ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » गुलामीच्या खुणा मिटविल्याच पाहिजे!

गुलामीच्या खुणा मिटविल्याच पाहिजे!

प्रत्येक व्यक्तीचे जसे कूळ असते, गोत्र असते, नाती असतात आणि माती असते, तसेच देशाचेही असते. त्याची आपली एक संस्कृती असते. तिथल्या मातीला त्या संस्कृतीचेच संस्कार असतात आणि त्या मातीतून व्यक्ती अन् व्यक्तींचाच देश घडत असतो. ते सारेच कसे एकजीनसी, एकसंध असले पाहिजे. ती त्या देशाची ओळख असते. राष्ट्र म्हणून आपला एक चेहरा असतो. काळाच्या ओघात त्यावर आघात होतात, काही बदल होतात, पण कालसुसंगत अशा त्या बदलांचे पोतही त्या देशाच्या मातीचे असतात. राष्ट्र म्हणून त्याचा तोंडवळा बदलत नाही. मात्र अनेक शतके गुलामगिरीत असलेल्या या राष्ट्राने गुलामगिरीच्या काळातही आपला हा चेहरा कायम राखण्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्याची मागणी अन् लढा हा त्याचसाठी होता. या राष्ट्राची जी काय ओळख होती ती कायम राखण्याचे आणि राष्ट्र म्हणून पंचप्राण अक्षुण्ण राखण्यासाठीच दीर्घकाळ लढा दिला गेला. तो मोगलांच्या काळात दिला गेला. पोर्तुगिजांच्या विरोधात दिला गेला, इंग्रजांना टक्कर दिली गेली ती राष्ट्र म्हणून या भूमातेचे श्‍वास अबाधित राखण्यासाठीच होती. पारतंत्र्यात असताना परकी सत्ताधार्‍यांना थयथयाट करून जमले नाही ते स्वातंत्र्यानंतर स्वकीय शासकांनी अगदी सहज करून टाकले. या देशाचा चेहराच त्यांनी बदलून टाकला. तो राखण्यासाठीचे संघर्ष करणार्‍यांना परकीय सत्ताधार्‍यांपेक्षाही अत्यंत क्रूरपणे चिरडले गेले. सत्ता राखण्यासाठी देशाच्या अस्मितेशीच कपटी राजकारण करण्यात आले. गुलामगिरीची अनेक प्रतीके आम्ही आमचा इतिहास म्हणून राखली. केवळ राखलीच नव्हे, तर ती मिरविणे सुरू केले होते. तरीही राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नात या देशाच्या माणसांच्या रक्ताची उसळी थांबलेली नव्हती. ही उसळी घेतली गेली तेव्हा तेव्हा ती थांबविण्याचा प्रयत्न आपल्याच सत्ताधार्‍यांनी केला. राष्ट्र म्हणून स्फुल्लिंग चेतविण्यासाठीच सोरटी सोमनाथचे मंदिर वल्लभभाई पटेल यांनी उभे केले. राम, कृष्ण आणि शिव हे या देशाचे प्राणतत्त्वच आहे. अनेक शतके हा देश आपल्या विविधता जपतही एकसंधपणे उभा आहे, त्याला या त्रयींचा धागाच कारणीभूत आहे. भाषा, संस्कृतीसाठी, राष्ट्र म्हणून जी काय मानचिन्हे आहेत ती राखण्यासाठी लढा द्यावा लागतो आहे, असा भारत हाच देश असावा! प्रत्येकच परकी शासकाने त्याच्या सत्ताकाळाच्या स्मृती म्हणून गावांची नावे बदलली, स्तंभ उभे केले, मंदिरे पाडून प्रार्थनास्थळे बांधली, अनेक महत्त्वाच्या वास्तूंना आपल्या राजा-राण्यांची नावे दिली. ती आम्ही स्वातंत्र्यानंतरही तशीच कायम ठेवली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यासाठी अनेकांनी बलिदान केले ते काहीच झाले नाही. परकीय शासक निघून जाणे अन् भूमी आझाद होणे, म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. गुलामगिरीची अनेक प्रतीकं आणि संस्कार चलाखपणे ते पेरून गेले होते आणि मग राजकारणाच्या सारिपाटावर लांगूलचालनाच्या खेळ्या करत आम्ही गुलामगिरीची ती प्रतीकं, भाषा, संस्कृती मिरवू लागलो. त्याला आम्ही ‘सेक्युलरिझम्’ असे छानपैकी, परत परकी सत्ताधार्‍यांच्या भाषेतलेच नाव दिले. हे सगळे बदलून, गुलामगिरीची ही चिखलपोत धुवून राष्ट्र म्हणून आपला चेहरा उजळून काढण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना बुर्झ्वा मानसिकतेचे, प्रतिगामी म्हणून हिणवले गेले. देशाला हे मागे न्यायला निघाले आहेत, असा खोटा प्रचार केला केला. जाती, धर्माचे राजकारण करून राष्ट्रनिर्मितीच्या या कामापासून हिंदुस्थानींना दूर करण्याचा डाव खेळला गेला. राजजन्मभूमी आंदोलनाने पहिल्यांदा या ध्रुवीकरणाच्या कुटिल खेळींना चाप बसला. राष्ट्र म्हणून सकल हिंदू समाज एकत्र उभा राहिला. ‘गर्वसे कहो हम हिंदू हैं,’ हा नारा उजागर झाला. देश भौतिक विकासाच्या सोबतच नैतिक, सांस्कृतिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला हवा, हे या देशातल्या सामान्य म्हटल्या जाणार्‍या नागरिकांनाही पटले. परकीय सत्ताधार्‍यांची भ्रष्ट नक्कल असलेले स्वकीय सत्ताधारी हळूहळू सत्तेपासून दूर फेकले जाऊ लागले आणि २०१४ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली. आताही ती अव्याहत सुरू आहे. त्यामागची प्रेरणा राममंदिराची उभारणी, हीच होती. रामललांना नरसिंह राव पंतप्रधान असताना रामभक्तांनी मुक्त केले आणि मग प्रत्येक भारतीयाच्या काळजात राम जागला. ही एक प्रतीकात्मक घटना होती. राम नावाची चेतनाच बंदिस्त करून टाकण्यात आली होती. बाबराने ती केली, हे खरेच आहे. कारण त्याला माहिती होते की राम मुक्त राहिला, कृष्ण या देशाच्या धमण्यांमध्ये खेळता राहिला, शिवाचे मुक्त तांडव मनामनांत सुरू राहिले, तर आपण या देशावर शासन करूच शकणार नाही. त्यासाठीच त्यांनी मंदिरे तोडून आपली प्रार्थनास्थळे उभी केली. त्यांना काय इतर जमिनी नव्हत्या? खरेतर कुणाच्याही धर्मस्थळांवर मशिदीची स्थापना त्यांच्या धर्गग्रंथांनाही मान्य नव्हती आणि नाहीदेखील. ते पवित्र स्थान मानले जात नाही. बाटलेले मानले जाते. तरीही मंदिरे बाटवून, बाटलेली प्रार्थनास्थळे उभी करण्यात आली. गुलामांच्या निर्मितीसाठी जाज्वल्य राष्ट्राभिमानाची राखरांगोळी करण्याचा तो प्रयत्न होता. परकीयांनी हे केले, त्यात त्यांची क्रूर सत्ताकांक्षा होती; पण स्वतंत्र भारतात स्वकीय सत्ताधार्‍यांनीही तेच करावे? या देशाची चेतनाच बंदिस्त करून ठेवावी? मतांच्या राजकारणासाठी परकीय सत्ताधार्‍यांचा गुलाम धर्म स्वीकारून त्यांच्या भुलीत असणार्‍यांचे लांगूलचालन करण्यासाठी राम नावाचे चेतनतत्त्वच बंदिस्त करून ठेवले गेले. त्यांनी गावांची, नगरांची नावेही बदलली. औरंगाबाद, असिफाबाद, अहमदनगर ही काय आधीपासूनची नावे होती का? ती मुद्दाम बदलण्यात आली. या देशात ‘क्वीन’ कधीच नव्हती तरीही ‘क्वीन्स गार्डन’ मात्र आहे. आमच्या रेल्वेस्थानकांना त्यांनी व्हिक्टोरिया टर्मिनल्स, असे नाव दिले होते. नावांनी काय होते, असे आता आमचीच काही कथित सहिष्णू मंडळी विचारत असतात. तसे असेल तर त्यांनी या देशातील क्रांतिकारकांची नावे का नाही दिलीत? का नाही भगतसिंगनगर? औरंगाबादला का नाही दिले संभाजी राजांचे नाव? आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून कुतुबमिनार उभा केला गेला. विजय कुणावर? कुणाचा? त्यांच्या परकी सत्तेची आठवण कायम राहावी, यासाठी हे सारे करण्यात आले. ती आमच्या अस्मितांवर झाकली गेलेली राख आहे. ती दूर करून राष्ट्र म्हणून आमचे जे स्वत्व आणि सत्त्व आहे ते पुनरुज्जीवित करणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिरच नव्हे, अनेक मंदिरे उभी करता येतील. भव्यदिव्य करता येतील, पण रामललाच्या जन्मस्थळीच ते उभे होणे, यात राष्ट्रीय चैतन्याचा हुंकार आहे. ते मंदिर म्हणजे विटा-मातीचा ढाचा नाही. या देशाचे सत्त्व उजागर करणारे, त्याला नवजन्म देणारे ते गर्भगृह आहे. देश १९४७ साली भौतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या स्वतंत्र झाला, मात्र त्याची चेतना स्वतंत्र होऊ देण्यात आली नाही. परकीय शासक जाताना गुलामगिरीच्या मानसिकतेचे जे काय प्रदूषण सोडून गेले, त्यापासून आता मुक्ती हवी आहे. राममंदिराचे निर्माण ही त्याची सुरुवात आहे. गुलामगिरीची ही प्रतीकं मिटविलीच पाहिजेत…!

https://tarunbharat.org/?p=68471
Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (279 of 902 articles)


वाळके | संविधान दिनी तीन नेत्यांनी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह ते महापरिनिर्वाण स्थळ चैत्यभूमीपर्यंत संविधान बचाव रॅली काढली. ...

×