ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » आरोपपत्राने बिथरले नक्षलसमर्थक!

आरोपपत्राने बिथरले नक्षलसमर्थक!

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी गुरुवारी विशेष न्यायालयात ५१६० पानी आरोपपत्र सादर केले आहे. आणखी दोन पुरवणी आरोपपत्रंही दाखल केले जातील, असे पोलिसांनी सांगितले. या आरोपपत्रात सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन व महेश राऊत या कथित मानवाधिकार कार्यकर्त्यांना (म्हणजेच शहरी नक्षल्यांवर) तसेच किशनदा उर्फ प्रशांत बोस, कॉम्रेड एम म्हणजे दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे, प्रकाश उर्फ नवीन उर्फ ऋतुपर्ण गोस्वामी, कॉम्रेड दीपू व कॉम्रेड मंगलू या सीपीआय (माओवादी) संघटनेच्या नेत्यांना आरोपी करण्यात आले आहे. या आरोपपत्रामुळे शहरी नक्षली, त्यांचे छुपे समर्थक, वामपंथी मीडिया यांच्या अंगाचा तिळपापड उडाला आहे. हे स्वाभाविकच आहे. काँग्रेस पक्षाला अजूनतरी आपली भूमिका स्पष्ट करता आलेली नाही. काँग्रेस पक्ष या नक्षलवाद्यांचा छुपा समर्थक आहे, अशी जनमानसात चर्चा असली, तरी अधिकृत म्हणून या पक्षाची एखादी प्रतिक्रिया यायला हवी होती. या आरोपपत्राच्या काही प्रती टाईम्सनाऊ वृत्तवाहिनीने दाखविल्या. त्यात परिच्छेद क्रमांक १७.१३ अतिशय गंभीर आणि सर्वांना विचार करण्यास बाध्य करणारा आहे. या परिच्छेदात पोलिसांनी म्हटले आहे की, रोना विल्सन यांनी, सीपीआय (माओवादी) संघटनेच्या पूर्वेकडील क्षेत्रीय ब्युरोचे प्रमुख प्रशांत बोस उर्फ किशनदा आणि इतर भूमिगत कार्यकर्ते यांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. एवढेच नाही, तर ढवळे, गडलिंग, सेन, विल्सन आणि राऊत यांचा, ‘समाजात अशांतता निर्माण करणे आणि बेकायदेशीर कारवाया करून लोकशाही मार्गाने निर्वाचित सरकारला उलथून लावण्याच्या माओवादी षडयंत्रातही’ सहभाग होता, याचे सविस्तर वर्णन नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांचा वाढीव अवधी दिल्यानंतरही पुणे पोलिसांनी, त्यांचा तपास पूर्ण झाल्यामुळे लवकरच हे आरोपपत्र दाखल केले, हे विशेष! पुण्यातील एक व्यावसायिक तुषार दामगुडे यांनी ८ जानेवारीला एफआयआर दाखल करून आरोप केला होता की, ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेतील वक्त्यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषणे करून, समाजात अशांतता निर्माण केली. पोलिसांच्या या आरोपपत्रातही हेच आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व भयानक आणि थरकाप उडविणारे आहे. समाजात मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून मोठ्या सोज्ज्वळ चेहर्‍यांनी वावरणार्‍या या सर्वांचे बुरखे फाडून त्यांना चव्हाट्यावर उघडे केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करायला हवे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असते तर हे प्रकरण व्यवस्थित रीत्या दाबण्यात आले असते, यात शंका नाही! मागे या शहरी नक्षल्यांना अटक केल्यावर सर्वोच्च न्यायालयालाही कणव आली होती. परंतु, जेव्हा पुणे पोलिसांनी या लोकांविरुद्धचे पुरावे सादर केले, तेव्हा कुठे या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाला लक्षात आले. आता ही मंडळी पुरती अडकली आहे. नोटबंदीमुळे भूमिगत नक्षली चळवळीची आर्थिक स्थिती आधीच रसातळाला गेली आहे. त्यातच आता हे शहरात वावरणारे अस्तनीतले साप तुरुंगात सडत पडले आहेत. आता या आरोपपत्राला आणि पोलिसांच्या तपासाला नावे ठेवणे सुरू झाले आहे. विश्‍वासार्हतेचे प्रश्‍न उपस्थित करणे सुरू झाले आहे. राजकीय सूड, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा, सामाजिक कार्य करण्यावर बंदी इत्यादी शब्दावली वापरून, हे आरोपपत्र व पुणे पोलिसांचा तपास किती निरर्थक व न्यायालयात एक क्षणही न टिकणारा आहे, याचा ओरडा सुरू झाला आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास करून काही तरुणांना ताब्यात घेतले, तेव्हा हीच मंडळी पोलिसांची पाठ थोपटण्यात आघाडीवर होती. तेव्हा तर महाराष्ट्र पोलिस हे जगातील सर्वात पारदर्शी व कार्यक्षम पोलिस होते आणि आता याच पोलिसांनी त्यांच्या साथीदारांना, भक्कम पुराव्यानिशी, पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यावरून, अटक केली आणि आरोपपत्रही दाखल केले, तर आता हेच पोलिस त्यांच्या दृष्टीने नालायक, विकले गेलेले, पक्षपाती झाले आहेत. आरोपपत्र दाखल केले म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही, असाही युक्तिवाद ही डावी मंडळी करत आहे. बरोबर आहे. मग हाच न्याय दाभोळकर, पानसरे यांच्या कथित हत्यार्‍यांनाही लावायला नको का? गौरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर थोड्या वेळातच, संघानेच गौरी यांचा खून केला, अशा आरोळ्या ठोकणे सुरू झाले होते. आज इतके दिवस झालेत, एकाही संघकार्यकर्त्यांवर संशयाचा पुसटसाही ठप्पा कर्नाटक पोलिसांना मारता आला नाही. भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना फसवून आपण स्वत: नामानिराळे राहण्याची या लोकांची युक्ती फसली आहे. संभाजी भिडे यांच्याविरुद्ध त्या वेळी काय गरळ ओकण्यात आली होती! हे विषवमन करण्यात आघाडीवर होते प्रकाश आंबेडकर. या आंबेडकरांची नुकतीच चौकशी समितीसमक्ष साक्ष झाली. त्यात त्यांनी संभाजी भिडे यांचे नाव घेतले नाही, अशी माहिती बाहेर आली आहे. संभाजी भिडे यांना अटक करा म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणारे प्रकाश आंबेडकर, भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणार्‍या समितीपुढे साक्ष देताना संभाजी भिडे याला दोषी आहेत, असे ठामपणे का म्हणू शकले नाहीत? समाजात फूट पाडून, उद्रेक करून आपले राजकारण यशस्वी करण्याचे या लोकांचे नेहमीचेच प्रयत्न असतात. आज देशात केंद्रस्थानी व राज्यात राष्ट्रीय विचारांच्या देशभक्त मंडळींचे राज्य असल्यामुळे, त्यांची ही असली थेरं चालली नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. आज देशाच्या सुरक्षेचा आणि अखंडतेचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. देश अखंडित आणि सुरक्षित राहीला तरच आपले अस्तित्व आहे. त्यामुळे अन्य कुठल्याही समस्येच्या अगोदर देशाचा विचार झाला पाहिजे. मागे एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, शहरी नक्षली प्रा. साईनाथ याला ज्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा झाली, त्या पुराव्यांपेक्षा या आताच्या शहरी नक्षल्यांविरुद्ध कमीतकमी दहा पट अधिक अत्यंत खात्रीचे पुरावे सरकारजवळ असल्याचे ते म्हणाले होते. तरीही या देशातील डाव्यांनी ते कधीच मानले नाही. अन्याय झाला म्हणून सतत ओरडत राहिले. आपल्या स्वार्थासाठी देश, समाज बाजूला सारून टाकून राजकारण करणारे आजही आपल्या देशात आहेत, हे किती दुर्दैवाचे आहे! परंतु, यातही आशेचे अनेक किरण प्रस्फुटित झालेले आहेत. म्हणून या देशातील यच्चयावत देशप्रेमींनी शहरी नक्षल्यांविरुद्ध सादर केलेल्या या आरोपपत्राचे स्वागत केले पाहिजे.

https://tarunbharat.org/?p=67853
Posted by : | on : 17 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (240 of 843 articles)


कुहीकर | ज्यांना वैयक्तिक रीत्या कुठल्याही जबाबदार्‍या स्वीकारायच्या नाहीत, ज्यांची मानसिकताही त्यासंदर्भात सकारात्मक नाही, ज्यांना सामाजिक जबाबदार्‍यांचे भान राखण्याचे झेंगट ...

×