ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » चिमण्या, टरफले आणि सहगल…

चिमण्या, टरफले आणि सहगल…

‘दिल जलतां है तो जलने दे, आंसू ना बहां, फरीयाद ना कर…’ हे, जुन्या पिढीतील प्रख्यात गायक सहगल यांचे गाणे होते. आता त्या गाण्याची लय आणि अर्थासारखीच अनेकांची अवस्था झालेली आहे. ९२ व्या साहित्य संमेलनाच्या प्रस्तावित उद्घाटिका, प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजकांनी सविनय नकार कळविला आहे. रीतसर निमंत्रण देऊन, निमंत्रणपत्रिकेत नाव टाकल्यावरही मान्यवर साहित्यिकाला अशा रीतीने ‘येऊ नका,’ असे सांगणे योग्य नाहीच. मात्र, तसे पहिल्यांदाच झालेले आहे. तसे व्हायला नको होते. आता झाले आहे, त्यानंतरचे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेचा मानदंड असलेले हे अखिल भारतीय साहित्य संमेलन सुचारू रूपात निर्विघ्न पार पडायला हवे, असे आयोजकांना वाटते. सहगल यांचे नाव जाहीर झाल्यापासूनच त्याला विरोध होता. अर्थात, विरोधाचा सूर भाषक स्वरूपाचा होता. त्यामागे प्रांतीय अस्मिता होती. इंग्रजीत लेखन करणार्‍या लेखिकेला साहित्य संमेलनाचे उद्घाटन करायला का बोलावले, असा मूळ आक्षेप होता. तो स्थानिक मनसेने घेतला होता. ‘नाहीतर हे संमेलन उधळून लावू,’ असा दमही मनसेने दिला होता. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या पृष्ठभूमीवर असे श्रीमंत आयोजन का केले जावे, असाही एक आक्षेप घेतला जात आहे. त्यांचाही नयनतारांच्या नावाला विरोध होता.
संमेलनाचे उद्घाटन याआधीही परभाषक साहित्यिकांनी केले आहे. सांगलीच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन एस. एल. भैरप्पा यांनी केले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्या वेळी कुणी असा आक्षेप घेतला नव्हता. आताच तो घेण्यात आला. त्याला ते भारतीय भाषांतच लिहिणारे होते, असे उत्तर दिले जाऊ शकते. आता सहगलबाईंना कळविण्यात आले आहे. त्यांनीही जसा निमंत्रणाचा स्वीकार केला होता, तसाच अनिमंत्रित करण्याच्या निर्णयाचाही स्वीकार केला आहे. संमेलनाला शुभेच्छाही दिल्या आहेत. महाराष्ट्राशी त्यांचे पैतृक संबंध होते, याची आठवणही करून देत त्यांनी त्यांचे कथित भाषण आधीच पाठविले होते आणि त्यातला काही मजकूर खटकला असावा म्हणून मला नकार देण्यात आला असावा, असा खेदही व्यक्त केल्याच्या बातम्या आहेत. आता त्यावरून वाद विकोपाला गेला आहे. त्या अर्थाने यवतमाळचे साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे, असे म्हणावे लागेल. वादाची परिसीमा किंवा परिसीमेचा वाद झाल्याशिवाय हे संमेलन होत नाही. अगदी भाषा-संस्कृती या क्षेत्राला न शोभणारा रांगडा, रासवट वाद होत असतो. बर्‍याचदा तो वाङ्मयबाह्य करणानेच होत असतो. कधी साहित्य संमेलनाचा मंडप बांधताना बोकूड कापला म्हणून वाद होतो आणि कधी मग संमेलनाध्यक्षांची वाङ्मयकार म्हणून वैचारिक भूमिकाच मान्य नाही, म्हणून होतो. अगदी निर्वाचित संमेलनाध्यक्षांना संमेलनाची सूत्रेच स्वीकारू देण्यात न आल्याच्याही घटना घडल्या आहेत. महाबळेश्‍वरचे साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविनाच पार पडले होते. त्या वेळी महामंडळाचे अध्यक्ष असलेले मराठवाड्याचे कौतिकराव ठाले-पाटील यांनीच संमेलनाध्यक्षांची सूत्रे स्वीकारली होती आणि त्या वेळी, आतावर झालेल्या साहित्य संमेलनाध्यक्षांची जातीय वर्गवारी करून दाखविली होती. थोडक्यात, ही संमेलने कशी ब्राह्मणी असतात, हेच त्यांना त्या वेळी सांगायचे होते. आता नयनतारा सहगल यांच्यासाठी अश्रुपात करत त्यांना पुन्हा संमेलनाला बोलवा नाहीतर आम्हीदेखील येणार नाही, असे म्हणत संमेलनावर बहिष्कार घालणार्‍या निमंत्रितांनी तेव्हा असा काही विरोध केला होता, निषेधाची भाषा वापरली होती, असे स्मरत नाही.
कुडमुड्या विरोधकांना घाबरून असा निर्णय आयोजकांनी घेण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचा बंदोबस्त करता आला असता. जे काही उभे करण्याची ताकद ठेवतात त्यांच्यातच काही उधळण्याची क्षमता असते. किमान विदर्भात तरी मनसेची अशी काही ताकद नाही अन् आता तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही, माझा नयनतारा यांना विरोध नाही, माझ्या सहकार्‍यांची ही भूमिका होती, असे म्हणून झाले आहे. अर्थात, त्यांनी ही उदार भूमिका मांडण्यास बर्‍यापैकी वेळ दवडला आहे. ते त्यांना आधीच कळायला हवे होते. आता राज यांनी कितीही स्वागत केले, तरीही सहगलबाई काही येणार नाहीत. त्यांना निमंत्रित करण्यात जसा मनसेचा किंवा राज यांचा सहभाग नव्हता तसाच त्यांना पुन्हा निमंत्रित करण्यातही असण्याचे काहीच कारण नाही.
या सार्‍या प्रकरणाचे आता राजकारण करण्यात येत आहे. तेही वर्तमान सामाजिक परिप्रेक्ष्यात वेगळे काही होते आहे, असे नाही. फार आदर्श अपेक्षा करणे विद्यमान स्थितीत गैरच आहे. हे सारे घडवून आणण्यामागे अदृश्य शक्तींचा हात आहे, अशी कुजबुज आता सुरू झाली आहे. त्या अदृश्य शक्ती कुठल्या, ते स्पष्टपणे सांगण्याचे अभिव्यक्तिधारिष्ट्य मात्र दाखविले जात नाही. विरोधक आणि विरोधी मतांचाही आदर करण्याची संस्कृती ‘अदृश्य’ शक्ती, अशी ज्यांची संभावना केली जाते त्यांनी जपली आहे. एकारलेपणाचा सच्च्या विवेकाने विरोधच करायचा झाला, तर नयनतारा सहगल यांचेही समर्थन करता येणार नाही. त्यांनी आणिबाणीला विरोध केला होता, खरेच आहे. त्यासाठी त्यांची मामेबहीण असलेल्या इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे खटकेही उडाले होते, हे जितके खरे आहे तितकेच अकारण पुरस्कार परत करण्याचा आक्रस्ताळेपणाही त्यांनी केला होता. त्यात सम्यक् दृष्टीचा अभावच दिसून आला होता. त्यानंतर आणि त्या आधीही देशात विचारवंतांनी विरोध करावा अशा घटनाच घडल्या नाहीत असे नाही. अगदी शिखांच्या शिरकाणापासून धार्मिक दंगली घडवून आणण्यापर्यंत अनेक घटना निषेधार्हच होत्या. मात्र सहगलबाईंनी त्यांच्या, आता समाजमाध्यमांवर फिरणार्‍या मराठीत भाषांतरित होऊ न शकलेल्या उद्घाटकीय भाषणात अकारण तो वैताग व्यक्त केला आहे, त्यातला एकदशांशही वैताग त्यांनी याआधी व्यक्त केला नव्हता. त्यांच्यासाठी खंतावणार्‍या बहिष्कारशूरांनीही तटस्थ भूमिका याआधी घेतल्याचे ऐकिवात नाही.
मुळात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. एकतर त्यांचे नाव नक्की करताना त्यावर विचार झाला नाही का? धमक्यांना इतक्या लवकर भीक घालण्याचे काय कारण? त्याआधी या आयोजनामागे तन, मन आणि धनाने उभे राहणार्‍या शासकीय यंत्रणेला ही समस्या का सांगण्यात आली नाही अन् अत्यंत महत्त्वाचे म्हणजे नकार देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष, आयोजक यांच्यात झाला. ती बातमी माध्यमांपर्यंत पोहोचविली कुणी? असे करण्यामागचा उद्देश फार निर्मळ नाही, हे तर दिसतेच आहे. महामंडळाच्या अध्यक्षांनी इतरांना, माध्यमांशी कुणीही बोलू नये, असे आधीच सांगितले होते. सहगलबाईंना बोलावून जे काय साध्य करायचे होते, संमेलनाचा जो सूर लावायचा होता तो हेतू अशा पद्धतीने साध्य करण्यात आला आहे. त्यांचे न झालेले भाषण सर्वतोमुखी करण्यात आले आहे. त्या आल्या असत्या तरीही त्याची इतकी चर्चा झाली नसती. हे सारे करण्यामागे असलेल्या डाव्या अदृश्य शक्तींचा हात आहे, त्यांना विदर्भात होणारे हे संमेलन उधळून लावायचे आहे, असा आरोप गैर ठरू नये. विदर्भात होणारे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपसी मतभेद बाजूला सारून सार्‍यांनी उभे झाले पाहिजे. संमेलनाच्या वादाची टरफले, समाजमाध्यमांवर टिवटिवणार्‍या चिमण्या अन् सहगल… सगळेच आता शांत झाले पाहिजे!

https://tarunbharat.org/?p=72027
Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (140 of 847 articles)


वाळके | तीन राज्यांत सत्ता हाती आली म्हणून सत्तेचा माज किती चढावा? मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना जरा अधिकच माज चढलेला ...

×