ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » पाकिस्तानची विषगर्भी कृत्ये!

पाकिस्तानची विषगर्भी कृत्ये!

अखेर ४३ दिवसांनंतर १० एप्रिलला पाकिस्तानने काही निवडक पत्रकारांना बालाकोट येथे नेले. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवाँ प्रांतातील बालाकोट येथील डोंगरशिखरावर असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरावर भारताने हवाई कारवाई केली होती आणि कारवाईत जे साध्य करायचे ते पूर्णपणे साध्य केले आहे, असा दावा भारताने केला होता. ‘भारताचा हा दावा खोटा आहे. तिथे काही झाडे तुटलीत आणि उजाड जागी खड्डे पडले, एवढे सोडले तर तिथे काहीही नुकसान झाले नाही,’ असा प्रतिदावा पाकिस्तानने केला. आपला दावा किती सत्य आहे हे दाखविण्यासाठी, खरेतर पाकिस्तानने लगेचच त्या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश द्यायला हवा होता. परंतु, त्यासाठी पाकिस्तानला ४३ दिवस लागावेत?
पाकिस्तान कैचीत सापडला होता. भारताच्या हल्ल्यात बालाकोट येथील जैशचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, हे सत्य मान्य केले, तर पाकिस्तानच्या भूमीत दहशतवाद्यांना फळण्यास-फुलण्यास पूर्ण मुभा आहे, हे वास्तव जगासमोर पुराव्यानिशी आले असते. त्यामुळे आयएसआयपोषित ३०० ते ३५० प्रशिक्षार्थी दहशतवाद्यांच्या ‘अकाली’ मरणाचे दु:ख, हृदयावर दगड ठेवून, पाकिस्तानने महत्प्रयासाने गिळले आणि लगेचच या संपूर्ण परिसराला लष्कराने जबरदस्त वेढा देऊन तिथे कुणालाही प्रवेशाची अनुमती दिली नाही. भारताने या हल्ल्यात जे स्पाईस नावाचे बॉम्ब वापरले, त्याने बहुतांशी दहशतवादी जळून गेले होते. असे म्हणतात की, पाकिस्तानने या मृतदेहांना कबरीत पुरण्यासाठी वेळ खर्च न करता, त्यांना जाळले आणि बाजूने वाहात असलेल्या नदीत त्यांची राख विसर्जित केली. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर हिंदू अंत्यसंस्कारच केले, असे म्हणता येईल. नाइलाज होता. भारताने घडवून आणलेल्या विनाशाच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकण्याची घाई होती ना! आमचे काहीच नुकसान झाले नाही, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी तिथे प्रत्यक्ष जाऊ देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मीडिया सतत करत राहिला. परंतु, कधी स्थानिक परिस्थिती बरोबर नाही, तर कधी हवामान योग्य नाही, असली कारणे पाकिस्तान देत राहिला. आपल्या हवाई दलाच्या कौशल्याच्या व भेदक सिद्धतेच्या जनतेसमोर केलेल्या वल्गनांवरून त्यांचा विश्‍वास उडून जाऊ नये म्हणून, पाकिस्तानला काहीतरी करणे भाग होते. ते त्याने केले. भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा असफल प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्याचे अमेरिकी बनावटीचे एफ-१६ हे अत्याधुनिक विमान, भारताच्या जुन्या मिग-२१ बायसन विमानाने पाडले. आता पुन्हा पाकिस्तानची पंचाईत झाली. आमचे एफ-१६ हे विमान भारताने पाडले, याची जाहीर कबुली त्याला देता येईना. कारण, ही लढाऊ विमाने खरेदी करताना, भारताच्या दबावामुळे अमेरिकेने पाकिस्तानसमोर अट ठेवली होती की, या विमानांचा वापर भारताविरुद्ध कधीही करणार नाही. परंतु, गडबडीत तो वापर तर केला गेला होता. त्यामुळे आजही पाकिस्तान एफ-१६ विमान भारताने पाडलेच नाही, असे म्हणत आहे. या विमानाचा चालक यात मरण पावला आहे. पण, त्यालाही कुठलाच लष्करी सन्मान पाकिस्तान देऊ शकत नाही. कारण, तसे केले तर आपण भारताविरुद्ध एफ-१६ विमान वापरले होते, हे सिद्ध होईल. आधीच रागावलेली अमेरिका त्यानंतर आपले काय हाल करील, याची पाकिस्तानला कल्पना असली पाहिजे.
या सर्व घडामोडीत जगाचे लक्ष बालाकोटहून दुसरीकडे वळविण्यात पाकिस्तानला थोडे यशही आले. तिकडे बालाकोट येथे उद्ध्वस्त झालेल्या सर्व इमारती युद्धपातळीवर बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कुठे आंतरराष्ट्रीय पत्रकारांना तिथे नेण्याचा मुहूर्त काढण्यात आला. तोही केव्हा, तर भारतात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आधल्या दिवशी. हा काही निव्वळ योगायोग नाही. मुद्दामच हा दिवस निवडला असावा. जेणेकरून भारतातील पाकिस्तानधार्जिण्या पत्रकारांना तसेच राजकीय नेत्यांना, मोदी सरकारविरुद्ध धुराळा उडविण्यासाठी एक नवे अस्त्र उपलब्ध व्हावे.
यासंबंधीचा एक व्हिडीओ पाकिस्तानने जारी केला आहे. त्यात, बालाकोटच्या डोंगरशिखरावर एक अत्याधुनिक नवी कोरी करकरीत शाळा दिसते. नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. प्रशस्त खोल्या आहेत. त्यात गणवेश घातलेली काही मुले आहेत. त्यांना शिकविणार्‍या देखण्या शिक्षिका आहेत. पत्रकार त्या मुलांना प्रश्‍न विचारतात. मुले म्हणतात, आम्ही सर्व इथलीच स्थानिक मुले आहोत. या पथकासोबत पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर आहेत आणि ते सर्वांना माहिती देत आहेत. जेमतेम २० मिनिटांची ही भेट आहे. या भेटीत ही मुले आणि पत्रकार यांना कुठेही मोकळा संवाद करू देण्यात आला नाही. जगाने सोडाच, परंतु भारतातील पाकधार्जिण्या मीडियानेदेखील या व्हिडीओला विश्‍वसनीय मानले नाही. आपण जर या व्हिडीओवरून मोदी सरकारला घेरले, तर कदाचित जनता आपल्याला चांगलीच सोलून काढेल, अशी भीती भारतीय मीडियाला असावी. पण केव्हा ना केव्हातरी, कदाचित निवडणूक झाल्यावर भारतीय मीडियाची पाकधार्जिणी वृत्ती उसळून बाहेर येऊ शकते. जगाला बालाकोटची जागा दाखविण्याच्या बहाण्याने भारतातील निवडणुकीचे वातावरण विषाक्त करण्याची पाकिस्तानची ही एक विषगर्भी कृतीच म्हणता येईल.
अगदी याच सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, इस्लामाबाद येथे काही विदेशी पत्रकारांशी संवाद साधताना विधान केले की, जर भारतात यावेळी भाजपा जिंकली तर काश्मीरबाबत काहीतरी तोडगा निघण्याची आशा आहे; तसेच भारत-पाकदरम्यान शांतिवार्ता सुरू होण्याची अधिक संधी आहे. इम्रान खान असेही म्हणाले की, जर काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, तर उजव्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रियेला घाबरून हे सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयार होणार नाही. यावरून इम्रान खान यांना असे दर्शवायचे आहे की, भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांतिवार्तेचा इतिहास बघितला, तर भाजपा सोडली तर काँग्रेससह कुठल्याही पक्षाने पाकिस्तानशी शांतिवार्ता करण्यास पुढाकार घेतलेला नाही. इम्रान खान यांचे हे प्रतिपादन काही अंशी खरेही आहे. भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी हे पंतप्रधान सोडल्यास, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या काँग्रेसी पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीर्दीत कधीही पाकिस्तानला भेट दिलेली नाही. परंतु, इम्रान खानच्या या वक्तव्याने एकदम हुरळून जायचे कारण नाही. इम्रान खानचीही इच्छा आहे की, भारतात मोदीच जिंकावे वगैरे असले निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. इम्रान खानच्या या वक्तव्यावर काँग्रेससहित विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर इम्रान खान यांनी हे विधान निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच केले असण्याची दाट शक्यता आहे. विरोधी पक्षांनी, मोदी व इम्रान खान यांचा गुप्त समझोता झाला असल्याचे आरोप करीत, तसा धुराळा उडविणे सुरूही केले आहे. त्यामुळे पाकिस्तानची ही कृतीही विषगर्भीच मानली पाहिजे. थोडक्यात काय, नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनेते मणिशंकर अय्यरांनी पाकिस्तानात जाऊन मदत मागितली होती. त्याचेच हे विषफळ म्हणून, विरोधी पक्षांच्या मदतीला धावून येण्याचे पाकिस्तानचे हे (पूर्वनियोजित?) प्रयत्न आहेत, असेच आपण समजले पाहिजे…

https://tarunbharat.org/?p=78144
Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (19 of 904 articles)


भागडीकर | १३ एप्रिल १९१९ रोजी, बैसाखी सणाला ब्रिटिशांनी जालियनवाला बाग येथे नि:शस्त्र समुदायावर गोळीबार करून ३७९ जणांना क्रूरपणे मारले ...

×