ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » इस्रोचे एक पाऊल पुढे…

इस्रोचे एक पाऊल पुढे…

स्वातंत्र्यानंतरच्या काळात चित्र असे होते की, इस्रोचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेच घेतले जात नसे. आज ती स्थिती राहिलेली नाही. तंत्रज्ञान जसे झपाट्याने विकसित होत गेले, तसतसे भारतीय शास्त्रज्ञही आपल्या प्रतिभेने जगाला आकर्षित करू लागले. तो काळ विज्ञानाच्या क्षेत्रातील पाऊलवाटेचा होता. आपला देश सायकलयुगातच आहे, अशी चर्चा बाहेरच्या जगात रंगत असे. भारताचा पहिला अग्निबाण २१ नोव्हेंबर १९६३ रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचे ठरले होते. या सुदूर खेड्यात जाण्यासाठी ना धड वाहने होती, ना गुळगुळीत रस्ता. त्या वेळी सायकलसारख्या लहानशा आटोपशीर वाहनाच्या कॅरिअरवरून नियोजित रॉकेट दोन कर्मचार्‍यांनी आणले होते. आकाशात झेपावणार्‍या या रॉकेटचे वजन केवळ १० किलो होते! त्याला पेन्सिल रॉकेट म्हटले गेले. जगासाठी या दहा किलोग्रॅम वजनाच्या रॉकेटचे काहीच महत्त्व नसेल, पण त्या प्रक्षेपणसोहळ्यासाठी या क्षेत्रातील मातब्बर शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा आवर्जून उपस्थित होते. देशी अग्निबाण प्रज्वलित झाला आणि हळूहळू आकाश भेदून त्याने अवकाशात प्रवेश केला. काळ हळूहळू पुढे जाऊ लागला आणि आतातर चांद्रमोहीम, मंगळमोहीम यशस्वी करून इस्रोने जगाला भारताची दखल घ्यायला भाग पाडले. ज्या इस्रोची ६० च्या दशकात १० किलोग्रॅमचा अग्निबाण पाठविताना दमछाक होत होती, त्याच संस्थेने अवघ्या ६०० कोटी रुपयांत मंगळयान अवकाशात पाठवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. मधल्या काळात प्रक्षेपणासाठी आवश्यक क्रायोजेनिक इंजिन भारताला कुणीही देत नव्हते. पण, आमच्याच शास्त्रज्ञांनी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन तयार करून जगाला चकित केले. २९ नोव्हेंबर २०१८ चा दिवस या संस्थेच्या इतिहासात आणखी एक मानाचे स्थान रोवणारा ठरला. इस्त्रोने पीएसएलव्ही सी-४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाच वेळी ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा विक्रम साधला आहे. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरहून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. यात केवळ भारताच्याच नव्हे, तर जगात प्रगत म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि सर्वशक्तिमान राष्ट्रांमध्ये नोंद होणार्‍या अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे. यातील ३० उपग्रह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्पेन, कोलंबिया, फिनलॅण्ड, मलेशिया आणि नेदरलॅण्डस्चे आहेत. सोबत भारताच्या पहिल्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ही कामगिरी एकाएकी झालेली नाही. एकएक पाऊल टाकत भारत आज या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आज इस्रोची तुलना नासाशी केली जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताच्या उपग्रहनिर्मितीचा आणि रॉकेट उड्डाणावर होणारा खर्च कितीतरी कमी असल्याची बाब जगजाहीर झाली आहे. त्यामुळेच केवळ विकसनशील देशच नव्हे, तर विकसित देशांनीही आऊटसोर्सिंग करीत आपापले उपग्रह इस्रोमार्फत अवकाशात पाठविण्यास पसंती दिली आहे. हा एकप्रकारे भारतीयांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अध्ययनाला, त्यांच्या संशोधनाला जागतिक समुदायाने केलेला प्रणामच आहे! प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन बुधवारी पहाटेच सुरू झाले होते. अवकाशात झेपावलेल्या उपग्रहांपैकी अमेरिकेचे २३ उपग्रह आहेत. एकूण उपग्रहांपैकी एक मायक्रो तर २९ नॅनो उपग्रह आहेत. आज इस्रोने केलेल्या विक्रमी खेळीच्या ठळक मुद्यांवरही एकवार नजर टाकली जायला हवी. हे मुद्दे जाणून घेतले तर जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांमध्ये भारताचे उंचावलेले स्थान निश्‍चितच ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही! एखादी संस्था स्थापन होते, रांगू लागते, चालायला लागते, धावते आणि नंतर ती प्रगतीच्या एका उत्युच्च शिखरावर पोहोचते, यात केवळ संस्थेतील कर्मचार्‍यांचे योगदान अतुलनीय आहे. सोबतच त्या देशातील प्रत्येक नागरिक, त्या देशातील सरकारांनाही या यशाचे श्रेय जाते. कारण या संस्थांच्या विकासाकरिता लागलेला पैसा जनतेकडून कररूपातील पैशातून वळता केलेला असतो. आज नासात ४० टक्के शास्त्रज्ञ भारतीय आहेत. तर इस्रोने शेकडो संशोधक निर्माण केले आहेत. इस्रोला स्वायत्त संस्था म्हणून विकसित करण्याचे दिलेले स्वातंत्र्य निश्‍चितच वाखाणण्यासारखे आहे. अन्यथा, ही संस्था दफ्तरदिरंगाईत अडकून राहिली असती. कुठल्या देशाचा उपग्रह पाठवायचा, कुठला नाही, याच्या सरकारी परवानग्या इस्रोला घ्याव्या लागल्या असत्या, तर आज जी झेप या संस्थेने घेतली आहे, ती कदाचितच बघायला मिळाली नसती. इस्रोच्या शिरपेचात सर्वात मोठे मोरपीस तर १५ फेब्रुवारी २०१७ मध्येच खोवले गेले होते. या दिवशी इस्रोने ३ भारतीय उपग्रहांसोबत १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात नेण्याची किमया साधून विश्‍वविक्रम नोंदविला होता. भल्याभल्या देशांवर भारताच्या या कामगिरीमुळे तोंडात बोटं टाकण्याची पाळी आली होती! आजवर असे धाडस ना कुणी केले होते, ना त्या प्रकारचा विचार कुणाच्या मनात आला होता. इस्रो ही कामगिरी करून थांबली नाही. तिचे पाऊल पुढेच पडत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या प्रत्येक कामगिरीची दखल घेत इस्रोचे अध्यक्ष आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर २०१७ मध्ये इस्रोने ३१ उपग्रह अवकाशात धाडले. त्यात २९ विदेशी होते. इस्रोची पाऊलवाट यानंतरही अवरुद्ध झाली नाही. नव्या अध्यक्षांच्या कारकीर्दीतही जुन्या धोरणांमध्ये बदल न करण्याच्या कृतीने संस्थेला धोरणलकव्याने पछाडले नाही. आजची कामगिरी ही सार्‍या संशोधकांच्या आणि वैज्ञानिकांच्या संयुक्त परिश्रमांची फलश्रुती आहे. आजच्या प्रक्षेपणात ११२ मिनिटांत ३१ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम शास्त्रज्ञांनी केला आहे. यातील भारताचा उपग्रह सूर्यमालेत ६३० किमीच्या उंचीवर सोडण्यात येईल, तर इतर सर्व ५०४ किमी उंचीवर सोडण्यात येतील. ३० उपग्रहांचे एकूण वजन २६१ किलो, तर भारताच्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचे वजन ३८० किलो आहे. या उपग्रहांमुळे काय साधले जाणार आहे, हा प्रश्‍न आम जनतेला निश्‍चितच पडणार आहे. जगाच्या विभिन्न भागातील घाडमोडींची माहिती मिळण्यास उपग्रहांची मदत होते, हे जगजाहीर आहे. ऊन, वारा, पाऊस यासह शेती सर्वेक्षण, मृदा सर्वेक्षण, वनस्पतिशास्त्र, पर्यावरण, पाणी, किनारी प्रदेश आदींचा अभ्यास या उपग्रहांद्वारे प्राप्त होणार्‍या छायाचित्रांवरून सहज करता येतो. या सर्व क्षेत्रात इस्रोच्या सहकार्याने भारताचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे, एवढे निश्‍चित!

https://tarunbharat.org/?p=68655
Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (273 of 902 articles)


वैद्य | प्रसिद्ध गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची ‘तत्त्वमसि’ ही कादंबरी, त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारी आहे. भट्ट यांचा संपूर्ण जीवन ...

×