ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक » बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…

बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…

श्रीनिवास वैद्य |

आपल्या देशाचे तुकडे ज्यांच्यामुळे झाले आणि ते होताना जो भीषण, मानवतेला लाजविणारा रक्तपात झाला, त्यामुळे स्वतंत्र भारतातील हिंदूंनी मुसलमानांवर बदला घेऊ नये, म्हणून स्वातंत्र्यानंतर विशेष प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे हिंदू सतत बचावाच्या पवित्र्यातच राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली. हे साधण्यासाठी जे जे काही करता येईल, ते ते सर्व निष्ठेने करण्यात आले. या कामी कॉंग्रेस राज्यकर्त्यांना वामपंथीयांची साथ मिळाली. आणि मग या जोडगोळीने जो धिंगाणा घातला, त्याची फळे आपण आजही भोगतो आहोत. राणी पद्मावतीला चित्रपटात नाचताना दाखविले तर त्यात एवढे संतापायचे काय कारण, असा प्रश्‍न आजची पिढी जेव्हा विचारते, तेव्हा कॉंग्रेस व वामपंथीयांनी जे पेरले त्याचे हे फळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही विषपेरणी एका दिवसात झाली नाही आणि ती एका दिवसात निरस्तही होणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. सातत्याने हा विषय जागृत ठेवावा लागेल. नरेंद्र मोदी कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना मांडतात, ती कॉंग्रेस पक्ष संपविण्याची नाही, तर कॉंग्रेसने जी विचारसरणी या देशात रुजविली आहे, त्या विचारसरणीतून भारताला मुक्त करणे, ही आहे. संजय भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला जो कडवा विरोध होत आहे, ती या दिशेने टाकलेली पावले आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
पद्मावतीला विरोध करण्यात अजूनही आमचा महाराष्ट्र निष्क्रिय आहे. साधारणत: अशा प्रकरणात उत्साहाने उडी घेणारे राज व उद्धव ठाकरे, कसे काय हातावर हात ठेवून शांत बसले आहेत, कळायला मार्ग नाही. त्यांचे सोडून द्या. थोडीफार खावटी मिळाली की, कुठल्याही क्षणी ते डरकाळी फोडतील. पण बाकीच्या मराठी माणसांचे काय? त्यालाही चित्रपटात नाचणार्‍या पद्मावतीला बघायचे आहे की काय? पद्मावतीला ज्या स्तराचा विरोध सुरू आहे, ते बघून पापभीरू मराठी मनाला नक्कीच घाम फुटला असेल. प्रबोधनवादी विचारांनी आमच्या मनाची अशी काही मशागत करून ठेवली आहे की, असले विषय आम्हाला बोचतच नाहीत. हिंदू समाजाचा आत्मसन्मान लोळागोळा करून टाकला की, या देशाच्या चिंधड्या उडवायला फार काळ आणि श्रम लागणार नाहीत, अशी एक योजना या वामपंथी व कॉंग्रेसी लोकांच्या मनात आहे. कॉंग्रेसला कसेही करून सत्तेत यायचे आहे आणि वामपंथीयांना कसेही करून हा देश तोडायचा आहे. कारण त्यांच्या मूळपुरुषाने म्हणचे कार्ल मार्क्सने, हिंदू समाजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय इथे क्रांतीची बीजे पेरता येणार नाही, असे लिहून ठेवले आहे. मार्क्स असताना इथे ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे ब्रिटिशांनी भारताला आत्मचेतनाहीन करण्याचे काम सुरू केले होते, त्याला कार्ल मार्क्सने पाठिंबा दिला होता. हा समाज तोडण्याचे काम थोडे वेदनादायक असले, तरी ते आवश्यक आहे आणि हे काम सध्या ब्रिटिश करीत आहेत, म्हणून मार्क्सचा केवळ या मुद्यावर ब्रिटिशांना पाठिंबा होता. २१ व्या शतकातील त्याचे चेले कॉंग्रेसला याच कारणासाठी पाठिंबा देत आहेत. मुळात संजय भन्साळीला हा असला चित्रपट काढण्याचे कारणच काय होते, समजायला मार्ग नाही. देवदास काढला, कुणी काही म्हटले नाही. बाजीराव मस्तानी चित्रपट काढला, क्षीण विरोध झाला. रासलीला चित्रपटाचे नाव बदलवून टाकले. भन्साळीची हिंमत फारच वाढली आणि त्याने ‘पद्मावती’ काढला.
या देशात शतकानुशतके हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने राहात होते, एकमेकांच्या संस्कृतीचे आदानप्रदान होत होते, हा खोटा इतिहास या देशाच्या कणाकणात भिनवायचा आहे. खरेच का, मुसलमानांनी अत्याचार केलेले नाहीत? सर्व इतिहास अत्याचाराच्या या घटनांनी भरून पडला आहे. पण, तो तसा समोर आणण्यात आला नाही. हिंदू समाजात आज ज्या काही विकृती दिसत आहेत, त्या त्याच्या अंगभूत आहेत. जातिभेद असो की, महिलांचे समाजातील व कुटुंबातील स्थान असो, सतीप्रथा असो की हुंडाबळी, यच्चयावत दोषांसाठी हिंदूंची धर्मशास्त्रे आणि नीतिशास्त्रेच जबाबदार आहेत, हेच या वामपंथीयांना सिद्ध करायचे आहे. मुसलमानांच्या अमानुष आक्रमणांमुळे तसेच इंग्रजांच्या धूर्त गुलामगिरीमुळे समाजात विकृती आल्या आहेत, हे या वामपंथीयांना मान्यच करायचे नाही. घराबाहेर, समाजात जेव्हा असुरक्षिततेचे वातावरण असते, तेव्हा प्रत्येकच समाजात बंधने लावली जातात. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठलाही इतिहास उघडून बघा, जेव्हा जेव्हा सामाजिक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते, तेव्हा तेव्हा सर्वात आधी समाजातील स्त्रियांवर बंधने आली आहेत. काही रानटी सभ्यता सोडल्या तर सार्‍या जगात ही एकसमानता आढळून येईल. इथे भारतात तर शेकडो वर्षे आक्रमकांच्या टाचेखाली हिंदू जनता भरडून निघत होती. समाजात प्रत्येक जण काही छत्रपती संभाजी राजे नसतो. दडपणाने, मृत्यूच्या भीतीने किंवा द्रव्याच्या लोभाने तो वाकला असेल, रांगला असेल अगदी धर्मांतरितही झाला असेल. हळूहळू याच्या प्रथा बनल्या असतील. याचा अर्थ असा नाही की, हिंदू समाजातच हे अंगभूत दोष आहेत. परंतु, स्वातंत्र्यानंतर आम्हाला सतत हेच बिंबविण्यात आले. त्यामुळे आमचा इतिहास, आमची संस्कृती, आमच्या परंपरा या सर्वांबाबत एक तिटकारा, तिरस्कार आमच्या मनात निर्माण झाला. आमचे जे चांगले आहे तेही आम्हाला वांगले वाटू लागले. भारत देश नष्ट करण्याच्या प्रयत्नात वामपंथीयांचे हे फार मोठे यश आहे. खरेतर हजारो वर्षे भारत जगात सर्वांत श्रीमंत देश होता. समाजात विषमता, महिलांची मुस्कटदाबी असताना, तो समाज इतका संपन्न व समृद्ध राहू शकतो का, याचा कुणीच विचार करीत नाही. या देशातील हिंदूंना त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून दिली तर तर आपला सर्व खेळ खलास होणार, याची पक्की जाणीव वामपंथीयांना आहे. आणि म्हणूनच, हे वामपंथीय संजय भन्साळीसारखे विकृत कलाकार हाताशी धरतात. या लोकांना माहीत आहे, कुठली ढाल घेऊन हे सर्व चाळे करायचे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ढाल अशीच समोर केली जात आहे. हे एक प्रकारे या मंडळींचे ‘टेस्टिंग’ असते. ते साधले की, त्यापुढची पायरी चढतात. अशा रीतीने क्रमाक्रमाने या हिंदू समाजाला इतके षंढ करून टाकायचे की, आपण कधी काळी पराक्रमी होतो, श्रीमंत होतो हेच तो विसरून जायला हवा. पण, फेकलेल्या प्रत्येकच सोंगट्या शकुनिमामाच्या नियंत्रणातल्या नसतात. २०१४ साली भारतातील लोकांनी नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट बहुमतातील सरकार स्थापन केल्यापासून, या मंडळींची सारी स्वप्ने धुळीस मिळालीत. पद्मावती चित्रपटाला जो कडाडून विरोध होत आहे, तो मनाला दिलासा देणारा आहे. आधी चित्रपट बघा, मग विरोधाचे ठरवा, असे सल्ले देण्यात येत आहेत. म्हणजे, आधी विष चाखून बघा आणि त्यात मरण आले तर मग ठरवा विष प्राणघातक असते की नाही, असे म्हणण्यासारखे आहे. खूप युक्तिवाद होईल, चिखलफेक होईल, कमरेखाली वार होतील, गरलवमन होईल; पण तरीही अंतिम विजय इथल्या राष्ट्रीयत्वाचाच होईल. राष्ट्रवादाचाच होईल. पद्मावतीने त्या काळी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन पावित्र्याचे रक्षण केले होते. आज त्याच पद्मावतीवर निघालेला चित्रपट, भारताच्या सनातन पवित्र आत्म्याचे केवळ रक्षणच नाही, तर त्या आत्म्याला अधिकाधिक निर्मळ बनविण्यास कारणीभूत ठरत आहे. भारताची मातीच विलक्षण आहे. नष्टच होत नाही. या देशात रुजलेली जीवनमूल्ये, आदर्श, नीतिसंकल्पना, प्रत्येक गवताला तलवारी फुटाव्यात, तसे उगविणे सुरू झाले आहे. त्याच्यापुढे हे भन्साळी वगैरे म्हणजे किडे-मुंगी आहेत. हा समाज जेव्हा पौरुषत्वाने युद्धास तयार होईल, तेव्हा हे वामपंथी, सेक्युलर सर्वजण कुठे दिसणारही नाहीत. तो क्षण आणायचा असेल, तर आज आम्हाला कुठलाही वितंडवाद न करता, अकलेच्या गोष्टी न सांगता, मोठमोठे दाखले न देता, पद्मावती चित्रपटाच्या विरोधात ठामपणे उभे झाले पाहिजे. २०१७ सालचा हिंदू समाज विजयाच्या ऐन क्षणी गाफील राहिला, अशी इतिहासात नोंद व्हायला नको. त्या बोंडअळीचे नंतर बघू या, प्रथम ही भन्साळी कीड नष्ट झाली पाहिजे…

https://tarunbharat.org/?p=40077
Posted by : | on : 24 Nov 2017
Filed under : उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…

 1. Ashish Pande Reply

  25 Nov 2017 at 10:09 am

  Hindu dharm kya he ye khud hindu ko nahi pata. Aapka ye blog bilkul sahi he.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

  छायाचित्रातून

 • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
 • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
 • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
 • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
 • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उपलेख, श्रीनिवास वैद्य, संपादकीय, स्तंभलेखक (1330 of 1423 articles)


न्यायालयातील अंतिम रिक्त जागेकरिता परवा झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत, इंग्लंडच्या उमेदवाराचा पराभव करीत भारताने मिळवलेला विजय हा भारताच्या प्रगल्भ मुत्सद्देगिरीचा विजय ...

×