखाड्यात उडी घेतली आणि उमेदवारी २०१६ साली मिळवली. मात्र त्यांची डाळ रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शिजली नाही. आता हिलरींना संधी उरलेली नाही. डेमोक्रॅट पक्षाला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. तो चेहरा हिंदू असू शकतो काय?
डेमोक्रॅट पक्षाचे एक भारतीय वंशाचे नेते डॉ. संपत शिवांगी यांनी तशी शक्यता वर्तवली आहे. एका समारंभात शिवांगी यांनी तुलसी गब्बार्ड या अमेरिकन अध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतील, अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. शिवांगी हे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचे नेते असून, तिथल्या मतदारात हल्ली भारतीयांची संख्या लक्षणीय झालेली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिवांगी यांच्याकडे बघितले जाते. मात्र त्यांनी नाव सुचवलेले असले, म्हणून तुलसी या भारतीय वंशाच्या अजिबात नाहीत. त्या मूळ अमेरिकन असून त्यांच्या जन्मदात्या आईने हिंदू धर्माचे पालन आचरण सुरू केल्याने तुलसी यांचा धर्म हिंदू आहे. त्या हवाई बेटाच्या राज्यातून अमेरिकन संसदेत निवडून आलेल्या आहेत. अजून त्यांनी चाळीशीही गाठलेली नसली, तरी त्यांनी चार वेळा संसदेच्या प्रतिनिधीसभेची निवडणूक जिंकलेली आहे. तुलसीचे वडील हवाई राज्याच्या कायदेमंडळाचे दीर्घकाळ सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांच्या मुलीने आरंभापासून राजकारणात आपले अस्तित्व स्वतंत्रपणे निर्माण केले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकनांमध्ये तुलसी खूप लोकप्रिय आहेत. तिची आई गोरी अमेरिकन ख्रिश्‍चन आहे. पण आध्यात्मिक आकर्षणामुळे त्यांनी हिंदूधर्माचे आचरण सुरू केले आणि तुलसीही त्याच प्रभावाखाली आल्याने हिंदू झालेली आहे. शिवांगी यांनी तुलसीचे नाव त्या समारंभात जाहीर केलेले असले तरी तिथेच नंतर भाषण करताना तिने त्याविषयी कुठलेही भाष्य केलेले नाही. नकारही दिलेला नसल्याने त्यालाच होकर ठरवून तुलसीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा एका वेगळ्या अंगाने जाऊ लागली आहे. येत्या काही महिन्यात अध्यक्षीय प्राथमिक चाचण्या सुरू होतील आणि त्यात खरोखरच तुलसीने उडी घेतली तर ती ओबामा किंवा हिलरी यांच्याप्रमाणेच एक वेगळा उमेदवार म्हणून इतिहास घडवू शकेल. त्या निवडणुकीतला तो पहिला हिंदू उमेदवार असेल.
दहा वर्षांपूर्वी जॉर्ज बुश यांची दुसरी मुदत संपत असताना डेमोक्रॅट पक्षातर्फे दोन नावे अगत्याने पुढे आलेली होती. ती दोन्ही इतिहास घडवणारीच मानली जात होती. ओबामा हे निवडून आल्यास प्रथमच अमेरिकेचा अध्यक्ष कृष्णवर्णीय वा गौरेतर असणार होता आणि हिलरी क्लिटंन निवडून आल्या असत्या, तरी प्रथमच अमेरिकेला महिला अध्यक्ष लाभली असती. तुलसीचा वेगळेपणा असा आहे, की आजवर कोणी हिंदू अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतला उमेदवार झालेला नव्हता. बहुधा ख्रिश्‍चन नसलेलाही कोणी अध्यक्ष अमेरिकेला मिळालेला नाही. म्हणूनच तुलसीला तशी संधी मिळाली तर ती पहिली हिंदू उमेदवार असेल आणि निवडून आलीच तर पहिलीच महिला व पहिलाच हिंदू अध्यक्ष, असा अपूर्व योगायोग घडून येऊ शकेल. आपल्याकडे कुठल्या मतदारसंघात वा कुठल्या पदासाठी कुठल्या जातीधर्माचा उमेदवार दिला, यावर राजकारण व टिकाटिप्पण्या होत असतात. अमेरिकेत तितका प्रकार होत नाही. पण कुजबुज मात्र नक्की चालते. त्यातही रिपब्लिकन पक्ष हा कट्टर ख्रिश्‍चन धर्मियांचा मानला जातो आणि त्यातले बहुतांध पंथ-संप्रदाय त्याच पक्षाच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे तुलसी यात उतरली, तर तिला ख्रिश्‍चन कडव्या नागरिकांची मते कितपत मिळतील याची शंका आहे. मात्र एकूण ट्रम्प विरोधातले अमेरिकन व मग पुराणमतवादी त्यांना हरवण्यासाठी तुलसीच्या हिंदुत्वाचे समर्थक होऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो किती मोठा विनोद असेल? उदारमतवादी पुरोगामी मानले जाणारे डेमोक्रॅट अमेरिकेत हिंदुत्वाचे समर्थन करतील आणि भारतात मात्र त्यांचेच इथले भाईबंद हिंदुत्वाच्या नावाने तेव्हाच गळा काढत असतील. अर्थात ही जर-तरची गोष्ट आहे. कारण अजून प्राथमिक चाचण्याही सुरू झालेल्या नाहीत आणि तुलसी वा कुठल्याही इच्छुकाने त्यासाठी हालचाली सुरू केलेल्या नाहीत. पण तसे झाले तर? इथले पुरोगामी हिंदुत्वाचा विरोध म्हणून ट्रम्पचे समर्थन करणार काय? प्रतीक्षा करावी लागणार आहे.

https://tarunbharat.org/?p=67922
Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (83 of 1403 articles)


कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी गुरुवारी विशेष न्यायालयात ५१६० पानी आरोपपत्र सादर केले आहे. आणखी दोन पुरवणी आरोपपत्रंही दाखल केले जातील, ...

×