ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:

इव्हीएम : बळीचा बकरा!

श्रीनिवास वैद्य |

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदान यंत्राला (इव्हीएम) व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीन जोडले आहे. त्यामुळे इव्हीएमवर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिले, तेच मत मशीनमध्ये नोंदले गेले आहे की नाही, हे दिसून येते. अशी १६ लाख व्हीव्हीपॅट मशिन्स ३१७४ कोटी रुपये खर्च करून निवडणूक आयोगाने विकत घेतली आहेत. काय गरज होती या व्हीव्हीपॅट मशिन्सची? एका शब्दात सांगायचे तर काहीही गरज नव्हती. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ज्या पक्षांना लोळविले, त्या पक्षांच्या डोक्यात प्रथम हा कीडा वळवळला आणि त्यासाठी प्रामाणिक करदात्याचे ३१७४ कोटी रुपये खर्च झालेत. असे म्हणतात की, पराभवानंतर व्यक्ती शिकते. आपल्या चुका दुरुस्त करते. परंतु, २०१४ सालच्या पराभवानंतर धूळधाण झालेल्या विरोधी पक्षांनी काही धडा घेणे तर दूरच राहिले, उलट मतदान यंत्रालाच दोष देणे सुरू केले. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे!
निवडणुकीत एखाद्या पक्षाचा पराभव का होतो, असे जर कुणाला विचारले तर त्याचे उत्तर- जनसंपर्क कमी पडला, संघटनात्मक स्थिती कमजोर झाली किंवा सरकारमध्ये असताना घेतलेले निर्णय योग्य नव्हते, असे देण्यात येते. विरोधी पक्षांना यापैकी एकही पर्याय पसंत नव्हता. त्यांच्या मते (आणि हे मत पाच वर्षांनंतर आजही कायम आहे, बरं का!) भाजपाने मतदान यंत्रात काहीतरी गडबड करून विजय प्राप्त केला आहे. अन्यथा, तिचा एवढा दणदणीत विजय शक्यच नव्हता. गल्लीतल्या खेळात याला रडीचा डाव म्हणतात. पराभवानंतर आत्मपरीक्षण करायचे दिले सोडून आणि या इव्हीएमलाच बनविले बळीचा बकरा! मतदान यंत्राने मतदान बंद करा आणि मतपत्रिकेची जुनीच पद्धत सुरू करा, अशी मागणी येऊ लागली. यात भाजपाद्वेषी पत्रकार व विचारवंतही सामील झालेत. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून लावत, ईव्हीएममध्ये गडबड करता येते हे सिद्ध करण्याचे आव्हान दिले. आरोप करणारे बव्हंशी राजकीय पक्ष तिथे गेले नाहीत आणि जे गेले त्यांना ते सिद्ध करता आले नाही. खरेतर विषय इथेच संपायला हवा होता. पण, आमचे सर्वोच्च न्यायालय होते ना! त्यांच्याकडे हे प्रकरण गेल्यावर त्यांनी लगेच ते हाताशी घेतले आणि आता सर्वच मतदान केंद्रावर हे व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आले आहे. असो.
आपल्या देशात दिवसेंदिवस पराभवाचे विश्‍लेषण करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची पद्धत लोप पावत चालली की काय, अशी शंका येते. काँग्रेसच्या नेतृत्वात संपुआ सरकारने दहा वर्षांत देशात जो काही गोंधळ घातला, सरकारी खजिना खरवडून खरवडून खाल्ला, देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले, लष्कराच्या सामान्य गरजाही पूर्ण न करून त्यांना दुबळे बनवून ठेवले, याविरोधात लोकांमध्ये आक्रोश निर्माण होणार नाही का? त्या आक्रोशाला मार्गस्थ करण्याचे काम नरेंद्र मोदींसारख्या चाणाक्ष नेत्याने केले आणि दणदणीत विजय मिळविला. यात त्या इव्हीएमचा काय दोष? आपला कारभार अत्यंत वाईट होता आणि म्हणून आपण पराभूत झालो. आपल्या पक्षसंघटनेची स्थिती अत्यंत दयनीय होती आणि त्यातच राहुल गांधींसारख्या बावळटाच्या हाती पक्षाची सूत्रे दिलीत, ही कारणेही काँग्रेसच्या लक्षात आली नाहीत काय? जी काँग्रेसची तीच इतर विरोधी पक्षांची गत. खरेतर, पक्षसंघटनेत योग्य ते परिवर्तन करून, कार्यकर्त्यांची फौज पुन्हा उभारून, सरकारच्या दोषांकडे जनतेचे लक्ष वेधून पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करता आला असता. एकाही पक्षाने हे केले नाही. कारण, हे करायला घाम गाळावा लागतो. कुटुंबाचा स्वार्थ बाजूला सारावा लागतो. जनतेत मिसळून त्यांची नाडी अचूक शोधावी लागते. मुख्य म्हणजे हे करण्यासाठी राजकीय कौशल्य अंगी असावे लागते. ते कुठे आहे? खाजगी कंपनीप्रमाणे आतापर्यंत पक्ष चालविला. वडिलांनंतर मुलगा किंवा मुलगी, नाहीतर जावई प्रमुख बनला. त्यांच्यात तो वकूब आहे की नाही, हे कोण बघणार? अशा लायकी नसलेल्या पिढीच्या हाती पक्षाची सूत्रे दिल्यावर, त्या पक्षाचे भवितव्य काय असणार? त्याला इव्हीएम मशीन तरी काय करणार? परंतु, या लोकांनी व त्यांना साथ देणार्‍या पत्रकार व विचारवंतांनी देशात असे वातावरण तयार केले की, इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करूनच भाजपाने एवढे देदीप्यमान यश मिळविले. म्हणजे इतकी वर्षे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, गाळलेला घाम मातीतच गेला म्हणायचा! कार्यकर्त्याच्या अंगी असलेले गुण ओळखून त्याला अधिकाधिक जबाबदार्‍या देऊन त्याचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा मार्ग भाजपाने अंगीकारला. त्याचे काहीच नाही का? प्रांत स्तरावर, जिल्हा स्तरावर असे नवे, तरुण, आश्‍वासक नेतृत्व उभे केले. त्यांना घडविले. भाजपाचे हे अनुकरण इतर पक्षांना का जमू नये? विरोध करा, टीका करा, परंतु कुणामध्ये काही गुण असतील तर त्याचे अनुकरण करायला काय हरकत आहे. पण ते यांना जमले नाही. कारण त्यांच्यात ती कुवतच नाही, असेच म्हणावे लागेल.
भाजपाने ठरविले की, प्रत्येक नेत्याने घरोघरी जाऊन संपर्क करायचा आणि पक्षाचे सदस्य वाढवायचे. हा आदेश खरेतर सामान्य कार्यकर्त्यांनी पाळायचा असतो. राष्ट्रीय नेत्यांनी फक्त कामाचा हिशेब घ्यायचा असतो. परंतु, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने देशातील काही शहरे निवडून तिथे घरोघरी खांद्यावर झोळी घेऊन संपर्क केला. प्रत्येक घरून मूठभर धान्य मागितले. घरावर भाजपा-समर्थनाचे स्टिकर परवानगी घेऊन लावले. नवीन लोकांना सदस्य करून घेतले. राष्ट्रीय अध्यक्षच जर असा जमिनीवर कार्य करणारा कार्यकर्ता असेल, तर पक्षाचे सारे संघटन झडकून कामाला लागणार नाही तर काय होणार? ही अशी मेहनत घेण्याचे इतर पक्षांच्या अध्यक्षांना का सुचले नाही? बरे नाही सुचले, पण भाजपाने मार्ग दाखविल्यावर तरी हे असे करायला नको का? कारण श्रम घेण्याची कुणाचीच तयारी नाही. फक्त भाजपाध्यक्षाच्या नावाने बोटे मोडणेच सुरू असते. त्रिपुरात जे झाले त्याने तर लाल बावटे अजूनही थरथरत आहेत म्हणतात. असे म्हणतात, कम्युनिस्ट पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण, आता तोही बुडबुडा त्रिपुरातील जनतेने फोडला आहे.
गंमत म्हणजे २०१४ साली भाजपाच्या साथीने आंध्रप्रदेशात सत्तासीन होणार्‍या चंद्राबाबू नायडू यांना तेव्हा इव्हीएममध्ये काहीही दोष दिसला नाही. आता राज्यात त्यांच्या अस्तित्वाला, जगनमोहन रेड्डीने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांना दारुण पराभव दिसू लागला आहे. म्हणून हेच चंद्राबाबू आता इव्हीएमवर शंका घेऊ लागले आहेत. जगातील कुठलाही प्रगत देश मतदानासाठी इव्हीएम वापरत नाही, मग भारताने का वापरावे, असे प्रश्‍न उपस्थित करत आहेत. चंद्राबाबू तर विकासपुरुष आहेत ना! मग त्यांना इव्हीएमची एवढी भीती कशापायी?
थोडक्यात काय, भारतातील विरोधी पक्षांच्या अकर्मण्यतेमुळे मतदानप्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनचा अंतर्भाव झाला आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता एवढे करूनही समजा २०१९ च्या निवडणुकीत विरोधी पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही तर काय? ही मंडळी पुन्हा पक्षबांधणी व जनसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष करीत रस्त्यावर उतरतील का? की, पुन्हा दुसरा कुठला तरी बळीचा बकरा शोधतील? जनतेने हा असला खेळखंडोबा किती सहन करायचा? परंतु, आपल्या इथे लोकशाही असल्यामुळे याच मार्गाने या प्रश्‍नाचे उत्तर सापडणार आहे. नुसत्या चर्चा करून, गणिते करून यशप्राप्ती होत नसते. जो मेहनत करतो, त्याला फळ मिळतेच मिळते आणि त्याच्याच मागे नियतीदेखील उभी राहते. प्रत्येक व्यक्तीची नियती असते आणि ही नियती आयुष्याच्या सारिपाटात आपले अदृश्य दान फेकत असते. तसेच प्रत्येक देशाचीही एक नियती असते. आपल्या भारताची नियती काय असेल? २०१९ च्या निवडणुकीत तिने आपले अदृश्य दान फेकले असेल काय? असेल तर ते कोणते? याचा उलगडा मात्र मतमोजणीनंतरच होणार आहे. आपण आपले कर्तव्य करून निर्णय नियतीच्या हाती सोपविणेच योग्य!

https://tarunbharat.org/?p=78078
Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (35 of 1605 articles)

Nitin Gadkari 2
विजय | २०१४ साली नितीन गडकरी यांनी भूपृष्ठ परिवहन मंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर देशात रस्त्यांच्या विकासाचा असा काही झपाटा लावला ...

×