ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक » पोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा!

पोलादी प्रयत्नांना मानाचा मुजरा!

चारुदत्त कहू |

सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव घेताच लोहपुरुषासारखे व्यक्तिमत्त्व डोळ्यांपुढे येते! या व्यक्तीने स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील ५६५ संस्थानांच्या विलीनीकरणासाठी दिलेले योगदान इतिहास कधीही विसरणार नाही! त्यांच्या या योगदानासाठी भारतीय महिलांनी त्यांना ‘सरदार’ या पदवीने सन्मानित केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते बिनीचे शिलेदार होते. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासोबतच ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. ते पेशाने वकील होते आणि हा व्यवसाय करतानाच ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले. गुजरातमधील खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आणि इंग्रज अधिकार्‍यांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. यामुळे त्यांची गणना गुजरातमधील आणि पुढे देशातील प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानातून पलायन करून आलेल्या व पंजाब, दिल्लीत राहणार्‍या निर्वासितांना त्यांनी शक्य ती मदत केली. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतता स्थापनेकरिताही त्यांनी पुढाकार घेतला. संस्थानांचे विलीनीकरण करताना त्यांनी मुत्सद्देगिरी तर केलीच, पण ज्या ठिकाणी संस्थानिकांनी अडेलतट्टूपणा केला, त्या ठिकाणी त्यांनी सैन्यबळ पाठवून ती संस्थाने भारतात सामील करवून घेतली. अशा या लोहपुरुषाची आणि विलीनीकरणाच्या महानायकाची भारतालाच नव्हे, तर जगाला कायमची ओळख व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गुजरातमध्ये नर्मदेच्या पात्रात त्यांचा, जगातील सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेवर येण्याला चार वर्षे पूर्ण होताच या संकल्पाची पूर्तीदेखील केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या या पुतळ्याचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबरला म्हणजे सरदार पटेल यांच्या जन्मदिनी पार पडले.
या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची उंची न्यूयॉर्कच्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या जवळपास दुप्पट आहे. सध्या जगातला सर्वात उंच पुतळा चीनमध्ये आहे. गौतम बुद्धांच्या ‘स्प्रिंग टेंपल बुद्ध’ नावाच्या या पुतळ्याची उंची १२८ मीटर आहे. पण, अरबी समुद्रात २०२१ पर्यंत बनून तयार होणार्‍या शिवस्मारकाची उंची ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही आठ मीटर जास्त असणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या उभारणीच्या निर्णयापासूनच सरकारवर टीका होऊ लागली. तरीदेखील ‘मन की बात’मधून मोदींनी, देशातील प्रत्येक गावातील शेतकर्‍यांनी या पुतळ्यासाठी पोलाद पाठवावे, या केलेल्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी छोटी छोटी लोखंडी अवजारे पाठवून निर्मितीकरिता लागणार्‍या पोलादामध्ये त्यांच्या मदतीच्या समिधा अर्पण केल्या. पंडित नेहरूंकडे ज्या वेळी या देशाचे नेतृत्व आले, त्या वेळी ५६३ संस्थानांचा कारभार स्वतंत्र आणि स्वायत्तपणे मनमानी पद्धतीने सुरू होता. पण, सरदार वल्लभभाईंनीच त्यांच्या नेतृत्वाच्या प्रभावातून या सार्‍या संस्थानांना स्वतंत्र भारतात विलीन केले. आपल्याच पक्षाच्या पुढार्‍याच्या स्मृती जागवाव्या, असे काँग्रेस पक्षाला कधीच वाटले नाही. कारण सरदार पटेल नेहरू घराण्यातील नसल्याने आणि नेहरू घराण्याच्या बाहेरील व्यक्तीला फारशी किंमत देण्याची काँग्रेसची परंपरा नसल्याने, सरदार पटेलांसारख्या बुलंद नेत्याची ओळख जगाला होऊ शकली नव्हती, ती मोदींच्या निर्णयामुळे झाली!
गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता, काँग्रेसचे स्थानिक नेते, बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांच्यासह ब्रिटनच्या एका खासदाराने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या उभारणीस विरोध केला होता. ‘‘उत्तरप्रदेशची मुख्यमंत्री असताना मी ठिकठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आम्ही पुतळ्यांवर केलेला खर्च भाजपाने कुचकामी ठरवत आमच्यावर टीकेची झोड उठविली होती,’’ अशी मायावतींची प्रतिक्रिया होती. गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी तर मोदींची ही संकल्पना लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केलेली असल्याची टीका केली. ब्रिटनचे खासदार पीटर बोन यांनी भारत सरकार पुतळ्याच्या बांधकामावर इतका प्रचंड खर्च करीत असल्याबद्दल आक्षेप घेऊन, ब्रिटनने भारताची मदत थांबवावी, अशी मागणी केली होती. सरदार पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा उभारणे हा शुद्ध मूर्खपणा असल्याची टीकादेखील त्यांनी केली. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे खासदार पीटर बोन म्हणाले, ‘‘भारत एकीकडे ब्रिटनकडून १.१ बिलियनची मदत घेत आहे आणि दुसरीकडे ३३० मिलियन एकट्या पुतळ्याच्या उभारणीवर खर्च करीत आहे.’’ त्यांचीच री ओढत ब्रिटनच्या आणखी काही खासदारांनी भारताला देऊ केलेल्या मदतीबाबत आक्षेप घेतला होता. भारत जर कोट्यवधी रुपये खर्च करून एका स्वातंत्र्यसेनानीचा पुतळा उभारू शकतो आणि जो अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षा दुपटीने मोठा असेल, तर मग भारताला आर्थिक मदत देण्याचे कारणच उरत नाही, असा त्यांचा आक्षेप होता. गुजरातचे आमदार छोटुभाई वसावा यांनीदेखील सरदार पटेल यांच्या पुतळा उभारणीविरुद्ध षड्डू ठोकले होते. आणखी एक माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी तर सरदार पटेल यांचा पुतळा उभारणी म्हणजे मोदींची आणखी एक व्यावसायिक भलावण असल्याचा आरोप केला होता. पुतळा उभारणीविरोधात स्थानिक आदिवासींनाही भडकावण्यात आले होते. पण, या सार्‍या विरोधावर मात करीत हा पुतळा विक्रमी वेळेत उभारला गेला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’बद्दल प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांनी कधी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’बद्दल प्रश्‍न उपस्थित केले नाहीत. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ तयार झाला फ्रान्समध्ये आणि उभारला गेला अमेरिकेत! त्या वेळी फ्रान्समध्ये अतिशय नैराश्याचे वातावरण होते. दोन्ही देशांत- फ्रान्स आणि अमेरिकेत- आर्थिक संकटे आ वासून उभी होती. पण, अमेरिकेने देशाला दिशा देण्याकरिता, त्यांच्या नागरिकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याकरिता, याशिवाय दुसरा कुठलाही शहाणपणाचा निर्णय राहू शकत नाही, असे स्पष्ट करून निर्धारित योजना पूर्णत्वास नेली. ज्या वेळी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ उभारला गेला, त्या वेळी त्याची किंमत ५,२७,६९९.४९ अमेरिकन डॉलर्स होती आणि ज्या फ्रान्समध्ये या पुतळ्याचे बांधकाम सुरू होते, तो १२ विकसित देशांच्या यादीत शेवटून दुसरा होता. या देशाला ज्या समस्या भेडसावत होत्या, त्यादेखील समजून घेतल्या जायला हव्या. फ्रान्सच्या तीनचतुर्थांश जनतेची उपजीविका शेतीवर होती. तीन टक्केमहिलांना घरदार नव्हते, त्या रस्त्यांवरच राहायच्या. ५३ टक्के महिलांना नावडीच्या घरात राहावे लागत होते. फ्रान्सला जर्मनीकडून घेतलेले २०० फ्रँक मिलियन्सचे कर्ज परत करायचे होते. १८८२ च्या ‘पॅरिस ब्रूस क्रॅश’मुळे फ्रान्सवर विपरीत परिणाम झाले आणि त्यांना बँक ऑफ इंग्लंडमधून तीन मिलियन युरो काढावे लागले. यामुळे फ्रान्सचे स्टॉक मार्केट कोसळले होते. फ्रान्सचे भागभांडवल आणि विदेशी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. अशा आर्थिक तंगीतूनही फ्रान्सने हा प्रकल्प सोडून न देता अमेरिकेला दिलेला शब्द पाळला. फ्रान्सच्या तेव्हाच्या आर्थिक स्थितीशी आजच्या भारताच्या स्थितीशी तुलना होऊ शकत नाही. आपण बर्‍याच चांगल्या स्थितीत आहोत. म्हणूनच या पुतळ्याबाबत उपस्थित करण्यात आलेले आक्षेप काळाच्या कसोटीवर खरे ठरले नाहीत. नर्मदा जिल्ह्यात केवडिया कॉलनी परिसरात उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या निर्मितीसाठी २९८९ कोटींचा खर्च आला आहे. या स्मारकात एक संग्रहालयसुद्धा असणार आहे. या संग्रहालयात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती दिली जाणार आहे. पुतळ्याचे काम २०१३ मध्ये सुरू झाले आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या कंपनीने, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या रचनेतून ते पूर्ण केले. प्रारंभी या पुतळ्यावर झालेला खर्च कसा भरून निघेल असे आक्षेप घेण्यात आले, पण दिवाळीच्या सुटीमध्ये एकाच दिवशी या पुतळ्याला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या २७ हजारावर गेली! असाच जर पर्यटकांचा उत्साह कायम राहिला, तर येणार्‍या दीड ते दोन वर्षांतच पुतळ्यावरील खर्च भरून निघेल, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. २५० इंजिनीअर आणि ३,४०० मजुरांच्या चार वर्षांच्या अथक परिश्रमातून सरदार वल्लभभाईंची प्रतिमा उभी झाली आहे. त्यासाठी चीनच्या शिल्पकारांचीही मदत घ्यावी लागली. या पुतळ्याचे वजन १७०० टन, तर उंची ५२२ फूट म्हणजे १८२ मीटर आहे. चीनच्या स्प्रिंग टेंपलमधील बुद्ध प्रतिमा १५३ मीटर उंचीची होती व तिला सर्वात उंच मूर्तीचा मान होता. पण, सरदारांच्या पुतळ्याने या मूर्तीला मागे टाकले आहे.

https://tarunbharat.org/?p=68071
Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, चारुदत्त कहू, संपादकीय, स्तंभलेखक (292 of 1414 articles)


च्या युद्धात राजस्थानातील कच्छच्या वाळवंटात जैसलमेरमधील लोंगेवाला येथे पाकिस्तानी सैनिकांसोबत जे तुंबळ युद्ध झाले, त्यात पाकिस्तानी रणगाडे आणि चिलखती वाहनांना ...

×