ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक » टिपू तर मुस्लिमांनाही पराया!

टिपू तर मुस्लिमांनाही पराया!

चारुदत्त कहू |

जनभावनांचा आदर केला नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, हे कर्नाटकमध्ये टिपू सुलतानच्या जंयतीच्या निमित्ताने दिसून आले. एरव्ही विभिन्न महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या देशभरात शांततेत आणि सद्भावनेच्या वातावरणात साजर्‍या होतात. अनेक धर्मांचे पारंपरिक सण उत्साहात साजरे होतात. ना कुठे पोलिस बंदोबस्ताची गरज भासत, ना कुठे ताण-तणावाची स्थिती असते. पण, टिपू सुलतानच्याच जयंतीच्या निमित्ताने पोलिसांचा प्रचंड फौजफाटा लावण्याची गरज का भासावी? कर्नाटकातील सत्तासमीकरणे बदलताच, या मुद्यावरून होणार्‍या उन्मादावर पाणी फेरले गेले. गेल्या चार वर्षांत टिपूच्या जयंतीला होणारा माहौल आणि विरोधकांतर्फे होणारी निदर्शने यंदा आढळली नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल ५७ हजार पोलिस तैनात करण्यात आले; त्यातील तीन हजार पोलिसांची तैनाती एकट्या राजधानी बंगळुरूमध्ये होती. विरोधाच्या भीतीने मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सचिवालयातील कार्यक्रमाला, प्रकृतिअस्वास्थ्याचे कारण देत दांडी मारली. कुमारस्वामींच्या आधी काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत असत. काँग्रेस पक्षाने नेहमीच टिपूच्या निमित्ताने राजकीय पोळ्या शेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्षात टिपूला देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. हे पूर्णतः अनुचित आहे. टिपूने हिंदूंचाच नव्हे, तर ख्रिस्ती लोकांचाही अनन्वित छळ केला, असे इतिहास सांगतो. मंगळुरूमध्ये राहणारे कॅथलिक नागरिक रॉबर्ट रोसारियो यांच्या मते, टिपू सुलतान हा कनारा ख्रिश्‍चन समाजाचा सर्वात मोठा शत्रू होता. १७६५ ते १७८० या पंधरा वर्षांच्या काळात टिपूने ख्रिस्ती समुदायाच्या अनुयायांचा प्रचंड छळ केला, त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले. त्याचा विसर या समुदायाला कधीच पडणार नाही. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील ख्रिश्‍चन समुदायाच्या अनुयायांवर त्याने इतके अत्याचार केले, की ते कथन करणेही शक्य नाही. त्याने महिला आणि मुलांनाही सोडले नाही, त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले. त्याच्या विस्तारवादी राजकारणाला समर्थन न देणार्‍यांना तसेच धर्मांतराला विरोध करणार्‍यांना टिपूने ठार मारले, त्यांची घरे-दारे तोडली, त्यांच्या चर्चचे नुकसान केले. हजारो कॅथलिक ख्रिश्‍चनांना त्याने सहा आठवड्यांपर्यंत मंगलोर ते श्रीरंगपट्टनमपर्यंत उघड्या पायाने, अन्न-पाण्यावाचून तडफडत चालवत नेले, या दरम्यान हजारोंनी या इहलोकीची यात्रा संपविली. जे उरले त्यांच्या शरीरात काही करण्याजोगे त्राण उरले नाही.
टिपूने केलेल्या अत्याचारांनी इतिहासाची पानेच्या पाने रंगलेली आहेत, पण त्याची जयंती साजरी करणारे याकडे दुर्लक्ष करतात. टिपूला लोकहितवादी आणि जनतेची दुःखं जाणणारा, या भारतवर्षाचा मसीहा, पुरोगामी राजा म्हणून सिद्ध करण्याचा उद्देश राज्यातील जनतेलाही हळूहळू कळू लागला आहे. त्यामुळे यंदा त्याच्या जयंतीला माहौल नव्हता आणि त्यामुळे या कार्यक्रमांना विरोध करणारेही फारसे आढळले नाहीत. हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाने टिपूच्या सरकारीकरणाला विरोध केलेला होता. पण, यंदा कार्यक्रमाचीच रया गेल्याने टिपू जयंतीला फारसे विरोध करण्याचे प्रयोजन राहिले नाही, अशी भाजपाच्या एका युवा नेत्याची प्रतिक्रिया अतिशय बोलकी म्हणावी लागेल. किंबहुना गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यंदा यश आले, असेही म्हणायला हरकत नसावी.
टिपूने भारतीय नागरिकांवर, येथील छोट्या जनजातींवर, आदिवासींवर केलेल्या अनन्वित अत्याचारांवर एकवार लक्ष दिले जायला हवे, म्हणजे त्याची जयंती साजरी करणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाईल! पण, झोपलेल्याला जागे करता येते, ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना कसे काय जागे करणार? त्यामुळेच सारे दाखले देऊनही काँग्रेसच्या आणि जनता दल सेक्युलरच्या भूमिकेत काही फरक पडेल, असे वाटत नाही.
मेलुकोट येथे टिपूने एकाच दिवशी मध्यम अय्यंगार समुदायाच्या ७०० हून अधिक लोकांची सामूहिक कत्तल केली होती. वाल्मिकी आदिवासी समुदायातील १० हजार मदाकारी नायक सैनिकांना त्याने कैद करून ठेवले होते. त्यांचा त्याने अनन्वित छळ केला, त्यांना फाशी दिली किंवा त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. म्हैसूर राजघराण्यातील सदस्यांना त्याने अटक केली आणि त्यांचे धर्मपरिवर्तनही केले. तंजोरचे तमीळ भाषक लोक आणि मराठ्यांच्या हत्यांसाठीही टिपूला जबाबदार धरले जाते. या समाजाच्या २० हजार लोकांना त्याने ओलीसही ठेवले होते. कोडाव समुदायाच्या लोकांची सामूहिक हत्या, त्यांचा छळ आणि धर्मपरिवर्तन टिपूनेच केले. टिपूच्याच कारकीर्दीत एक लाखांहून अधिक कोडवा समुदायाच्या लोकांची पिळवणूक करण्यात आली. टिपूने दोन दशकांच्या त्याच्या कारकीर्दीत कोझीकोडमधील नंबुद्री आणि मालाबारमधील नायर समुदायाच्या सुमारे चार लाख लोकांच्या कत्तली केल्या. याच काळात त्याने चार लाख लोकांना इस्लाममध्ये सामील करवून घेतले. टिपूने कर्नाटकातील सीमावर्ती भागातील ख्रिस्ती समुदायाच्या ८० हजार धर्मानुयायांना ओलीस ठेवले होते व त्यातील केवळ १५ हजार ख्रिस्तींची सुखरूप सुटका होऊ शकली. त्याच्या कार्यकाळात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील ८०० हून अधिक मंदिरांची तोडफोड आणि मूर्तिभंजन करण्यात आले. विशेष म्हणजे हिंदूंमध्ये मूर्तिभंंजन झालेल्या मंदिरात पूजाअर्चा केली जात नाही.
टिपूने अय्यंगार समुदायाविरुद्ध केलेले अत्याचार, केरळमधील कोडागूच्या मंदिरांचा केलेला विध्वंस, देवाती पारांबूचे सामूहिक हत्याकांड, गंजम येथील जोर-जबरदस्तीचे धर्मांतरण, कालिकत आणि कोडागू येथील हिंदूंच्या वसत्यांची केलेली जाळपोळ, या बाबी आता सर्वसामान्यांना माहीत होऊ लागल्या आहेत. त्याने ख्रिश्‍चनांवर केलेले अत्याचार अनेक इतिहासकारांनी आणि राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी दडवून ठेवले. नेट्टानागिरी येथे टिपूच्या फौजांनी ५००० ख्रिस्ती लोकांना एकाच दिवशी धराशायी पाडले आणि महिलांशी दुर्व्यवहार केला. आमच्यावरील अन्यायाला ना बिशप्सनी, ना राजकारण्यांनी आवाज फोडला, अशी तक्रार ख्रिस्ती समुदायातील सुधारणावादी नेते रॉबर्ट रोसारियो करतात.
टिपूच्या रक्तरंजित इतिहासाबाबत अवगत असूनही २०१५ मध्ये कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने त्याच्या जयंतीचे निमित्त साधून, त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. केवळ अल्पसंख्यक समुदायाची व्होट बँक डोळ्यांपुढे ठेवून टिपूच्या जयंतीचे भूत उभे केले गेले. टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याची मागणी मुस्लिम समुदायाच्या धर्ममार्तंडांकडून नसतानाही, तसे फासे टाकले गेले. मुस्लिम समुदायाला आणखी लहान लहान जातीत वाटण्याची खेळी सिद्धरामय्यांनी खेळली. याच सिद्धरामय्यांनी हिंदू समुदायात फूट पाडून कर्नाटकात सत्तेचा सोपान सर करण्याची खेळलेली खेळी अपयशी ठरली. निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंमधील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतला आणि तो त्यांच्यावर उलटला! एकीकडे काँग्रेस टिपूचे गुणगान करण्यात कुठलीच कसर बाकी ठेवत नसताना, सुन्नी युथ फोरमने टिपूची जयंती साजरी करणे इस्मामविरोधी असल्याचे घोषित करून काँग्रेसच्या कार्यक्रमाला सुरुंग लावला. वस्तुस्थिती अशी आहे की, टिपूची जयंती कुठल्याही मशिदीत, मदरशांमध्ये व मुस्लिमांच्या समाजमंदिरांमध्ये साजरी होत नसताना, काँग्रेसला त्याची जयंती साजरी करण्याची उपरती कशी झाली, हा खरा प्रश्‍न आहे. कुठल्याही मुस्लिमाच्या घरी टिपूचे पूजन केले जात नाही, ही बाब ध्यानात घेतली जायला हवी. त्यामुळे टिपूचे प्रस्थ वाढविणे, ही सारी सरकारची किमया असल्याचे सुन्नी युथ फोरमचे म्हणणे आहे. मुस्लिम समुदायाकडून कुठलीच मागणी नसताना टिपूचे गुणगान गाण्यामागे कोणते राजकारण आहे, हे समजून घेतले गेले पाहिजे. मुस्लिमांमध्ये जेवढी दुफळी माजेल, तेवढा त्याचा फायदा जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांच्या युतीला होईल, एवढे निश्‍चित! टिपू सुलतान हा केवळ राजा होता, त्याला स्वातंत्र्य सैनिक ठरविण्याचा आटापिटा काँग्रेसतर्फे आणि सोयीचा इतिहास लिहिणार्‍या इतिहासकारांतर्फे का केला जात आहे, असा सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये उपस्थित केला होता. टिपूने किती विवाह केले आणि त्याच्या जनानखान्यात राजघराण्यातील किती महिला, मुली होत्या, हे त्याचे त्यालाच ठाऊक! २०१५ पासून टिपूला मसीहा ठरविण्याचे, ‘म्हैसूरचा वाघ’ म्हणून गौरविण्याचे सुरू झालेले प्रयत्न आता निष्फळ होताना दिसत आहेत. पराभवातून कदाचित काँग्रेसने हा धडा घेतला असावा. असो. सत्तेसाठी पत्करलेला ‘टिपू-मार्ग’ राज्यातील जनतेने आणि मुस्लिम समुदायानेही एका अर्थी कलम केला आहे…!

https://tarunbharat.org/?p=68959
Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक (255 of 1422 articles)


अर्थव्यवस्थेत, जीडीपीत घट झाल्याचा निष्कर्ष, केंद्र सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी काढला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात हा दावा त्यांनी ...

×