ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?

तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?

असा प्रश्‍न महाभारतात द्रौपदीने कर्णाला विचारला होता. महाभारतात जे जे घडले ते आणि त्याच्या पलीकडे जगात घडू शकत नाही, असा दावा व्यासांनी केला आहे. तो सार्थही आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात हाच प्रश्‍न मराठा नेत्यांना विचारण्याची वेळ आली आहे आणि तो बहुजनांपासून तर मराठा समाजापर्यंत सारेच विचारू लागले आहेत. महाराष्ट्र सरकारने मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मराठा सामाजाला आरक्षण जाहीर केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण या एकाच मुद्यावर ढवळून निघाले होते. मराठा समाजाच्या मूक मोर्चांनी जो आवाज निर्माण केला त्याची उत्तरे विविध माध्यमांतून, गेला काही काळ शोधली जात होती. हा प्रश्‍न केवळ महाराष्ट्राचाच आहे, असे नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रगत समजल्या जाणार्‍या, पण आता आर्थिकदृष्ट्या केविलवाण्या झालेल्या अनेक जाती-समुदायांची हीच मागणी आहे. गुजरातेत पटेलांसाठी, राजस्थानात मीना समाजासाठी, आंध्रातील कापु, हरयाणा, उत्तरप्रदेशात जाट समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के इतकी घालून दिली आहे. अर्थात, ते न्यायसंगतच आहे. महाराष्ट्रात आधीच ही मर्यादा ओलांडली गेली आहे. ५२ टक्क्यांच्या वर ही मर्यादा गेली आहे. आता मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यावर ही मर्यादा ६८ टक्क्यांवर जाणार आहे. तामिळनाडूने आधी हे केले आहे. त्या राज्यात आरक्षणाची ही मर्यादा ६९ टक्क्यांवर गेली आहे. असल्या समस्यांवर अखेर राजकारणाच्या सारिपाटावरच निर्णय घ्यावा लागत असतो. त्यात मग राजकीय दृष्टिकोन आड येतो. कुठलाही राजकीय पक्ष असला तरीही त्यांना आपले मतदार सांभाळावे लागत असतात. त्यामुळे तामिळनाडूने ते केले. अर्थात, हे प्रकरण अखेर न्यायालयात गेले. तिथे तामिळनाडूच्या या मर्यादाउल्लंघनाला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. आता महाराष्ट्राच्या बाबतही मराठा आरक्षणाची पुढची लढाई ही न्यायालयातच लढावी लागणार आहे. सामाजिक लढाई वैधानिक मार्गानेच जिंकावी लागत असते. आता हे काम मराठा समाजाच्या नेत्यांना करावे लागणार आहे. ते तितके सोपे नाही. आता यावर मार्ग म्हणजे विधेयक आणणे किंवा मग अध्यादेश काढणे, हेच आहे. अर्थात, राज्य सरकारने निर्णय घेतानाच पुढे काय काय नि कसे करावे लागणार, याची योजना तयार केलेलीच असेल. राजकीय सारिपाटावर ही लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिंकली आहे. देशात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी सत्ताधार्‍यांना घेरण्यासाठी विरोधकांनी हा मुद्दा ज्वालाग्राही करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, त्याची पुरेपूर जाणीव मराठा समाजाला होती. भाजपाच्या पाठीशी असलेला बुहजन समाज तोडण्यासाठीदेखील मराठा आरक्षणाची खेळी राजकीय विरोधक करत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का बसेल आणि त्यात सत्ताधार्‍यांची गोची होईल, अशी ही खेळी होती. आता त्यावरही मात करण्यात आली आहे. अर्थात, त्यात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा, ही कळकळदेखील सत्ताधार्‍यांच्या एकुणातच निर्णयप्रक्रियेत होती. त्यामुळे विरोधकांची आता कोंडी झालेली आहे. त्यावर मात म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाचे राजकीय नेते, आता लागू करण्यात आलेल्या आरक्षणात खोट काढू बघत आहेत. मराठा समाजाला मिळणारे आरक्षण अक्षुण्ण असावे यासाठी सरकार प्रयत्न करणारच आहे, त्याला समाजाचीही सोबत हवी आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यावर मराठा समाजाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विरोधी पक्षांत असलेले- समाजाने मराठाच असलेले- नेते मात्र आता त्यात खोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी फेडरेशनच्या माध्यमातून मराठा आरक्षण लागू होण्याच्या आधीच त्याला नख लावण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल देणारा मागासवर्ग आयोग घटनाबाह्य पद्धतीने नेमला गेल्याचा व सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या संस्था मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्न आहेत, असाही आरोप ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी केला. केवळ विकासाच्या नावाने मते मागून सत्तेत आलेल्यांनी गेल्या चार वर्षांत राज्यासमोरचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यात शेतकर्‍यांच्या समस्यांपासून तर उद्योगनिर्मितीपर्यंत आणि विकासाचे प्रादेशिक असंतुलन दूर करण्यापर्यंत अनेक कामे करण्यात आली आहेत. आता निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जातिपातीचे राजकारण खेळविले जात आहे. मराठा समाजालाही ही खेळी चांगली समजली आहे. मराठा समाजानेच आपल्याच समाजाच्या राजकीय धुरिणांना अनेक प्रश्‍न केले आहेत. मुळात हा समाज शेती करणारा. परंपरेने कृषक असलेला. गेल्या पाच दशकांत शेतीची काय अवस्था झालेली आहे, हे वेगळ्याने सांगायला नको. त्याला कोण कारणीभूत आहे? निर्णय घेणारे आणि सत्तेत असलेले कोण होते? शेतकर्‍यांचीच मुले राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी शेती करणार्‍या आपल्याच या समाजासाठी काय केले? मराठा समाजाचे राजकारणी नेते आज कुठे आहेत आणि समाज कुठे आहे? नेते आणि समाज यांच्यातली दरी दिवसेंदिवस रुंदावतच गेली. मुळात अत्यंत संपन्न असलेल्या या समाजाची आर्थिक दुरवस्था झाली त्या सर्वच काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्याच समाजाचे नेते लाल दिवा मिरवीत होते. त्यांची घरे भरली. त्यांची मुले परदेशात गेली, स्थायिक झाली अन् त्यांचा समाज मात्र, ‘‘आम्ही जल्मलो मातीत, किती होनार गा माती…’’ असे म्हणत होता. नेत्यांनी समाजाला गृहीत धरले. कितीही आणि कसेही हाका, समाज आपल्याच पाठीशी उभा राहणार, असा माज मिरविला. मराठा समाजानेही आपले नेते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सत्ताधारी आहेत, आज ना उद्या आपल्याही पदरात विकासाचे दान पडेल, म्हणत संयम बाळगला. पुढारलेल्या या समाजाला मागास म्हणवून घेण्याची वेळ कुणी आणली, हे त्यांना चांगलेच ठावूक आहे. आघाडी सरकारच्या काळातच मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली होती. त्या वेळी समित्या अन् कमिट्या बसवून वेळ काढण्यात आला. शरद पवार ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत मराठा मुख्यमंत्री असताना या समाजाच्या होत जाणार्‍या दुरवस्थेकडे त्यांचे साधे लक्षही गेले नाही. शेतीविषयक धोरणे चुकत गेली. शेतीचा संकोच होत गेला. परिवार वाढत गेला आणि जमिनीचे तुकडे पडत गेले. शेतीलाच सर्वस्व मानणार्‍या या समाजाने मातीशी इमान राखले; पण त्यांच्या भरोशावर सत्ता उपभोगणार्‍या त्यांच्याच नेत्यांनी मातीशी बेईमानी केली. सत्तेत असताना आपल्या कृषक समाजासाठी पर्यायी अर्थार्जनाची साधनेही या नेत्यांनी निर्माण केली नाहीत. सत्तेत असताना यांनाच हे करता आले असते, ते आता देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आता मात्र आमच्या समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी हे नेते करत आहेत. मग त्यांचाच समाज त्यांना प्रश्‍न विचारतो आहे, ‘‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’’

https://tarunbharat.org/?p=68132
Posted by : | on : 21 Nov 2018
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (45 of 773 articles)


पेठकर | आशा असेपर्यंत बरेच काही टिकून राहात असते. आयुष्याचा धागा आशेवरच असतो. कारण आयुष्याकडून अगदी भिकार्‍याच्याही काही अपेक्षा असतात. ...

×