ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » कृष्णा यांचे राहुल गांधींवरील आरोप!

कृष्णा यांचे राहुल गांधींवरील आरोप!

इंदिरा गांधींच्या काळापासून राजीव गांधी आणि नंतर डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळापर्यंत केंद्रात मंत्री म्हणून राहिलेले, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ज्यांनी पद भूषविले असे काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनी नुकतीच काही विधाने, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यप्रणालीबाबत केली. काय म्हणाले कृष्णा? ४६ वर्षे मी काँग्रेसमध्ये होतो. अनेक चढउतार मी पाहिले. पण, काँग्रेसची साथ सोडली नाही. मग मी काँग्रेस पक्ष त्यागून भाजपात प्रवेश का केला, त्याचे उत्तर म्हणजे राहुल गांधी! त्यांच्या कारभारातील अक्षम्य आणि सातत्याने होणार्‍या हस्तक्षेपामुळेच मला काँग्रेसची साथ सोडावी लागली. याच आरोपांच्या यादीतील सर्वात मोठा आरोप म्हणजे, डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अनेक निर्णय हे पंतप्रधानांना न सांगताच घेतले गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या वेळी एक आरोप राहुल गांधींचे नाव न घेता केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला एक निर्णय राहुल गांधी (तेव्हा ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते) यांनी भर पत्रपरिषदेत टराटरा फाडून टाकला होता आणि असे निर्णय कचर्‍याच्या टोपलीत टाकण्यायोग्यच आहेत, अशी टिप्पणी केली होती. काय होता मंत्रिमंडळाचा निर्णय? ज्या राजकीय नेत्यांना विविध गुन्ह्यात शिक्षा झाली आहे, त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणे, हा तो निर्णय होता. या निर्णयाला नंतर कायद्याचे स्वरूप येणार होते. या निर्णयावर मंत्रिमंडळात सांगोपांग चर्चा झाली होती. त्यावेळचे ज्येष्ठ नेते व मंत्री पी. चिदम्बरम् आणि कपिल सिब्बल यांनीही या निर्णयाला पाठिंबा देऊन अध्यादेश काढण्यास संमती दिली होती. एकप्रकारे संसदेत आणि विधानसभेत गुन्हेगार प्रवृत्तींना येण्यापासून रोखणे, हा उदात्त हेतू या अध्यादेशामागे होता. पण, राहुल गांधी यांना हा निर्णय पसंत नव्हता. कारण, बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा राजद आणि उत्तरप्रदेशात समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीच्या अनेक नेत्यांवर अगदी खून, दरोडे, खंडणी, बलात्कार, भ्रष्टाचार यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते आणि काही प्रकरणी तर सुनावणीही सुरू होती. काँग्रेसही मागे नव्हती. त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत २७ अशा लोकांना उभे केले होते, ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप होता. शिवाय अनेक असे पक्ष होते, ज्यांनी डॉ. मनमोहनसिंग सरकारला पाठिंबा दिला होता. २०१२ पर्यंतचा आकडा पाहिल्यास खासदार आणि आमदार मिळून ३६९ असे नेते होते, ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप होता. या सर्वांचा बचाव करण्यासाठी राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून टाकला. ‘कम्पलिट नॉनसेन्स’ अशा शब्दांत राहुल गांधी या अध्यादेशाची संभावना केली होती. म्हणजे डॉ. मनमोहनसिंग मंत्रिमंडळात पंतप्रधानांसकट सर्वच जण नॉनसेन्स होते, असा संदेश यातून गेला. हा एक मुद्दा.
कृष्णा यांनी राहुल गांधींवर केलेले काही आरोप गंभीर आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात जे मित्रपक्ष होते, त्यांच्यावर पंतप्रधानांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ यासह अनेक घोटाळ्यांकडे सरकारने लक्षच दिले नाही. कारण, पंतप्रधान यांची भूमिका अतिशय दयनीय होती. फायली यायच्या आणि डॉ. मनमोहनसिंग हे त्यावर मुकाट स्वाक्षरी करायचे, ही वस्तुस्थिती सर्वांनाच ज्ञात आहे. कोळसा घोटाळ्यात तर स्वत: डॉ. मनमोहनसिंग यांनी एकदा उद्वेगाने म्हटलेही होते-मी ती फाईल पाहिलीच नाही. माझ्यापुढे फाईल आली आणि मी त्यावर स्वाक्षरी केली. कोणाच्या हाती रिमोट कंट्रोल होता तेव्हा? पंतप्रधानांना इतकी अपमानास्पद वागणूक कुणी दिली? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हेच दाखवून द्यायचे होते की, सारा कारभार आमच्या हाती आहे. कृष्णा यांनी असेही म्हटले आहे की, केंद्रात आणि काँग्रेसशासित राज्यात आपल्या पसंतीच्या लोकांनाच सोनिया आणि राहुल यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले होते. ज्येष्ठ नेत्यांची तेव्हा प्रचंड कुचंबणा केली गेली.
या सगळ्या हस्तक्षेपाला कंटाळून मी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात आल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. कृष्णा यांच्या या आरोपयादींवरून असे दिसते की, येणार्‍या काळात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाळीत टाकले जाण्याचा मोठा धोका आहे. असे अनेक नेते आहेत, जे कृष्णा यांच्यासारखीच शिक्षा भोगत होते आणि आताही आहेत. सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या अल्पसंख्यक नेत्यांना तर वाळीतच टाकले गेले आहे. उत्तरप्रदेशात प्रियांका वाड्रा आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना जबाबदारी सोपविण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांच्याकडे जबाबदारी होती. पण, एका झटक्यात त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. कारण, गुलाम नबी आझाद हा मुस्लिम चेहरा होता आणि काँग्रेसला, मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा ठपका पुसायचा आहे. यातून एक अर्थ ध्वनित होतो. आगामी काळात अल्पसंख्यक समुदायाला प्रतिनिधित्व मिळेल, पण ते फक्त तोंडी लावण्यापुरतेच! गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान हे ताजे उदाहरण. सलमान खुर्शीद हेही बरेच अस्वस्थ आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठात भाषण करताना, एका माजी विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात खुर्शीद म्हणाले होते, हे खरेच आहे की, ‘काँग्रेसचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत.’ काँग्रेसच्या काळात देशात ज्या अनेक दंगली झाल्या त्या वेळी काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी शेकडो मुस्लिमांवर गोळीबार करून त्यांना ठार मारले होते. सलमान खुर्शीद यांनी मान्य केले की, मी त्या वेळी काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे मला हे मान्य केले पाहिजे की, काँग्रेसचेही हात मुसलमानांच्या रक्ताने माखलेले आहेत.
काँग्रेसचे हात फक्त मुस्लिमांच्याच नव्हे तर अल्पसंख्य, दलितांच्या रक्तानेही माखलेले आहेत. मराठवाडा नामांतराच्या आंदोलनाच्या वेळी याच काँग्रेसने अनेक दलितांचा जीव घेतला होता. त्यांना जिवंत जाळले होते. दलित महिलांवर बलात्कार केला होता. १९८४ च्या दिल्लीतील शीख नरसंहारात तर काँग्रेसचे हातच काय, सारा काँग्रेस पक्षच शिखांच्या रक्ताने न्हाऊन निघाला होता. अल्पसंख्य समाजांना ठार मारण्याची काँग्रेसची विचारधारा प्रारंभापासूनच राहिली आहे. सलमान खुर्शीद यांनी असेही म्हटलेले आहे की, काँग्रेस स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापन करू शकत नाही. केवळ विविध पक्षांसोबत युती करूनच हे शक्य होऊ शकते. यात चूक काय. पण, त्यांचा रोख राहुल गांधींकडे आहे. राहुलच्या नेतृत्वात पक्ष स्वबळावर बहुमत कमावू शकत नाही, असे त्यांना सुचवायचे आहे. एकूणच, आता काँग्रेसला अल्पसंख्यक नेत्यांची गरज उरलेली नाही, असा याचा अर्थ. यापुढे अल्पसंख्यही नकोत आणि ज्येष्ठ नेतेही नकोत, अशी योजना काँंग्रेसने केलेली दिसते. म्हणूनच एस. एम. कृष्णासारखे लोक काँग्रेसचा त्याग करीत आहेत आणि भाजपात सहभागी होत आहेत. कृष्णा हे आंध्रातील वोक्कलिंग समाजाचे मोठे नेते आहेत. अशा नेत्यांना काँग्रेस अडगळीत टाकत असेल, तर मग पक्षात एकही ज्येष्ठ नेता असणार नाही, हे सांगणे न लगे.

https://tarunbharat.org/?p=74114
Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (138 of 912 articles)


दाणी | फॉली नरिमन हे देशातील एक नामवंत कायदेपंडित मानले जातात. त्यांनी आता कोणत्याही न्यायालयात वकिली करण्याचे जवळपास थांबविले असले, ...

×