ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अग्रलेख, संपादकीय » भारतीय लोकशाहीचा विजय!

भारतीय लोकशाहीचा विजय!

लोकशाहीच्या उत्सवाला आजच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाने खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५५ ते ५८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रणरणते ऊन, परीक्षांचा कालावधी, गावठाणातील कामे, मार्च-एप्रिलमधील आर्थिक उलाढाली या सार्‍यांमधून वेळ काढत जनताजनार्दनाने या उत्सवात अहमहमिकेने सहभाग घेतला. जात, धर्म, प्रांतच नव्हे, तर गरीब-श्रीमंतीचे भेद मिटवून २० राज्यांमधील ९१ मतदारसंघांतील जनतेने ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ म्हणत मतदानाची शाई आपल्या अंगुलीवर कोरून घेतली. कुपवाडासारख्या अतिसंवेदनशील मतदारसंघात ४७ टक्के मतदान होणे, याचा अर्थ तेथील जनतेने विघटनवाद्यांना वेगळाच संदेश दिला आहे. देशाच्या संविधानाला जी लोकशाही अभिप्रेत आहे, अगदी त्याच लोकशाहीचे प्रतिबिंब आजच्या या उत्सवात बघायला मिळाले.
राज्यघटनेने व्यक्ती हुद्याने किती मोठी अथवा लहान आहे, याचा विचार न करता, राजा आणि रंक या दोघांनाही एकच मत देण्याचे प्रावधान केले आहे. त्यामुळे मतदान केंद्रात रांगेत उभे राहून प्रत्येकच व्यक्तीने आपल्याला मिळालेल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून, आपल्या मनातील उमेदवाराला विजयी करण्यासाठी इव्हीएमचा वापर केला. या देशातील प्रत्येकच व्यक्तीच्या सरकारकडून आशा, आकांक्षा आणि अपेक्षा आहेत. त्याची पूर्तता करण्याचे आश्‍वासन सार्‍याच राजकीय पक्षांनी दिले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ‘मोदी है तो मुमकिन हैं’ आणि ‘फिर एक बार मोदी सरकार’ असे स्लोगन देऊन देशवासीयांना- मतदारांना विकासाच्या मुद्यावर मोहोर उमटविण्याचे आवाहन केले आहे; तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने ‘परिवर्तन होणारच, महाआघाडी येणारच’ असा नारा देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. निवडणूक ही अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये निवडून येण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार कोणत्या पातळीवर जातील याचा नेम नसतो. कुणी जातीचा आधार घेत, तर कुणी धर्माचा आधार घेत निवडणुकीला सामोरा जातो. प्रचारात व्यक्तिगत निंदा-नालस्ती आणि चारित्र्यहननाचे प्रकारही होतात. विरोधकांच्या प्रत्येकच आरोपामध्ये तथ्य असते असे नाही. पण, प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे पक्ष नाना प्रकारच्या क्लृप्त्या करताना दिसून आले. १७ व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग, प्रशासन व पोलिस यंत्रणा यांनी जबरदस्त तयारी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होते. कारण त्या निवडणुका लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणार्‍या, त्यांच्या हृदयाशी जुळणार्‍या असतात. त्या तुलनेत लोकसभा, विधानसभा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी दिसून येतो. पण, आजच्या पहिल्या टप्प्याला मतदारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुढील सहा टप्प्यांच्या मतदानावर परिणाम करणारा ठरणार आहे. आपल्याला जर नागरी व मूलभूत सोयी-सुविधा हव्या असतील, तर मतदान करायलाच हवे, हे अनेकांनी कृतीतून दाखवून दिले. अनेकांनी मिळालेल्या सुटीत पिकनिकला न जाता मतदानाच्या उत्सवात भाग घेऊन लोकशाही अधिक सुदृढ करण्यात मोलाची भूमिका निभावली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सरकारने अनेक उपक्रम राबविले. विशेष रेल्वे गाड्या चालवून त्यामार्फत मतदारजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले. त्याचा परिणामसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढण्यात झाला आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा १० टक्के जास्त मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही मतदाराला दोन किलोमीटरपेक्षा अधिक दूर जावे लागू नये, याचाही प्रयत्न करण्यात आला. त्याचे चांगले फायदे दिसून आले. अनेकांनी सहकुटुंब मतदान करण्यास प्राधान्य दिले. नवमतदारही निवडणुकीच्या या उत्साहात सहभागी होऊन आपल्याला उमेदवार निवडण्याचा अधिकार मिळाल्याबद्दल आनंदी दिसून आले. शहरी आणि ग्रामीण भागात तर मतदान केंद्रांची जय्यत तयारी करण्यात आलीच होती; पण सुमारे २० हजार मतदानकेंद्रे जंगलात आणि निमजंगली भागात स्थापन करण्यात आली. ज्यामुळे कुठलाही वनवासी, आदिवासी, गिरिजन मतदानापासून वंचित राहिला नसावा. आज ज्या ९१ मतदारसंघांत मतदान पार पडले, त्यामध्ये काही केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते आणि अनेक दिग्गजांचे नशीब मशीनबंद झाले आहे! २०१४ मध्ये या मतदारसंघांपैकी ३२ ठिकाणी भाजपाचा विजय झाला होता. काँग्रेसचे सात उमेदवार विजयी झाले होते, तर प्रादेशिक पक्ष आणि पक्षांचे ५२ प्रतिनिधी लोकसभेत पोहोचले होते. आज एकूण २० राज्यांमध्ये मतदान पार पडले, त्यात महाराष्ट्रातील सात मतदारसंघांचा समावेश होता. सोबतच आंध्र, अरुणाचल, सिक्कीम आणि ओडिशा विधानसभेसाठीही जनतेने मतदानाचा हक्क बजावला. विदर्भातील सात जागांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी असली, तरीही गडचिरोली-चिमूर मतदारसंघांतील आमगाव, आरमोरी, अहेरी व भंडारा-गोंदिया मतदारसंघांतील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेतच मतदान पार पडले. हे मतदारसंघ अतिसंवेदनशील असून, अशा मतदान केंद्रांची संख्या ५०० हून अधिक होती. सकाळी मतदानात असलेला संथपणा दुपारनंतर कमी झाला आणि जनतेने लगबगीने घराबाहेर पडून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. आज मतदान पार पडलेल्या विदर्भातील सातही जागांवर २०१४ मध्ये भाजपा-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. पण, २०१८ मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी, भाजपा-सेनेची महायुती, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडीसह अनेक छोट्या-मोठ्या पक्षांचे उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल ओडिशामध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नरत असून, या पक्षापुढे भारतीय जनता पक्षाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. अरुणाचलमध्येही विधानसभेच्या निवडणुका होत असून, तेथेही चुरशीचा सामना आहे. आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पुन्हा सत्तेत येण्याचा चंग बांधला आहे. पण काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या रिंगणातील उपस्थितीमुळे चंद्राबाबूंचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे येणारा काळच ठरवणार आहे. निवडणुका सुरळीत पार पाडण्यात निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरते. कुणावरही अन्याय न होता समन्यायी भूमिका आयोगाला घ्यावी लागते. यंदाच्या निवडणुकोत्सवात तब्बल एक कोटी १० लाख सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. भारताच्या निवडणुकीकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांचेही लक्ष असते. अनेक देश त्यांची लोकशाही बळकट करण्यासाठी भारताचा निवडणूक फॉर्म्युला वापरतात तो उगाच नव्हे. आजच्या मतदानाने भारतीय लोकशाही विजयी झाली असून, येणार्‍या काळात तिच्यात अधिक प्रगल्भता यावी, ही अपेक्षा!

https://tarunbharat.org/?p=78080
Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : अग्रलेख, संपादकीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अग्रलेख, संपादकीय (15 of 898 articles)


वैद्य | २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदान यंत्राला (इव्हीएम) व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीन ...

×