ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » उपलेख, संपादकीय » जालियनवाला बाग हत्याकांड : वैशाखातील वणवा!

जालियनवाला बाग हत्याकांड : वैशाखातील वणवा!

प्रवीण भागडीकर |

१३ एप्रिल १९१९ रोजी, बैसाखी सणाला ब्रिटिशांनी जालियनवाला बाग येथे नि:शस्त्र समुदायावर गोळीबार करून ३७९ जणांना क्रूरपणे मारले (ब्रिटिश शासनाच्या अहवालातील हा आकडा असून, भारतीय काँग्रेसने नेमलेल्या समितीने हा आकडा हजारापेक्षा अधिक सांगितला). भारतीय इतिहासातील ‘नृशंस हत्याकांड’ म्हणून याचा उल्लेख केला गेला. अगदी पंतप्रधान चर्चिल यांनीसुद्धा त्यावेळेस या घटनेचा निषेध केला. या घटनेमुळेच गांधीजींच्या असहकार व एकूणच चळवळीला जागतिक प्रतिसाद प्राप्त झाला. शीख नववर्षाच्या प्रारंभी घडलेल्या या नृशंस हत्यांकाडाने केवळ पंजाब नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वेगळी दिशा देण्यास बाध्य केले. िंकंबहुना भारतीयांच्या मनात आता केवळ ‘स्वतंत्र भारत’ ही धारण निर्माण करण्यास ही घटना कारणीभूत ठरली.
ज्या वेळेस ब्रिटिश साम्राज्याचा प्रारंभ भारतात झाला त्यावेळेस ब्रिटिशांनी, संसदेत आमचे भारतातील अस्तित्व केवळ भारतीयांना जबाबदार व उत्तरदायी शासनासाठी तयार करण्यासाठीच होय व त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. ब्रिटिशांचे भारताप्रती धोरण याच दृष्टिकोनातून असेल, असे आपल्या प्रसिद्ध अशा ऑगस्ट १९१७ च्या जाहीरनाम्यातून दिले. भारतीयांनीसुद्धा त्याचे स्वागत केले. पण, १९१७ मधील जाहीरनामा व १९१९ मधील जालियनवाला बाग येथे केलेले हत्याकांड याने ब्रिटिशांच्या भारताप्रती असलेल्या धोरणातील विसंगती जगासमोर आणल्या.
ब्रिटिशांनी संपूर्ण जगभरात स्वत:बाबत व इतर जगाबाबत एक प्रतिमा निर्माण केली. ज्या अंतर्गत ब्रिटिश साम्राज्यासाठी वसाहती असणे अत्यंत गरजेचे होय. लोकशाही व साम्राज्यवादाच्या सहअस्तित्वाची संकल्पना ब्रिटिशांच्या मनात व डोक्यात रुळलेली होती. ‘व्हाईट मॅन बर्डन’ ही मानसिकता या दोन्ही संकल्पनांचा मिलाफ होय. या संकल्पनेनुसार संपूर्ण जगात लोकशाही व उदारमतवादाचा प्रसार करण्यासाठी साम्राज्यवादी वृत्ती असणे गरजेचे होय. त्यामुळे एकीकडे ऑगस्ट जाहीरनामा हा लोकशाही व उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करतो, तर जालियनवाला बाग हत्यांकाड हा साम्राज्यवादाचे प्रतीक होय. त्यामुळे रौलेट कायद्याच्या आड ज्या ‘कायद्याच्या राज्याची’ संकल्पना ब्रिटिशांनी आणली, त्याच कायद्याच्या राज्याचे अतिशय भयानक रूप म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड होय!
जालियनवाला बाग प्रकरणाचा दुसरा पैलू हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. स्वत:ला उदारमतवादी व लोकशाहीवादी म्हणणार्‍या ब्रिटिशांकडून इतका भयानक नरसंहार कसा झाला? याचे कारण म्हणजे पंजाब प्रांत हा ब्रिटिशांसाठी वसाहतवादाचे आदर्श रूप होते. १८५७ च्या स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाला नेस्तनाबूत करणार्‍या ब्रिटिशांच्या लष्करातील मोठा भाग पंजाबातील लष्कराने व्यापलेला होता. ब्रिटिश भारतीय वसाहतवादाचे हृदयस्थान म्हणून पंजाबचे महत्त्व होते. जालियनवाला बाग प्रकरण हृदयस्थानाला हलविणारे होते, जे ब्रिटिशांना मान्य नव्हते. भारतातील इतर कोणत्याही भागामध्ये असंतोष निर्माण झाल्यास त्यापासून ब्रिटिशांना सुरक्षित ठेवण्याचे कार्य हा प्रांत करेल, अशी खात्री व विश्‍वास त्यांना होता. ब्रिटिश साम्राज्याचा चेहरा या अर्थाने त्यांनी पंजाब प्रांताला महत्त्व दिले. असा पंजाब गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देतो, ही कल्पनाच ब्रिटिशांना मान्य नव्हती. जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांच्या नीच मानसिकतेचे प्रतिबिंब होते. जनरल डायरसारखी व्यक्ती ही केवळ निमित्तमात्र होती. त्यांची अगतिकता, असुरक्षितता इतकी वाढली की, बैसाखीचा सण असूनही त्यांनी हत्याकांड केले व असे करताना त्यांनी केवळ पंजाब अथवा संपूर्ण भारतालाच नव्हे, तर सैन्यात असलेल्या पंजाबी लष्कराला एकप्रकारे संदेश दिला.
जालियनवाला बाग व त्यापूर्वी संपूर्ण पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध जो रोष होता त्याचे नेतृत्व करणार्‍या डॉ. किश्तलू व डॉ. सत्यपाल यांना ब्रिटिशांनी अटक केली. परिणामी, आंदोलन नेतृत्वहीन झाले. गांधीजींनी घोषित केलेल्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त प्रभाव पंजाबमध्ये होता. ब्रिटिशांची अस्वस्थता व संशय वाढविण्यात पंजाबमधील परिस्थिती पूरक ठरली. ज्या पंजाबला त्यांनी आपल्या वसाहतवादाचे हृदयस्थान मानले, तो पंजाबच एका मोठ्या षडयंत्राचे केंद्रस्थान बनत आहे, हे त्यांना सहन झाले नाही. हंटर आयोगासमोर जनरल डायरने, जालियनवाला बाग हत्याकांडाचा जो कबुलीजवाब दिला तो या अस्वस्थतेचा पुरावा होय. त्यातच बैसाखीसारखा दिवस निवडणे हा केवळ योगायोग नाही, तर जाणूनबुजून संस्कृतीला दिलेले आव्हान होते. पण नियतीचा खेळ पाहा, ज्या जालियनवाला बागेत हत्याकांड घडले त्यावेळेस तिथे असलेल्या व नशिबाने वाचलेल्या व्यक्तीने तब्बल २० वर्षांनंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूत्रधार व पंजाबचा ले. जनरल ओडवायर याचा लंडनमध्ये जाऊन मुडदा पाडला व हत्याकांडाचा बदला घेतला. त्या व्यक्तीचे नाव होते- उधमसिंग!
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जालियनवाला बाग हत्याकांड ही केवळ घटना नसून, तत्कालीन भारतीय मानसिकतेला छेद देणारी होती. जालियनवाला बाग हत्याकांडापूर्वी ब्रिटिश राजकारणाच्या दोन विरोधी छटा होत्या. नुकताच उदयास आलेला मध्यमवर्गीय वर्ग जो फक्त मोठ्या शहरांपुरताच मर्यादित होता तसेच स्वत:ला उदारमतवादी, कायदेपंडित व अहिंसावादी मानत होता. याविरुद्ध असा वर्ग जो शेतकरी, कलावंत, मजूर, कामगार असा होता तसेच प्रतिक्रियावादी व हिंसक होता. हत्याकांडापूर्वी या दोन्ही वर्गाने आपली ओळख व अस्तित्व समांतर रीत्या कायम राखले. ब्रिटिशांचा या दोन्ही वर्गांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सहज होता, त्यामुळे दोन्ही वर्गाला स्वतंत्रपणे हाताळण्यात ब्रिटिश अपयशी ठरले. नेमकी ही बाब गांधीजींच्या लक्षात आली व त्यांनी या दोन्ही वर्गाला साम्राज्यविरोधी राजकारणात आणून अहिंसावादी गट तयार केला. वर्गीय व जातीय बंधनाला शिथिल करून दोन्ही वर्गाला राष्ट्रीय राजकारणाच्या आकृतिबंधात समाविष्ट करण्याचे महत्त्वाचे कार्य गांधीजींनी केले. इतर झालेल्या घटनांपेक्षाही जालियनवाला बाग प्रकरण राष्ट्रीय राजकारणाला अशा ध्रुवीकरणापासून परावृत्त करणारे ठरले. हत्याकांडाची प्रतिक्रिया संपूर्ण भारतभर होती, याचे कारण वरील दोन्ही वर्गांचे या कारणाने झालेले एकीकरण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीचे खर्‍या अर्थाने भारतीयीकरण झाले ते याच घटनेमुळे. एव्हाना एखाद्या हत्याकांडानंतरच आमची राष्ट्रीयता जागृत होण्याची परंपरा ही पूर्वीपासूनच आहे, याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर आम्हाला आलाच!
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एकीकडे ब्रिटिश साम्राज्यवाद, तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रवाद अशी सरळ उभी रेष ब्रिटिश भारतात दिसून आली. यामुळे भारतात ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध अतिशय सक्षम अशी चळवळ उभारता आली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा खर्‍या अर्थाने प्रारंभबिंदू म्हणून जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख करता येईल.
जालियनवाला बाग हत्याकांडाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी राजकारणाच्या पटलावर नोंदविल्या. त्यातील पहिली बाब म्हणजे, अशी राज्यव्यवस्था जी लोकांच्या आशा व आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते, अधिमान्यता प्राप्त करण्यात यशस्वी होते. भारतातील ब्रिटिश राज्य हे अलिप्त व अप्रातिनिधिक होते. ब्रिटिशांचा तथाकथित लोकशाहीवादी व उदारमतवादी चेहरा लोकांचे अंतरंग जाणण्यास अपयशी ठरला व कोणतेही आव्हान व धोक्याबाबत वाजवीपेक्षा जास्त प्रतिक्रियावादी होत गेले. त्यातूनच जालियनवाला बागसारख्या घटना घडल्या. हत्याकांडापूर्वी जी अधिमान्यता ब्रिटिशांना भारतात प्राप्त होती ती एका झटक्यात नाहीशी झाली व ती अधिमान्यता भारतीय राष्ट्रवादाला प्राप्त झाली. जालियनवाला बाग प्रकरण प्रत्येक शासक व राज्यव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण धडा होय. मग ते शासन लोकशाहीवादी असो की एकाधिकारशाही. जालियनवाला हत्याकांड भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला अधिमान्यता प्राप्त करून देणारे ठरले. त्यामुळे तो खर्‍या अर्थाने प्रारंभबिंदू ठरला. १३ एप्रिल १९१९ रोजी पेटलेल्या वैशाखातील या वणव्याने अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला आपल्या कवेत घेतले व १९४७ च्या श्रावणातील स्वातंत्र्याच्या सरींनीच स्वत:ला शांत केले!

https://tarunbharat.org/?p=78143
Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : उपलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, संपादकीय (14 of 898 articles)


उत्सवाला आजच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाने खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५५ ते ५८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा ...

×