ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » उत्तरप्रदेशात तिहेरी सामने!

उत्तरप्रदेशात तिहेरी सामने!

बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी पत्रपरिषद घेऊन संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घोषित करतानाच, काँग्रेसला एकटे पाडले. दोन्ही पक्ष ३८-३८ अशा समान जागांवर लढतील, असे जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या आकांक्षांचे पंख छाटणारा हा पहिला निर्णय. काँग्रेसनेही रविवारी पत्रपरिषद घेऊन सर्व ८० जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. निवडणुकीचे निकाल सर्वांना चकित करणारे असतील, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत होत्या, त्यावरून काँग्रेसला सपा-बसपा सोबत घेणार नाही, हे स्पष्ट झाले होते. शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले इतकेच. मात्र, अमेठी आणि रायबरेली या दोन जागा आम्ही मायलेकासाठी सोडत आहोत, तेथे आमचा उमेदवार नसेल, अशी दया मायावती व अखिलेशने दाखविली. काँग्रेसने जाहीर केलेल्या भूमिकेनंतर उत्तरप्रदेशचे चित्र स्पष्ट झाले आहे. तेथे आता तिहेरी सामने होतील.
आम्ही काँग्रेसला सोबत का घेतले नाही, याचा लांबलचक पाढा मायावती यांनी वाचला. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांची धोरणे एकसारखीच आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात बहुतेक काळ काँग्रेसचेच सरकार होते. त्यांच्या राज्यात कमकुवत घटक, शेतकरी, दलित, व्यापारी, ओबीसी असे सर्व वर्ग त्रासलेले होते. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढली होती. काँग्रेसने मनमानी पद्धतीने कारभार केला. त्यामुळे आम्ही त्यांना युतीत घेतले नाही. दुसरी आणखी एक बाब त्यांनी सांगितली. काँग्रेस पक्ष बेईमान आहे. आपला पक्ष वाढविण्याचा आणि प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा त्याचा इतिहास आहे. बहुजन समाज पक्षाने १९९६ साली काँग्रेससोबत युती केली होती. त्या वेळी आमची मते काँग्रेसकडे प्रामाणिकपणे वळली, पण काँग्रेसची मते बसपाच्या उमेदवाराकडे वळलीच नाहीत. हा अनुभव आमच्या पाठीशी आहे. समाजवादी पार्टीचाही असाच अनुभव आहे. २०१७ साली विधानसभा निवडणुकीत सपाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. पण, त्याचाही कोणताच फायदा सपाला झाला नाही. काँग्रेस आणि भाजपाच्या काळात मोठे घोटाळे झाले. काँग्रेसच्या काळात बोफोर्समुळे त्यांचे सरकार गेले, भाजपाचे सरकार राफेलमुळे जाईल, असे भाकीत मायावती यांनी केले. काँग्रेसने प्रत्यक्ष आणिबाणी लागू केली होती, भाजपाने अप्रत्यक्षपणे तशीच स्थिती देशात निर्माण केली आहे, असा आरोप त्यांनी दोन्ही पक्षांवर केला. भाजपावर टीका करणे, हे एकवेळ समजू शकते. कारण, त्यांना पुन्हा भाजपाच सत्तेवर येईल, असे वाटत आहे. केवळ भाजपाला रोखण्यासाठी आम्ही ही युती केल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पण, मायावतींनी काँग्रेसलाही झोडपल्यामुळे ही टीका राहुल गांधी यांच्या जिव्हारी लागलेली दिसते.
ही युती करतानाच, मायावती यांनी जुन्या गेस्ट हाऊस कांडाची आठवण समाजवादी पक्षाला करून दिली आणि त्या वेळी अखिलेश हे सत्तेत नव्हते, असा बचाव करून मुलायमसिंह यादव यांना टोला हाणला. ती घटना त्या वेळी खूपच गाजली होती. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव आणि कांशीराम यांनी युती केली होती. मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले आणि बसपाने समर्थन दिले. पण, २ जून १९९५ रोजी मायावती यांनी समाजवादी पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे मुलायम सरकार अल्पमतात आले. नंतर मायावतींनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. पण, २ जून रोजी मायावती या लखनौ येथील मीराबाई विश्रामगृहात असताना, समाजवादी पक्षाच्या गुंडांनी मायावतीच्या खोलीवर सशस्त्र हल्ला केला. त्यांना मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले. अर्वाच्य भाषेत भाषेत शिव्या दिल्या, त्या येथे लिहिण्यासारख्या नाहीत. गुंडांच्या या हल्ल्यामुळे बसपाचे सर्व कार्यकर्ते पळून गेले. पण, भारतीय जनता पक्षाचे आमदार बह्मदत्त द्विवेदी यांनी सपाच्या गुंडांशी एकाकी झुंज देत मायावती यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी त्यांच्यावरही हल्ला केला. जखमी होऊनही त्यांनी गेस्ट हाऊसचा दरवाजा तोडून मायावती यांना बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी नेले. त्रिवेदी हे संघ स्वयंसेवक होते. एका लाठीने त्यांनी सर्वांना धूळ चारली. मायावतींनी त्यांना आपला मोठा भाऊ मानले. त्यांच्याविरुद्ध फर्रुखाबाद मतदारसंघात कधीही बसपाचा उमेदवार उभा केला नाही. नंतर ब्रह्मदत्त द्विवेदी यांचा सपाच्या गुंडांनी खून केला. त्यांच्या विधवेला तिकीट देण्यात आले तेव्हा मायावतींनी विरोधी पक्षात राहूनही त्यांचा प्रचार केला होता. मायावतींनी आपल्या अनेक भाषणांमध्ये आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन केले होते व ब्रह्मदत्त त्रिवेदी यांचे जाहीर आभार मानले होते. म्हणूनच अखिलेश यांनी आपले निवेदन करताना, मायावतींचा अपमान हा माझा अपमान असेल, असे जाहीर केले. आगामी पंतप्रधान उत्तरप्रदेशचा असेल असे सांगून मायावतींना त्यांनी सुखावले.
राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र व कायम शत्रू नसतो. संधी साधून अनेक शत्रुपक्ष एकत्र आल्याचा इतिहास नवा नाही आणि तो अजूनही घडताना दिसतो. मग तेथे धोरणे, तत्त्वनिष्ठा या सर्वांना तिलांजली दिली जाते आणि समोर दिसते ती सत्तेची खुर्ची! उत्तरप्रदेशात जी युती सपा-बसपात झाली आहे, तीसुद्धा याचेच निदर्शक आहे. केवळ मोदींना पराभूत करण्यासाठी आणि सत्ता संपादन करण्यासाठी ही युती झाली आहे, असे मायावती यांनी स्पष्टही केले आहे. काँग्रेसला कसेही करून सत्ता मिळवायची आहे. पण, स्वत: काँग्रेस स्वबळावर एवढ्या जागा निवडून आणू शकत नाही, हे माहीत असल्याने सपा-बसपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या हाती निराशाच आली. आता त्यांना उत्तरप्रदेशात एकट्याने लढत द्यावी लागणार आहे. उत्तरप्रदेशात काही भागात छोट्या पक्षांचाही प्रभाव आहे. त्यात राष्ट्रीय लोकदलाचा जाट क्षेत्रात अधिक प्रभाव आहे. युतीने फक्त दोनच जागा त्यांना देऊ केल्या आहेत. पण, रालोदने पाच जागा मागितल्या आहेत. तो तिढा अजून सुटलेला नाही. त्यानंतर अपना दल, निषाद पार्टी आहे. त्यांनाही युतीने सामावून घेतलेले नाही. हे पक्ष कुठे जाणार, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मायावती आणि अखिलेश यांची अशी धारणा आहे की, दलित, ओबीसी म्हणजे यादव आणि मुसलमान यांच्या एकत्रित मतांमुळे आमच्या युतीला चांगले यश मिळेल. काँग्रेसचाही भर मुस्लिम मतदारांवर असेल. तेथे मुसलमान-हिंदू असे ध्रुवीकरण झाले, तर समस्त हिंदू समाज एकत्र येण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने नुकताच सवर्णांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. त्याचा लाभ भाजपाला मिळू शकतो. तिहेरी तलाकच्या मुद्यावर काँग्रेस, समाजवादी आणि बसपा यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे तिहेरी तलाक मुद्याचा लाभ भाजपाला अधिक प्रमाणात मिळू शकतो. प्रामुख्याने मुस्लिम महिला मतदार बर्‍याच अंशी भाजपाकडे वळू शकतात. राममंदिराच्या मुद्यावर भाजपा निवडणुकीच्या आधी काही भूमिका घेते का, याकडेही देशाचे लक्ष लागले आहे. भाजपा विकासाच्या मुद्याकडेही लक्ष वेधणार आहे. एकूणच ही निवडणूक जात आणि धर्माच्या नावावर सपा-बसपा व काँग्रेस लढविणार आहे. या तिहेरी लढतीचा लाभ भाजपा कशी उठवते, याकडे सर्व राजकीय पंडितांचे लक्ष असेल.

https://tarunbharat.org/?p=72449
Posted by : | on : 14 Jan 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (128 of 847 articles)


दाणी | अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होताच अपेक्षित तेच घडले. पाच सदस्यीय घटनापीठातील एक न्यायाधीश, न्या. ललित यांच्या ...

×