ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:

पुलंचे सादर होणे…

श्याम पेठकर |

पुल ऐन बहरात असताना त्यांना भेटावं, ऐकावं असं वाटण्याचं वय नव्हतं. परिस्थितीही तशी नव्हती. परिस्थितीचा अर्थ केवळ आर्थिक असा नाही. वय, वर्तमान, भूगोल आणि सांस्कृतिक पर्यावरणही यात येतं. पुल मराठी लेखकांच्या पोहोचण्याच्या आणि लोकप्रियतेच्या सार्‍या मर्यादा तोडून केव्हाच बाहेर पडले होते. त्यांच्या आधी इतका उदंड स्वीकार आणि सर्वस्तरातले हवेहवेसेपण, लाडकेपण आचार्य अत्रे यांनाच मिळाले होते. पुलंनी त्याही कक्षा ओलांडल्या होत्या. त्यामुळे सांस्कृतिक समज असलेले शिक्षक असणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंतही पुल लेखक म्हणून पोहोचले होते.
पुल पांढरकवड्यासारख्या आदिवासीबहुल गावातही पोहोचले होते. आताचे अत्यंत मोठे मराठी लेखकही कुणाला फारसे माहिती नसतात. पुल मात्र नावानी, चेहर्‍यानीच नाही तर लौकिकानीही पोहोचले होते. आपल्या हयातीतच एक दंतकथा होण्याचा प्रचंड रसिकाश्रय त्यांना मिळाला होता. याचे कारण होते, ते छापील पुस्तकांत अडकून पडले नाहीत. आपले साहित्य घेऊन ते थेट रसिकांपर्यंत पोहोचले. पुस्तकांच्या पोहोचण्याच्या मर्यादा अजूनही आहेत. आता तर त्याला नव्या माध्यमांचे आणखी अडथळे वाढले आहेत. डिजिटल अक्षरे पाहण्याच्या सवयीने नवी पिढीतर मुद्रित साहित्य वाचण्याची अन् छापील अक्षरांशी तादात्म्य पावण्याची क्षमताच गमावून बसली आहे. त्या काळातही वाचकांची संख्या फार नव्हती अन् ग्रामीण भागांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची साखळीही नव्हती. त्यामुळेे चांगली, नवी पुस्तके नव्या सुपरहिट सिनेमांसारखीच खूप उशिराने पोहोचायची.
पुलंचे यश हे की, ते त्यांच्या पुस्तकांच्या, लेखनाच्याही आधी त्यांच्या रसिकांपर्यंत पोहोचत असत. कारण ते परफॉर्मर होते. त्यांना हे त्यांचे सादर असणे सहर्ष मान्य होते. कुठल्याही सृजनाची आपली एक कलात्मक भाषा असते. कुणी त्याला जे काय सांगायचे ते सृजनाच्या उचंबळीतून चित्रांच्या माध्यमातून सांगते, कुणी गाणे गाते, कुणी शिल्पातून व्यक्त होतं, तर कुणी लेखन करतं. त्यातही कविता, कथा, कादंबरी, नाटक अशीही मग या सृजन भाषेची अक्षरविभागणी होत राहते… पुलंना अशा खूप सार्‍या भाषा अवगत होत्या. त्यांना गाता येत होते, कविताही ते छान करत, अभिनय करत, नाटक लिहीत, विनोदी लेखक म्हणून तर ख्यातच होते. ते निर्मातेही होते. इतकी बहुमुखी प्रतिभा त्यांच्या ठायी होती, कारण ते मुळात परफॉर्मर होते. त्यांना काहीच स्वत:जवळ ठेवता येत नव्हते. जे काय आहे ते देऊन टाकायचे. प्रवाही असले तर सतत नवे काही येत राहील. त्यामुळे ते निखळ होते. समाजाकडे, माणसांच्या जगण्याकडे ते निकोप मिस्कीलपणे बघत. स्वत:ला मॅजिक आरशासारखे समाजासमोर धरीत. आपल्याच चेहर्‍याची अशी विदुषकी रूपं बघताना हसायला येई… चार्ली चॅप्लीन भारतात जन्मला असता तर तो पु. ल. देशपांडेच झाला असता, असे कधीकधी वाटून जाते. तो मूकपणे व्यंग्य करायचा आणि हे बोलता बोलता हसवत अंतर्मुख करायचे. किशोरकुमारच्या बाबतही असेच वाटते. त्याने कधी लेखन केले नाही… बाकी तीही एक बहुमुखी प्रतिभाच होती.
पुल सादरकर्तेच होते म्हणून ते विनोदी लेखक झाले, की विनोदी लेखकांचे रसिकांच्या समोर जाणे हे भागध्येयच असते? कारण आजवर जगात जितके विनोदी लेखक झाले ते परफॉर्मरच राहिले आहेत. अगदी आपल्या इकडेही द. मा. मिरासदारांपासून ते वि. आ. बुवा किंवा मग आता वर्‍हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांच्यापर्यंत सार्‍यांनाच सादर होणे आवश्यकच का वाटत आले असावे? रंगमंचावर उभे राहण्यासाठी त्याला स्वत:चा आपला एक आकार हवा असतो. पुलंकडे जी प्रतिभा होती तिची गरज रसिकांशी थेट संवादच साधण्याची होती.
पुल तर इतके नैसर्गिक सादरकर्ते होते की, त्यांना मग औपचारिक व्यासपीठाचीही गरज राहिली नव्हती. त्यांची साधी भेट, हादेखील त्यांचा एक विशेष आणि वेगळा परफॉर्मन्सच असायचा. त्या भेटणार्‍याची अनुभूती हीच असायची की, पुल आज भेटले तेव्हा खास माझ्यासाठी सादर झाले. मग ते कार्यक्रमानंतर कुणाकडे खास आग्रहाने जेवायला गेल्यावरही तिथेही आपला एक वेगळा परफॉर्मन्स द्यायचे आणि मग त्याची नोंद रसिकच ठेवायचे. त्यांच्या अशा अनौपचारिक सादरीकरणांची बखरच रसिकांनी लिहून काढली आणि मग त्यातून पुलंचे किस्से आणि कोट्या वेगळ्याने लिहिल्या गेल्या. प्रकाशित पुलंच्या पेक्षाही हे अप्रकाशित पुलच रसिकांना माहिती आहेत.
पुल नावाच्या लेखकाला वाचक नव्हे तर रसिकच होते. पुल पूर्ण वाचून काढले आहेत, कोळून प्यायलो आहे असे नाही, तरीही पुल पूर्ण माहिती असल्याची अनुभूती बाळगणारे आज ते गेल्यावरही इतकी वर्षे टिकून आहे. एकान्तात बसून लेखन करत राहणे, हा पुलंचा स्वभावच नव्हता. सतत लोकांमध्ये मिसळणे, गप्पा मारणे ही त्यांची गरज होती. सुनीताबाईंना त्यांचे असे लोकाभिमुख असणे, अगदी सामान्य चाहताही भेटायला आल्यावर वेळेचे भान न ठेवता बोलत राहणे आवडत नव्हते. त्यांना असे वाटे की, त्यामुळे या मनोहराचा वेळ जातो आहे. इतका वेळ असा घालविण्यापेक्षा त्यांनी लेखन केले तर याच रसिकांसाठी तो मोठा ठेवा असेल… सुनीताबाई जी. ए. कुळकर्णींच्या पठडीतल्या होत्या. शांत संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसलेल्या बगळ्यागत लेखकाने साधना करावी, असे त्यांचेही इतरांसारखेच मत होते. ते चूक असे काहीच नव्हते. मात्र, असे बेधूम लोकांमध्ये मिसळणे अन् अनुभवत राहणे, हा पुल नावाच्या लेखकाचा रियाज होता. ते लेखक नव्हते, परफॉर्मर होते, त्यामुळे त्यांना साधना नव्हे, तर रियाजाची गरज होती. पुल नखशिखान्त सादरकर्तेच होते. त्यामुळे, एका हिंदी चित्रपटात संवाद आहे, ‘‘हम जहाँ खडे हो जाते है, लाईन वहीसे शुरू हो जाती है…’’ तसेच पुलंच्या बाबत म्हणावे लागायचे, ‘‘वो जहाँ खडे हो जाते है, मैफल वहाँ शुरू हो जाती है…’’
अनेकदा तर त्यांचे विनोदी लेख, कथा हे त्यांनी प्रत्यक्ष लिहून काढण्याच्या आधीच त्यांच्या कार्यक्रमातच तयार व्हायचे. नंतर सुनीताबाई किंवा कुणी आप्त त्यांना आठवण करून देई, तो घर दाखविण्याचा किस्सा छान रंगतोय् अलीकडे तुमच्या कार्यक्रमांत. लिहून ठेवला पाहिजे तो… अनेक परफॉर्मर्सच्या बाबत हे असेच होते. वक्तादशसहस्रेषु राम शेवाळकरांच्या बाबतही हे असेच झाले आहे. सावरकरांवरचे किंवा मग कृष्ण, अर्जुन, दुर्योधनावरचे व्याख्यान खूप रंगले की, एकतर ते ध्वनिबद्ध करून ठेवलेले असायचे. श्रीमती विजयाताई शेवाळकर आयोजकांना आधीच तशा सूचना द्यायच्या आणि मग त्या ध्वनिफितीवरून ती व्याख्याने लिहून काढली गेली आहेत…
ते परफॉर्मर होते आणि लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हा परफॉर्मरचा निसर्गभाव असतो. त्यात अडथळा आणणारे घटक त्याला अन्यायकारकच वाटत राहतात. त्यामुळे सामान्यांच्या आयुष्यातला अनमोल आनंदाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पुलंनी त्याला विरोधच केला. मग ते आणिबाणी असो की नंतरच्या राज्यकर्त्यांची दंडेली असो. त्यांच्यातल्या परफॉर्मरला मुक्त अवकाशच हवं होतं आणि माणासाचेही तसेच जगणे हा त्याचा अधिकार आहे, हे त्यांचे मत होते. सारी माणसे प्रत्येक क्षणाला सादरच होत असतात. पुलंच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, हे माहिती नाही, मात्र ते गप्पांचे फड जमवीत. खासगी बैठका सतत होत राहत. त्यात हे असे अनेक किस्से सांगत असावेत आणि कधीतरी कुणीतरी, तू हे लिहून का नाही काढत? छान आहेत हे… असे म्हटले असावे आणि मग ते प्रकाशित झाल्यावर एक वेगळ्या लेखनाची वाट प्रशस्त झाली. शंकर बडेंच्या बाबत मी हा जिवंत अनुभव घेतला आहे. ते खासगी बैठकांत खूप किस्से रंगवून सांगत अन् मग मी ते त्यांच्याकडून लिहून घेतले.
पुलंचे लेखन म्हणजेही त्यांचा एक परफॉर्मन्सच होता. त्यांची एक मुलाखत पु. बा. भावे यांनी घेतली होती. त्यात त्यांच्या लाडक्या रूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला अन् अखेर ते संगीतकार, अभिनेते, नाटककार, लेखक की कोण… असा निष्कर्ष काढताना ते सादरकर्तेच आहेत, हेच सिद्ध झाले होते.
त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षात, त्यांची होऊ न शकलेली भेट भळभळत राहतेय्…

https://tarunbharat.org/?p=75961
Posted by : | on : 12 Mar 2019
Filed under : उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्याम पेठकर, संपादकीय, स्तंभलेखक (26 of 1507 articles)


कहू | देश स्वतंत्र झाल्यापासून जम्मू-काश्मीरचा मुद्दा कधी चर्चेला आला नाही, असे होत नाही. कधी आंतरिक सुरक्षा, कधी बाह्य सुरक्षा, ...

×