ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » अरुणोदयच, पण…

अरुणोदयच, पण…

यवतमाळच्या साहित्य संमेलनास आता रीतसर सुरुवात झालेली आहे. आच चांगली असेल तर अन्न चांगले शिजते, तसेच वाद चांगला असेल तर वैचारिक मंथनाला पोषक असे वातावरण तयार होते. ते तसे या संमेलनात तयार झाले. वैचारिकद्वंदांत एकमेकांचे विचार मांडण्याचे आणि ते एकून घेण्याचे, त्यावर प्रतिवाद करण्याचे अधिकार मान्य केले की मग वादांच्या पलीकडे जाता येतं, हे या संमेलनानं शिकविलं आहे. संमेलनाच्या अध्यक्ष वर्तमानातल्या विदुषीच आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले की, अरुणाताईंची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ही प्रज्ञेच्या प्रांतातला अरुणोदय आहे… अगदी सार्थ असेच आहे. अरुणाताईंचे अध्यक्षीय भाषण त्याची साक्षच ठरले. अत्यंत रसाळ, ओघवती प्रतिपादनाची शैली, अत्यंत लाघवी स्वर… एखाद्या गोंडस लेकीने तिच्या बापाला सायंकाळी तो कामावरून आल्यावर लाडीक अधिकाराने त्याच्याकडे दिवसाचा ताळेबंद निष्पाप नादमयतेनं मांडावा, तशाच अरुणाताई रसिकांशी संवाद साधतात. एक नम्र अशी अदब त्यांच्या एकुणच व्यक्तिमत्त्वात आहे. त्यामुळेच त्यांनी काही अप्रिय विषयांनाही खूप सहजतेने हात घातला. सलू न देता काटा काढावा किंवा लेकराची चूक मायेनं अत्यंत मायेनं सांगावी अन् वेळ पडल्यावर त्याचे कानही उपटावेत तितक्या स्नेहमय अधिकारानं त्यांनी सहगल वादावर परखड मत मांडले. विचार आक्रमक असावेत, भाषा नव्हे, हे सूत्र त्यांनी सांभाळले. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हेदेखील तेच बोलले, मात्र त्यांना आवेग रोखता आला नाही अन् त्यामुळे आवेश रोखता आला नाही. आपण फारच परखड बोलतो आहोत, या कल्पनेच्या थरारातच ते असल्याचे जाणवत राहिले.
अरुणाताईंनी सहजपणे त्या विषयाला हात घातला अन् दुखणे हळूवार सर्जनशीलतेने हाताळले. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी जनांच्या रसिकतेने जगण्याचा, वाचनाचा अन् भाषेला हळूवार कवेत घेतले. वैचारिक प्रांतात काय चुकते आहे आणि समाजाच्या पातळीवर कुठे न्यून राहते आहे, याची जाणीवही करून दिली. मराठी माणसे आणि भाषेसमोरची पुढची आव्हाने काय अन् त्यांचा सामना कसा केला पाहिजे, त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, याचाही अभ्यासू अनुभवाने आढावा घेतला. साहित्य संमेलनांच्या स्वायत्ततेबद्दल त्यांनी विवेचन केले… एकूणच त्यांचे भाषण भाषेच्या आणि भाषकांच्या जगण्याला बहुअंगाने स्पर्श करणारे होतेच, पण…
…पण त्यांनी विदर्भाला जवळपास अनुल्लेखाने मारले. इतर वक्त्यांनी तो सारा तपशील घेतला आहे त्यामुळे मी तिकडे शिरत नाही, असे त्या म्हणाल्या; पण तरीही पूर्वसुरींचा विचार करताना अन् वारसा सांगताना विदर्भाच्या या प्रांतातला तालेवार वारसा कुठेतरी यायला हवा होता. तसा तो पश्‍चिम महाराष्ट्र, म्हणजे पुणे- मुंबईच्या संदर्भात अगदी विस्ताराने त्यांच्या भाषणात वारंवार आलेला आहे. त्याच्याशी असलेला त्यांचा आस्थापूर्ण स्नेहदेखील जाणवत राहिला. महोदव गोविंद रानड्यांचा वारसाच रा. चि. ढेरेंनी चालविला, हे सांगण्यासाठी त्यांच्या कामाबद्दल विस्ताराने बोलणे आलेच; पण विदर्भाच्या भूमीत हे संमेलन होत आहे तेव्हा गाडगेबाबांचे कामही त्याच पद्धतीचे आहे. राष्ट्रसंतांनीही केवळ शाब्दिक प्रबोधनच केले नाही, विनोबांनीही केवळ वांझोटे शब्द वेदनांवर चोळले नाहीत. शहरी भागांसाठी काम करणार्‍या, अभिजनकीकरण करणार्‍यांचे काम मोठे आहेच; मात्र तितक्याच तोडीचे काम ग्रामीण भागासाठी करणारे हे महानुभाव त्यांच्याच भूमीत होणार्‍या साहित्य संमेलनांत उल्लेखही न करण्यासारखे नक्कीच नाहीत.
मुंबई, पुण्याचे विदर्भाशी अंतर अजूनही संपलेले नाही, याचा प्रत्यय वारंवार येत असतो. अलिकडच्या काळातील लेखकांची अगदी आवर्जून नावे घेताना विदर्भात अगदी तीन नावे सोडलीत तर त्यांच्यापलिकडे सशक्तपणे लिहिणारे हातच नाहीत की काय, असे वाटू लागले होते. विदर्भाच्या उज्ज्वल वाङ्मयीन परंपरेचा अगदी महदाईसा अन् मुकुंदांपासून ते कालिदासापर्यंत ठेवणीतल्या पद्धतीने उल्लेख व्हावा, असे अजिबातच नाही. मात्र, वर्तमानात आणि नव्या दमाने लिहू लागलेल्या पिढीबद्दल त्यांच्या नावांसह अन् बारीससारीक तपशीलांसह अध्यक्षीय भाषणात मुंबई, पुण्याकडच्या लेखकांचे आणि नव्याने लिहू लागल्या हातांचे कौतुक करण्यात आले तसा एकाही वैदर्भीय नावाचा साधा उल्लेखही झाला असता तर हे संमेलन खरोखरीच अखिल भारतीय आहे, असे वाटले असते. तिकडच्या नव्याने लिहिणार्‍यांचा असा आपुलकीचा उल्लख होऊच नये असे नाही, मात्र हा वारंवार येणार अनुभव आहे की तिकडची मंडळी गुणवत्तेत थोडी कमी असली तरी त्यांच्या कृतींचे कौतिक जरा जास्तच होते. विदर्भाच्या वाट्याला मात्र अंमळ दुर्लक्षच येतं. केवळ राजकीय सत्तेतील उच्च पदे एखाद्या प्रदेशाच्या वाट्याला आलीत म्हणून त्या प्रदेशाबद्दलही एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक अनास्था काही कमी होत नाही. नाहीतर वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईकही मुख्यमंत्री होतेच की… भाषावार प्रांत रचना झाली असली तरीही आमचे सांस्कृतिक आणि भाषक आंतरबंध कसे सुदृढ आहेत, याचा गौरवाने उल्लेख करताना विदर्भ आणि मराठवाड्यातील आताही लिहित्या पिढीचा उल्लेख नेणिव मनाच्या पातळीवरच टाळला जात असेल तर या प्रदेशापासून दुरावलेपणाच्या परंपरेचे नकळत झालेले ते आनुवांशिक संस्कार आहेत, असेच वाटून जाते. कवी, लेखिका, कथाकार, कादंबरीकार आणि वैचारिक लेखन करणार्‍यांची नावे घेताना कुठेतरी विदर्भाशी नातेही जोडले जाईल, असे वाटत होते. त्यांच्या छापील भाषणात नसलेली तिकडची काही नावे अगदी सहजस्फूर्तपणे त्यांच्या तोंडी आली, मात्र विदर्भातले असे चुकूनही आले नाही. अगदी बाबाराव मुसळे, नामदेव कांबळे, सदानंद देशमुख यांच्यासारख्या महत्त्वाच्या कादंबरीकाराचेही नाव आले नाही. लेखिकांच्या बाबतही सानिया अन् मेघना पेठेंच्या पलीकडे कुणाला मोजायला ही मंडळी का तयार होत नाहीत? असे विचारल्यावर पुन्हा र्‍हस्व मानसिकतेसाठी, प्रांतवादासाठी पुन्हा आम्हालाच दूषणं दिली जातील, मात्र तिकडच्या मंडळींचा पूर्वग्रह इतका सहजतेने अभिव्यक्त होत ओरखडे काढून जात असतो, हे मात्र अशावेळी साफ विसरले जाते. कृषी समस्येच्या संदर्भातही त्यांनी बोलावेच असे नाही, मात्र त्या संर्भातल्या लेखनावर, ग्रामीण साहित्याच्या प्रवाहावर, नागरी लेखकांच्या लेखनात या जाणिवा येत आहेत काय, यावर अरुणाताईंकडून ऐकायला आवडले असते. शेती, माती, गावगाडा यासंदर्भात त्या किमान विदर्भात अन् त्याही आत्महत्याग्रस्त यवतमाळात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर बोलतील, ही अपेक्षा गैर नव्हेच. जेवणाच्या ताटात कोशिंबिरी असतात तशी साहित्याच्या इतर प्रवाहांची नावे घेतल्याने किंवा मर्मस्थळांना स्पर्श केल्याने भाषण सर्वसमावेशक होत नाही. बर्‍यापैकी शहरी जाणिवांना अन् पांढरपेशा जगण्याला धरून असलेले हे भाषण होते. ग्रामीण समाजापुढील प्रश्‍न फार वेगळे आहेत… मराठी टिकायची असेल तर बोली जगल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील बोली मरणासन्न आहेत. महाराष्ट्रातील निहाली, कोरकू आणि कोलामी या भाषा अतिसंरक्षित जाहीर केल्या आहेत. त्या प्रामुख्याने विदर्भातल्या आहेत. विदर्भात हे संमेलन होत असताना बोलीभाषांच्या संवर्धनाचा विषय संमेलनाध्यक्षांच्या भाषणांत अपेक्षित होताच. विदर्भाचा राजकीय वनवास संपला असला तरीही पुण्या-मुंबईचा विदर्भाशी असलेला सांस्कृतिक दुरावा संपण्याच्या दिशेने या संमेलनाच्या निमित्ताने आणखी एक पाऊल टाकले जावे, इतकेच!

https://tarunbharat.org/?p=72310
Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (9 of 726 articles)


तोरसेकर | राहुल गांधी यांना बोफोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफेलचा जप चालविलेला आहे. ...

×