ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक » खोट्याच्या कपाळी गोटा

खोट्याच्या कपाळी गोटा

भाऊ तोरसेकर |

हेनरिख हायने नावाचा जर्मन कवि विचारवंत म्हणतो, ज्यांना सत्य गवसले असल्याचा भ्रम झालेला असतो, असे लोक मग तेच सत्य सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेही बोलू लागतात. नरेंद्र मोदी यांना साडेपाच वर्षांपूर्वी भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून अशा सत्यवादी साक्षात्कारी लोकांची संख्या आपल्या देशात क्रमाक्रमाने वाढत गेलेली आहे. त्यांचा खोटेपणा वारंवार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे जपून खोटे बोलावे, इतकेही भान त्यांना उरलेले नाही. वास्तविक एकदोनदा खोटे पकडले गेल्यावर सामान्य गुन्हेगारही सावध होत असतो. पण सत्य सापडलेले बुद्धिमंत किंवा शहाणे लोक कधीच अनुभवातून शहाणे होत नाहीत. त्यामुळे मागील सहा वर्षांत अशा लोकांची संख्या सातत्याने वाढत गेलेली आहे. खरेतर अशा लोकांचा किंवा या आजाराचा उद्भव २००२ सालात प्रथम झाला. गुजरातमध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या डब्याला आग लावून ५९ कारसेवक रामभक्त प्रवाशांना जिवंत जाळले गेले, त्यातून जी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटली, त्यातून दंगल उसळली होती. त्यात नवे काहीच नव्हते. त्यापूर्वी चार दशके गुजरातमध्ये एकही वर्ष बिनादंगलीचे गेलेले नव्हते. पण गोध्रानंतरची दंगल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्दाम घडवून आणली व मुस्लिमांची जाणिवपुर्वक कत्तल केली; अशी एक सत्यवादी अफवा पसरवण्यात आली. तिथून हा सत्यवादी आजार देशाच्या कानाकोपर्‍यात व तथाकथित बुद्धिजीवी वर्गात पसरत गेला. त्याला अजून आटोक्यात आणणे कोणाला शक्य झालेले नाही. मागील लोकसभा मतदान काळात तो देशभर फैलावला आणि नियंत्रणात आला होता. आता पुन्हा तो उफाळून आलेला आहे. आता त्याने आपले बुद्धिवादी रूप त्यागून कलात्मक अवतार धारण केलेला दिसतो. अन्यथा काही शेकडा सह्याजीरावांनी लोकशाही, संविधान बचाव असले मुखवटे पांघरून पत्रके कशाला काढली असती?
मध्यंतरी मराठी भाषेतले एक पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुका होणारच नाहीत, असे म्हटले होते. कारण पंतप्रधान मोदींना पराभवाची भीती असून ते निवडणूका रद्द करून आणिबाणी घोषित करतील; अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली होती. आता ती निवडणूक सुरू झाली असून त्यातली पहिली मतदानाची फेरीही पुर्ण झालेली आहे. त्यामुळे सत्यवादी केतकरांनी निदान आपण खोटे बोललो किंवा भ्रामक अफवा पसरवल्याची दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी होती. पण तसे काही घडल्याचे कोणाच्या ऐकिवात नाही. यातून आपल्याला अशा सत्यवादी मानसिक आजाराची कल्पना येऊ शकते. त्याची लक्षणेही समजू शकतात. केतकर असोत की राहुल गांधी, त्यांच्यासह विविध क्षेत्रातले बुद्धिमंत कलावंत म्हणून मिरवणारे लोक असोत, त्यांना कायम सत्याच्या भयगंडाने पछाडलेले आहे. त्यामुळे त्यांना सतत कसले तरी भ्रम होत असतात आणि त्यालाच सत्य मानून मग अशा भ्रमांचा डंका पिटला जात असतो. सहाशे सह्याजीराव त्याच व्याधीने ग्रस्त झालेले असून त्यांचा भ्रम कोणता आहे, तेही आपण समजून घेतले पाहिजे. भ्रमिष्टाशी आपण कधी युक्तिवाद करू शकत नसतो. कारण त्याला सत्य दाखवता येत नसते, किंवा तोही बिचारा ते सत्य बघू शकत नसतो. सत्य कितीही जाडजूड भिंगातून दाखवले तरी त्याला मनातलेच दिसत असते आणि बघायचे असते. त्याची अवस्था मयसभेतल्या दुर्योधन वा तत्सम लोकांसारखी झालेली असते, त्याला फरशी हौदासारखी दिसते आणि हौद फरशी म्हणून बघायची अजब सिद्धी प्राप्त झालेली असते. त्यामुळे अशा लोकांना नसलेले दिसते आणि असलेले दिसतही नाही. अन्यथा त्यांना बंगाल या राज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांच्या गुंडपुंडांच्या तृणमूल पक्षाने चालवलेली अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी बघता आली असती. तिच्या विरोधात गळा काढता आला असता. पण चकार शब्द या सह्याजीरावांनी काढलेला नाही. पण तेच सर्व एकजुट होऊन मोदींनी न लादलेल्या अघोषित गळचेपीच्या विरोधात आक्रोश करत सुटलेले आहेत.
अनिक दत्ता नावाच्या एका यशस्वी चित्रपट दिग्दर्शकाचा भोबिष्योतेर भूत नावाचा बंगाली चित्रपट दोन महिन्यापूर्वी बंगालमध्ये प्रदर्शित झाला. १५ फेब्रुवारी रोजी विविध चित्रपटगृहांत त्याचे प्रदर्शन सुरू झाले आणि एकदोन दिवसातच स्थानिक पातळीवर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी आपापल्या भागातील थिएटर मालकांना स्पष्ट इशारा दिला, की तात्काळ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबले पाहिजे. कुठलीही तक्रार करायला जागा नव्हती. कोर्टाचे वा अन्य कुठलेही कायदेशीर आदेश नव्हते. पण स्थानिक पोलिस आणि सत्तधारी तृणमूल काँग्रेसचे गुंड आदेश देत होते आणि त्यांची अवज्ञा करण्याची आज निदान बंगालमध्ये कुणाची बिशाद नाही. साहजिकच सर्व चित्रपटगृहातून दोनतीन दिवसातच हा चित्रपट गायब झाला. एकदोन बातम्या कुठेतरी झळकल्या. पण कुठल्याही राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर त्याची चर्चा झाली नाही वा कुठल्या अविष्कार स्वातंत्र्यवीराला अनिक दत्ताच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याची हिंमत झाली नाही. आणखी एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. त्याच दरम्यान ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यत ब्रिगेड परेड ग्राऊंड या भव्य मैदानावर त्याच कालखंडात एक सर्वपक्षीय जाहीर सभा घेतली. त्यात देशभरच्या मोदीविरोधी नेत्यांना आमंत्रित केलेले होते. या सर्वांनी देशात अघोषित आणिबाणी कशी चालू आहे आणि नरेंद्र मोदी हिटलरलाही लाजवणारी हुकूमशाही कशी करीत आहेत, त्याचा पाढा वाचला होता. परंतु कोणालाही त्याच कोलकात्यात एका चित्रपट व कलाकृतीची कशी बेकायदा गळचेपी झालेली आहे, त्याचा पत्ता नव्हता आणि असेल तर त्याविषयी बोलायची हिंमत झाली नाही. कलावंतांना तर बंगाल, ममता वा कुठला भोबिष्योतेर भूत नावाचा सिनेमाही ठाऊक नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या गळचेपीबद्दल मागील दोन महिने यथास्थित मौन धारण केले. कदाचित त्यापैकी बहुतांश कलावंतांना बंगाल भारतात असल्याचेही ठाऊक नसावे.
किती बेशरमपणा आहे बघा. ज्या दिवशी हे सहाशे कलावंतांचे मोदींना पराभूत करण्याचे आवाहन प्रसिद्ध झाले; त्याच्या दुसर्‍याच दिवशी हा मामला सुप्रीम कोर्टात निकाली झाला. म्हणजे कलावंतांच्या पत्रकाचा नव्हे! भोबिष्योतेर भूत चित्रपटाच्या अघोषित बंदीचा मामला सुप्रीम कोर्टात आला. त्या निर्माता-दिग्दर्शकांना न्याय मागायला थेट सुप्रीम कोर्टात यावे लागले. कारण देशातले ममताग्रस्त पुरोगामी कलावंत विचारवंत खून पाडला गेला तरी मौन धारण करतील; याची अनिक दत्ताला खात्री होती. म्हणून त्याने सह्या गोळा करण्यापेक्षा थेट कोर्टातच धाव घेतली होती. त्याच्या सुनावणीत दोन महिने गेले आणि गुरूवारी ११ एप्रिल रोजी त्याचा कोर्टाने निकाल दिला. त्यात वाढत्या असहिष्णुतेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असा शेराही मारलेला आहे. देशात याचा अर्थ बंगालमध्ये असा आहे आणि तो पुरोगामी ममतांच्या बाबतीतला आहे. पण तरीही कोणा स्वातंत्र्यसेनानी कलावंताने अजून ममतांचा निषेध केलेला नाही वा त्यांच्या पक्षाला मते देऊ नका, असा आवाज उठवलेला नाही. आहे ना चमत्कार? ज्या बाबतीत व ज्या सरकारच्या कारकिर्दीत साक्षात गळचेपीचे पुरावे समोर आले व कोर्टाने ज्या सरकार व पक्षाला स्वातंत्र्याचा गुन्हेगार मानले; त्याच्याविषयी या सह्याजीरावांनी चकार शब्द उच्चारलेला नाही. पण ज्या मोदी सरकारच्या विरोधात आजवर कुठला गळचेपीचा पुरावा कोणाला समोर आणता आलेला नाही, त्याच्या विरोधात आक्रोश चाललेला आहे. याला म्हणतात बुद्धिमंत, कलावंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा. मजेची गोष्ट म्हणजे अनिक दत्ता याला न्याय देऊनच सुप्रीम कोर्ट थांबलेले नाही. त्याने ममता सरकारला या गळचेपीच्या गुन्ह्यासाठी २० लाख रुपये दंडही ठोठावला आहे. पण आपले महान कलावंत व बुद्धिमंत तोंडात गुळणी घेऊन बसले आहेत. मोदी-मोदी असला रवंथ मात्र जोरात चालू आहे. मग यांना कलावंत म्हणायचे की गोठ्यातली गुरे म्हणायचे?

https://tarunbharat.org/?p=78220
Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, भाऊ तोरसेकर, संपादकीय, स्तंभलेखक (31 of 1605 articles)


४३ दिवसांनंतर १० एप्रिलला पाकिस्तानने काही निवडक पत्रकारांना बालाकोट येथे नेले. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवाँ प्रांतातील बालाकोट येथील डोंगरशिखरावर असलेल्या जैश-ए-मोहम्मद या ...

×